शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Tripuri Purnima 2022: त्रिपुरासुराचा वध करणाऱ्या महादेवाची त्रिपुरी पौर्णिमेला कोणती उपासना करावी, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 12:43 IST

Tripuri Purnima 2022: दिवाळी एवढाच त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव जल्लोषाने केला जातो, पण का? जाणून घ्या!

वैकुंठ चर्तुदशीचा दुसरा दिवस त्रिपुरी पौर्णिमा या नावे साजरा केला जातो. यंदा ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा ही तिथी विभागून आली आहे. याच पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असे म्हणतात. कारण या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला, त्या विजयसोहळ्याची ओळख या पौर्णिमेला मिळाली आणि ती त्रिपुरी तसेच त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाऊ लागली. 

चातुर्मासातील चार महिने भगवान विष्णू शेषसागरात विश्रांती घेत असल्यामुळे त्यांच्या वाटणीच्या कारभाराची सूत्रे महादेवांनी आपल्या हाती घेतली. त्याच वेळेस त्रिपुरासूर नावाचा दैत्य पृथ्वीवर हाहा:कार माजवत होता. ब्रह्मदेवांकडू वरदान मिळाल्यामुळे तो उन्मत्त बनला होता. त्या नियंत्रणात आणण्यासाठी, नायनाट करण्यासाठी सर्व देवतांचा समूह महादेवांकडे आला. तेव्हा महादेवांनी त्रिपुरासूर नावाच्या दैत्याचे पारिपत्य केले आणि त्याचा वध करून भगवान विष्णूंची भेट घेतली. तसेच चार मासांचा कार्यकाल संपवून, वैश्विक व्यवहाराची सूत्रे विष्णूंच्या हाती सोपवून महादेवांनी तपश्चर्येला जाण्यासाठी प्रयाण केले. हरी-हराची ही भेट अविस्मरणीय ठरली. म्हणून या दिवशी जो नर नारी या दोहोंचे स्मरण करून बेल, तुळस वाहील, श्रद्धेन प्रार्थना करेल, त्याला मरणोत्तर वैकुंठप्राप्ती होईल, असा आशीर्वाद महादेवांनी दिला. म्हणून वैकुंठ चर्तुदशी पाठोपाठ त्रिपुरी पौर्णिमा हे दोन्ही सण दिवाळीसारखेच जल्लोषाने साजरे केले जातात. देवांची परस्पर भेट आणि आनंद सोहळा देवदिवाळी म्हणूनही साजरा केला जातो. 

त्रिपुरी पौर्णिमेला चार्तुमासाची सांगता होते. याच्या आदल्या दिवशी म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीला विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो, परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते. 

त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुर प्रकारची वात करून शंकरासमोर दिवा लावला जातो. तसेच घरात, मंदिरात, परिसरात शेकडो दिव्यांनी रोषणाई केली जाते. मंदिरातील दगडी दिपमाळांमध्ये त्रिपुर वात लावून हा उत्सव साजरा केला जातो. तसेच या दिवशी दीपदानही केले जाते. आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातला थोडातरी अंधार दूर व्हावा, ही दीपदानामागील सद्भावना असते. 

प्रबोधिनी एकादशीपासून सुरू झालेल्या तुळशी विवाहाची सांगता त्रिपुरी पौर्णिमेला होते. बौद्ध धर्मात असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी, बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्राचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व उपोसथ व्रत करतात. सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात. शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेव यांची या दिवशी जयंती साजरी केली जाते.