Vastu Shastra: सावधान! घरामध्ये 'या' चुका होत असतील तर पैसा टिकणार नाही आणि नात्यातही येईल कटुता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:46 IST2025-12-30T11:42:27+5:302025-12-30T11:46:04+5:30
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार आर्थिक अडचणी आणि पती-पत्नीच्या नात्यातील दुराव्याला कारणीभूत असू शकतात पुढे दिलेल्या चुका, आजच बदल करा!

Vastu Shastra: सावधान! घरामध्ये 'या' चुका होत असतील तर पैसा टिकणार नाही आणि नात्यातही येईल कटुता!
वास्तुशास्त्रानुसार, घराचा प्रत्येक कोपरा आपल्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव टाकत असतो. विशेषतः बेडरूम, जिथे आपण दिवसाचा महत्त्वाचा वेळ घालवतो. पती-पत्नीमधील वाद आणि घराची खालावलेली आर्थिक स्थिती यामागे बेडरूममधील काही वास्तुदोष कारणीभूत असू शकतात.
त्यासाठी बेडरूम मधील पुढील चुका टाळाव्यात
१. आरशाची दिशा आणि स्थान
बेडरूममध्ये बेडच्या समोर कधीही आरसा नसावा. रात्री झोपताना तुमचे प्रतिबिंब आरशात दिसणे हे वास्तुशास्त्रात अत्यंत अशुभ मानले जाते. यामुळे पती-पत्नीमध्ये तणाव वाढतो आणि आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. जर आरसा काढणे शक्य नसेल, तर रात्री झोपताना तो कापडाने झाकून ठेवावा.
२. बेडखालील कचरा आणि अडगळ
अनेकजण बेडखाली जुन्या वस्तू, चपला किंवा कचरा ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार, बेडखालील अडगळीमुळे 'राहु'चा दोष निर्माण होतो. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते, मानसिक शांतता भंग पावते आणि अनावश्यक खर्च वाढतात.
३. अंथरुणावर बसून जेवणे टाळा
बऱ्याच लोकांना बेडवर बसून जेवण्याची सवय असते. पण ही चूक लक्ष्मीला नाराज करू शकते. बेडवर जेवल्याने अन्नाचा अपमान होतो आणि घरात दरिद्रता येते. तसेच, यामुळे झोपेवरही विपरीत परिणाम होतो.
४. बेडरूममध्ये देवाची मूर्ती किंवा फोटो
बेडरूममध्ये देवाची मूर्ती किंवा मृत व्यक्तींचे फोटो लावणे टाळावे. बेडरूम ही एकांताची जागा आहे, तिथे धार्मिक चित्रे लावल्याने वास्तूमध्ये दोष निर्माण होऊ शकतो. त्याऐवजी राधा-कृष्ण किंवा हसऱ्या जोडीचा फोटो लावणे शुभ मानले जाते.
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
५. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा अतिवापर
बेडरूममध्ये मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीचा अतिवापर टाळावा. या वस्तूंमधून निघणाऱ्या लहरी नकारात्मकता पसरवतात. झोपताना डोक्याजवळ मोबाईल ठेवून झोपल्याने मानसिक तणाव आणि पती-पत्नीमध्ये चिडचिड वाढते.
६. बंद पडलेली घड्याळे किंवा इलेक्ट्रिक वस्तू
जर तुमच्या बेडरूममध्ये बंद पडलेले घड्याळ असेल, तर ते त्वरित काढून टाका. बंद घड्याळ हे प्रगती थांबवण्याचे प्रतीक आहे. यामुळे घरात पैशांची आवक थांबते आणि कामे रखडतात.