शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

Vastu Tips: आर्थिक संकट असो वा जुना आजार; झोपण्यापूर्वी 'या' उपायाने मिळेल समाधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:32 IST

Vastu Tips: रोजच्या जगण्यात त्रासदायक ठरतात दोन गोष्टी- पैशांची अडचण आणि शारीरिक व्याधी, यावर वास्तू शास्त्रात एक सोपा तोडगा सांगितला आहे!

आर्थिक संकट आणि असाध्य आजार कोणाचेही सुख आणि शांती हिरावून घेतात. कारण या दोन्ही गोष्टी मन:शांती हिरावून घेतात. जिथे मन शांत नसेल तिथे जगण्याचे समाधान तरी कसे मिळणार? हे चक्र गुंतागुंतीचे आहे. त्यावर समाधान म्हणून वास्तू शास्त्रात एक तोडगा सांगितला आहे. कोणता ते जाणून घेऊ. 

जीवनात सुख आणि दुःख हा मानवी जीवनाचा एक सामान्य भाग आहे. कधीकधी आपल्याला आयुष्यात खूप आनंद मिळतो, तर कधीकधी आपल्याला दुःखांशी झुंजावे लागते. वाईट काळातून बाहेर पडण्यासाठी आपण अनेक उपाय करतो आणि संकटातून बाहेर काढण्यासाठी देवाला प्रार्थना करतो. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वास्तुशास्त्र देखील उपाय सांगते. यापैकी एक उपाय रात्री झोपण्याशी संबंधित आहे. वास्तुशास्त्रानुसार, रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली अशी एक वस्तू ठेवा, ज्यामुळे आर्थिक संकटापासून ते आजार, मानसिक ताणापर्यंत सर्व दोष दूर होण्यास मदत मिळते. चला जाणून घेऊया तो वास्तु उपाय काय आहे.

झोपताना उशीखाली ठेवा 'ही' गोष्ट :

वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही अनेक समस्यांनी वेढलेले असाल आणि त्यापासून मुक्ती मिळवू इच्छित असाल, तर रात्री झोपताना उशीखाली मिठाची छोटीशी पुडी ठेवा. मीठ नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे काम करते आणि मनाला शांती प्रदान करते. त्यात इतकी नैसर्गिक शक्ती आहे की ते आजूबाजूला असलेल्या नकारात्मक लहरी शोषून घेते. मिठाच्या या उपायामुळे रात्री भयानक स्वप्न पडत नाहीत, आर्थिक अडचणीतून मार्ग सापडतो, दीर्घकाळापासून सुरु असलेला आजार कमी होतो आणि मन शांत, समाधानी आणि प्रसन्न राहण्यास मदत मिळते. 

वास्तुदोषही दूर होतो :

हा उपाय केवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट करत नाही, तर घरातील वास्तुदोष दूर करण्यास देखील मदत करतो. यासाठी शुक्रवारी रात्री उशीखाली मिठाची पुडी ठेवा आणि आठवड्याने पुढच्या शुक्रवारी नवीन पुडी ठेवा. सलग ११ शुक्रवारी हा उपाय केल्याने घरातील वातावरण सकारात्मक होऊ लागते आणि कुटुंबात एकता वाढते.

आर्थिक अडचणीतून मार्ग : 

रात्री उशीखाली मिठाची पुडी ठेवून झोपल्याने मुख्यतः मानसिक शांतता लाभते. विचारचक्र थांबते. आजरपण कमी होते. आर्थिक अडचणीतून नवनवे मार्ग सापडतात. शिवाय आर्थिक वृद्धी व्हावी म्हणून मिठाची पुडी उशीखाली ठेवण्याआधी 'ओम धनाय नम:' या मंत्राचा ११ वेळा जप केला असता या उपायाचा अधिक लाभ होतो. 

(सदर माहिती सामान्य गृहीतके आणि वास्तू शास्त्राच्या मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.)

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र