Vastu Shastra: घरात सुख-शांती हवी असेल, तर देवघरात नक्की ठेवा पाण्याचा कलश; जाणून घ्या त्याचे महत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 12:59 IST2026-02-25T12:58:06+5:302026-02-25T12:59:27+5:30
Vastu Tip: वास्तूशास्त्रानुसार देवघरात एक कलश पाण्याने भरून ठेवावा असे म्हणतात, त्याबाबत आणि देवघरासंबंधीचे नियम जाणून घ्या.

Vastu Shastra: घरात सुख-शांती हवी असेल, तर देवघरात नक्की ठेवा पाण्याचा कलश; जाणून घ्या त्याचे महत्त्व
घरातील देवघर हे केवळ पूजेचे ठिकाण नसून ते सकारात्मक ऊर्जेचे केंद्र असते. वास्तुशास्त्रानुसार देवघराची रचना योग्य असल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. यासाठी घरातील देवघर कसे असावे आणि कोणते नियम पाळावेत ते जाणून घ्या.
Ritual: शनिवारी काळा रंग परिधान केल्याने जीवनातील संकटे खरोखर दूर होतात का? काय सांगते शास्त्र?
वास्तुशास्त्रात घराच्या प्रत्येक कोपऱ्याला महत्त्व आहे, पण 'देवघर' हा सर्वात पवित्र भाग मानला जातो. जर देवघर योग्य दिशेला आणि योग्य स्थितीत नसेल, तर पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही आणि घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.
१. देवघरासाठी सर्वोत्तम दिशा
वास्तुशास्त्रानुसार, देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात (North-East) असावे. या दिशेला 'ईशान कोण' म्हणतात आणि येथे देवाचा वास असतो असे मानले जाते. जर ईशान्य शक्य नसेल, तर उत्तर किंवा पूर्व दिशा देखील शुभ मानली जाते.
२. पूजेच्या वेळी तुमचे तोंड कुठे असावे?
पूजा करताना भक्ताचे तोंड पूर्वेकडे (East) असावे. यामुळे एकाग्रता वाढते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. जर पूर्व शक्य नसेल, तर उत्तरेकडे तोंड करून केलेली पूजा देखील लाभदायक ठरते.
३. मूर्तींची मांडणी कशी असावी?
देवघरात मूर्ती एकमेकांसमोर ठेवू नका. मूर्ती कधीही भिंतीला पूर्णपणे चिकटवून ठेवू नका; भिंत आणि मूर्तीमध्ये किमान १-२ इंचाचे अंतर असावे. एकाच देवाच्या दोन किंवा अधिक मूर्ती किंवा फोटो ठेवणे टाळावे.
४. दिवे आणि ज्योतीचे स्थान
दिव्याची वात दक्षिण दिशेकडे नसावी. दिवा नेहमी देवाच्या उजव्या बाजूला असावा. अगरबत्ती किंवा धूप ईशान्य कोपऱ्यात लावणे शुभ असते.
५. देवघरात 'या' गोष्टी कधीही ठेवू नका
देवघरात कधीही भग्न (तुटलेली) मूर्ती किंवा फाटलेला देवाचा फोटो ठेवू नका. यामुळे नकारात्मकता वाढते. देवघरात कधीही मृत व्यक्तींचे किंवा पूर्वजांचे फोटो लावू नका. त्यांच्यासाठी घराची दक्षिण भिंत योग्य असते. पाकीट, बेल्ट किंवा चामड्याच्या कोणत्याही वस्तू देवघराच्या आसपास नसाव्यात.
Astrology: तुमच्या राशीत दडलंय तुमच्या पूर्वजन्माचे रहस्य! जाणून घ्या मागील जन्मात तुम्ही कोण होतात?
६. देवघराखाली किंवा वर 'हे' नसावे
वास्तूनुसार, देवघर कधीही शौचालय किंवा स्वयंपाकघराच्या वर किंवा खाली नसावे. तसेच पायऱ्यांखाली देवघर बनवणे अत्यंत अशुभ मानले जाते. देवघराचा कोपरा स्वतंत्र असावा. त्याचे पावित्र्य राखावे.
७. रंग आणि स्वच्छता
देवघराच्या भिंतींचा रंग हलका पिवळा, पांढरा किंवा आकाशी असावा. गडद रंग (विशेषतः काळा) देवघरात वापरू नये. तसेच, दररोज देवघर ओल्या कापडाने स्वच्छ करावे. जळमट होणार नाहीत याची काळजी घ्यावी. स्वच्छता पाळावी. निर्माल्य वेळीच विसर्जित करावे.
सुख-शांतीसाठी विशेष टीप: देवघरात एक कलश पाण्याने भरून ठेवावा आणि दररोज ते पाणी बदलावे. जुने पाणी झाडांना टाकावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.