आई-वडिलांच्या मायेने भावंडांना सावरणारे 'थोरले बंधू' संत निवृत्तीनाथ यांची आज जयंती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 11:49 IST2026-02-02T11:48:44+5:302026-02-02T11:49:32+5:30
संत निवृत्तीनाथ महाराज जयंती: वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे आद्य गुरू संत निवृत्तीनाथ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेऊया.

आई-वडिलांच्या मायेने भावंडांना सावरणारे 'थोरले बंधू' संत निवृत्तीनाथ यांची आज जयंती!
"निवृत्ती प्रवृत्ती विठ्ठल हरपली..." असे म्हणत संपूर्ण विश्वाला विठ्ठल भक्तीची ओढ लावणारे आणि ज्ञानेश्वर-मुक्ताबाई-सोपानदेव या भावंडांचे मार्गदर्शक, संत निवृत्तीनाथ महाराज यांची जयंती माघ कृष्ण प्रतिपदेला साजरी केली जाते, तो आजचाच दिवस!
गुरुप्रतिपदा २०२६: गुरुप्रतिपदा तिथी का साजरी करतात? या दिवसाचे महात्म्य काय? पाहा, मान्यता…
आद्य गुरू आणि मार्गदर्शक
संत निवृत्तीनाथ हे केवळ ज्ञानेश्वरांचे बंधू नव्हते, तर ते त्यांचे आध्यात्मिक गुरू होते. गहिनीनाथांकडून त्यांना मिळालेली 'नाथ संप्रदायाची' दीक्षा त्यांनी ज्ञानेश्वरांना दिली. जर निवृत्तीनाथांनी आज्ञा केली नसती, तर कदाचित आपल्याला 'भावार्थ दीपिका' अर्थात 'ज्ञानेश्वरी' सारखा अजरामर ग्रंथ मिळाला नसता.
कठीण प्रवासात धैर्याचा डोंगर
आई-वडिलांच्या देहत्यागानंतर या चारही भावंडांनी जो सामाजिक छळ सोसला, त्या काळात निवृत्तीनाथांनी धाकट्या भावंडांचे रक्षण केले. संन्याशाची मुले म्हणून हिणवले जात असतानाही, त्यांनी कधीही संयम सोडला नाही. उलट, समाजाला क्षमा करण्याचे आणि भक्तीचा मार्ग धरण्याचे संस्कार त्यांनी आपल्या भावंडांवर केले.
Vastu Tips: वास्तू शास्त्रानुसार, घरातली तुळस वाळली म्हणजे तुमच्या कुटुंबावरील मोठं विघ्न टळलंय!
साहित्यातील योगदान आणि 'निवृत्ती' विचार
संत निवृत्तीनाथांचे अभंग अतिशय गहन आणि तत्त्वज्ञानाने भरलेले आहेत. त्यांनी सुमारे ३०० पेक्षा जास्त अभंगांची रचना केली आहे. त्यांच्या अभंगातून 'निवृत्ती' म्हणजे जगापासून पळून जाणे नव्हे, तर विषयांच्या मोहातून मुक्त होऊन पांडुरंगाच्या चरणी विलीन होणे, हा विचार मांडला आहे.
त्र्यंबकेश्वर: विश्रांतीचे स्थान
आपल्या भावंडांनी आपापली अवतारकार्ये पूर्ण केल्यानंतर, संत निवृत्तीनाथांनी नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली. आजही लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने या स्थानी नतमस्तक होतात.
Tarot Card: नोकरी व्यवसायात प्रगतीचा काळ; पण सबुरीने घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य