Valmiki Temple In Pakistan: खुशखबर! पाकिस्तानमधील १२०० वर्ष जुने वाल्मिकी मंदिर पुनश्च हिंदूंच्या ताब्यात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 12:15 IST2022-08-06T12:13:38+5:302022-08-06T12:15:39+5:30
Valmiki Temple In Pakistan: वाल्मिकी मंदिराचा पुनश्च ताबा हे पाकिस्तानस्थित हिंदूंनी दीर्घकाळ दिलेल्या कायदेशीर लढाईचे यश आहे.

Valmiki Temple In Pakistan: खुशखबर! पाकिस्तानमधील १२०० वर्ष जुने वाल्मिकी मंदिर पुनश्च हिंदूंच्या ताब्यात!
पाकिस्तानातील प्राचीन मंदिर: भारत-पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी अनेक प्राचीन मंदिरे पाकिस्तानच्या भागात गेली होती. सद्यस्थितीत ती भग्नावस्थेत आहेत. या मंदिरांपैकी एक वाल्मिकी मंदिर आहे, जे सध्या लाहोरमध्ये आहे.
लाहोरमधील वाल्मिकी मंदिर : पाकिस्तानमध्ये आजही अनेक प्राचीन मंदिरे आहेत, जी देखभालीअभावी भग्नावस्थेत आहेत. मात्र ही मंदिरे आजही हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र आहेत. असेच एक मंदिर पाकिस्तानच्या लाहोरमध्ये आहे, जे १२०० वर्षे जुने आहे. पाकिस्तान सरकारने या वाल्मिकी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची घोषणा केली आहे. त्यावर काही लोकांनी बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचे समजते. चला जाणून घेऊया या मंदिराशी संबंधित काही खास गोष्टी.
१२०० वर्षे जुन्या वाल्मिकी मंदिराचा जीर्णोद्धार
नुकतेच, पाकिस्तान सरकारने लाहोर, पाकिस्तान येथे असलेल्या वाल्मिकी मंदिराच्या नूतनीकरणाची घोषणा केली आहे. अनेक वर्षांपासून या मंदिरावर काही लोकांनी अवैध कब्जा केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रदीर्घ लढ्यानंतर त्याच्या देखभालीची जबाबदारी एका हिंदू संस्थेकडे सोपवण्यात आली आहे. या मंदिरात पूर्वी केवळ वाल्मिकी समाजातील लोकच दर्शन आणि पूजेसाठी जाऊ शकत होते.
ईटीपीबीचे प्रवक्ते अमीर हाश्मी यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत 'मास्टर प्लॅन' अंतर्गत वाल्मिकी मंदिराचा जीर्णोद्धार केला जाईल. ते म्हणाले, "१०० हून अधिक हिंदू, काही शीख आणि ख्रिश्चन नेते वाल्मिकी मंदिरात जमले. हिंदूंनी त्यांचे धार्मिक विधी पार पाडले आणि प्रथमच लंगर (प्रसाद) आयोजित करण्यात आला."
हे शहर भगवान श्री राम यांचे पुत्र लव याने वसवले होते.
पौराणिक मान्यतेनुसार, पाकिस्तानमध्ये स्थित लाहोर शहराची स्थापना भगवान श्री राम यांचे पुत्र लव यांनी केली होती. याला जुन्या पंजाबची राजधानी म्हणत. त्याच वेळी ते लवपूर म्हणूनही ओळखले जात असे.
लाहोरच्या दोनच मंदिरात पूजा केली जाते
लाहोरमध्ये असलेल्या वाल्मिकीच्या मंदिराच्या इतिहासाबद्दल फारसे माहिती नाही. पण हो स्थानिकांच्या माहितीनुसार हे मंदिर १२०० वर्षे जुने आहे. फाळणीपूर्वी येथे शीख आणि हिंदू लोक मोठ्या संख्येने राहत होते आणि त्यावेळी ते श्रद्धास्थान मानले जात होते. लाहोरमध्ये श्री कृष्णा च्या मंदिराव्यतिरिक्त फक्त वाल्मिकी मंदिर आहे, जिथे पूजा केली जाते. आणि आता जीर्णोद्धाराच्या निमित्ताने वाल्मिकी मंदिरातही नित्य पूजा सुरू होईल.