शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

Valmiki Jayanti 2020: आदिकवी महर्षी वाल्मिकी यांची ३१ ऑक्टोबर रोजी जयंती!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: October 31, 2020 7:30 AM

Valmiki Jayanti 2020 : मनुष्याचे कर्म सुधारले तर तोदेखील वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो.

ज्योत्स्ना गाडगीळ 

रामायणाचे रचेते तसेच संस्कृत, ज्योतिष आणि खगोलशास्त्राचे सखोल अभ्यासक महर्षी वाल्मिकी यांचा जन्म दिवस अश्विन शुद्ध पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा ३१ ऑक्टोबर रोजी वाल्मिकी जयंती असणार आहे. 

पौराणिक कथेनुसार महर्षी वाल्मिकी यांचा जन्म महर्षी कश्यप आणि अदिती यांचा नववा सुपुत्र वरुण आणि त्याची पत्नी चर्षणी यांच्या घरी झाला होता. त्यांच्या भावाचे नाव भृगु होते. मात्र, बालपणीच या तेजस्वी बाळाला एका गरीब स्त्रीने चोरून नेले आणि आपल्याकडेच ठेवून घेत त्याचे पालन पोषण केले. वाल्मिकीचा वाल्या झाला. असंगाशी संग जुळला आणि वाल्या दरोडेखोर झाला.

हेही वाचा : क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला, तर पश्चात्तापाचे शंभर क्षण वाचतात!

आपल्या परिवाराचे पालन-पोषण करण्यासाठी तो जंगल परिसरातून येणा-जाणाऱ्या वाटसरूला अडवून त्याला लुटत असे. त्या ऐवजावर त्याची आणि घरच्यांची गुजराण चालत असे. एकदा त्याच जंगलातून महर्षी नारद जात होते. वाल्याने त्यांना अडवले आणि त्यांच्याकडून धन,संपत्तीची मागणी केली. नारद म्हणाले, माझ्या मुखातील नारायण या नावाशिवाय माझ्याजवळ तुला देण्यासारखे काहीच नाही. ते नाव हवे, तर जरूर घे. वाल्याने त्यांना दरडावले. तेव्हा नारदांनी त्याला विचारले, `ज्यांच्यासाठी तू हे पाप करतोयस, ते तरी तुझ्या पापात सहभागी आहेत का? एकदा जाऊन त्यांना विचारून तरी ये. तोवर वाटल्यास मला इथेच बांधून ठेव.'

वाल्या प्रश्नात पडला. त्याने नारदांना जाड दोरीने झाडाला बांधून ठेवले आणि आपण घरी निघून गेला. घरी जाऊन त्यांनी बायको आणि मुलांना आपण करत असलेल्या पापाचे वाटेकरी आहात ना, असे विचारले. तर हे तर तुमचे कर्तव्यच आहे, असे म्हणत सगळ्यांनी जबाबदारी झटकली. खिन्न मनाने वाल्या जंगलात परत आला. त्याने नारदांना सोडले, क्षमा मागितली आणि पापाचे प्रायश्चित्त विचारले. महर्षी नारद म्हणाले, `तू भगवंताचे नाम घे आणि त्याचे कार्य सुरू कर.' वाल्याला `राम' नावाचा मंत्र दिला, परंतु मरा आणि मारा एवढेच ठाऊक असलेल्या वाल्याच्या तोंडून राम नाम निघेना. त्यावर नारदांनी त्याला मरा, मरा म्हणायला सांगितले. ते म्हणता म्हणता आपोआप राम राम नाम येऊ लागले. त्या नामात वाल्या एवढा रंगून गेला, की त्याच्या भोवती मुंग्यांचे वारूळ तयार झाले, तरी त्याला कळले नाही. अखेरीस प्रभुकृपा झाली, त्याची तपश्चर्या फळाला आली. त्या रामनामावरून त्याला रामायण हे महाकाव्य सुचले आणि ते काव्य अजरामर झाले. त्याबरोबरच वाल्यादेखील वाल्मिकी महर्षी म्हणून नावरूपास आला. रामायण हे महाकाव्य एवढे प्रासादिक ठरले, की त्याची रचना आधी झाली आणि त्यानुसार हुबेहुब प्रसंग भविष्यात घडत गेले. 

कसे वागावे, हे रामायणातून शिकावे आणि कसे वागू नये, हे महाभारतातून शिकावे असे म्हणतात. भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने हे दोन्ही धर्मग्रंथ महत्त्वाचे आहेत. पैकी रामायणाचे रचेते महर्षी वाल्मिकी यांना जयंतीनिमित्त अभिवादन करूया आणि रामायणात त्यांनी रेखाटलेला, राम आपल्याही आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करूया. 

श्रीराम जय राम जय जय राम!

हेही वाचा : सद्गुरुसी शरण जाय, त्यासी ब्रह्मप्राप्ती होय!'

टॅग्स :ramayanरामायण