Vastu Shastra : मुलांच्या शिक्षणाची चिंता सोडा; आज दुपारी लोकमत भक्तीवर उपयुक्त वास्तू टिप्स मिळवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 13:40 IST2022-08-26T13:39:49+5:302022-08-26T13:40:33+5:30
Vastu Tips: आजचा महत्त्वाचा विषय तुम्ही आणि इतर पालकांनीदेखील चुकवू नये असाच आहे! भेटूया आज दुपारी ३ वाजता लोकमत भक्ती युट्युबवर!

Vastu Shastra : मुलांच्या शिक्षणाची चिंता सोडा; आज दुपारी लोकमत भक्तीवर उपयुक्त वास्तू टिप्स मिळवा!
आपण बाल्यावस्थेत असताना आई वडिलांनी कितीही कानी कपाळी ओरडून अभ्यास कर सांगितले तरी आपण कधी मनावर घेतले नाही. खेळ, मित्र मैत्रिणी, मजा मस्ती आणि नंतर सक्ती म्हणून लाजेखातर थोडासा गृहपाठ! हे शालेय जीवन आपण सगळ्यांनी अनुभवले. परंतु वेळच्या वेळी अभ्यास न करण्याची किंमत जेव्हा मोठेपणी चुकवावी लागते, तेव्हा आपल्याला सुधारता आल्या नाहीत त्या चुका निदान पुढच्या पिढीने करू नये, अशी पालकांची भूमिका बनते. मात्र जेव्हा मुलं ऐकेनाशी होतात, तेव्हा घराला युद्धभूमीचे स्वरूप येते. अशा वेळी मुलांना अभ्यासाकडे कसे वळवावे हा पालकांसमोर यक्ष प्रश्न उभा ठाकतो. या प्रश्नावर जितका मानसशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा आहे, तेवढाच वास्तुशास्त्राचासुद्धा!
मुलांची मानसिकता समजून घेत त्यांच्या कलाने अभ्यास कसा करून घेता येईल याचे उत्तर मानसशास्त्राचे जाणकार देऊ शकतील. परंतु घरचे वातावरण मुलांसाठी पोषक कसे ठरू शकेल, त्यांना अभ्यासात रस कसा वाटेल, उत्साह कसा निर्माण होईल याची माहिती आणि उपाय देण्यासाठी आज दुपारी ३ वाजता डॉ. रविराज अहिरराव काही उपयुक्त टिप्स देणार आहेत. या टिप्स आपल्याला मोफत मिळणार आहेत. त्यामुळे आजचा हा महत्त्वाचा विषय तुम्ही आणि इतर पालकांनीदेखील चुकवू नये असाच आहे! यासाठी वेळात वेळ काढून शुक्रवार २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता लोकमत भक्ती युट्युब चॅनेलवर त्यांचे मार्गदर्शन घ्यायला विसरू नका. आपल्या परिचितांनासुद्धा आजच्या कार्यक्रमाची अवश्य माहिती द्या!
वास्तुशास्त्राशी संबंधित आणखीही विषयांची सखोल माहिती व सहज करता येतील असे उपाय जाणून घेण्यासाठी लोकमत भक्तीचे पेज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा!