कोजागरी(Kojagiri Purnima 2025) आणि नवान्न पौर्णिमा(Navanna Purnima 2025) ही एकाच तिथीला येते, ती म्हणजे अश्विन पौर्णिमेला; जिला आपण शरद पौर्णिमा असेही म्हणतो. ही तिथी अनेक नावांनी ओळखली जाते. त्यामागे वैशिष्ट्यपूर्ण कथादेखील आहेत. पण जेव्हा ही तिथे दोन दिवसात विभागून येते, तेव्हा कोजागरी संध्याकाळी आणि नवान्न पौर्णिमा त्याच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी साजरी केली जाते.
आठवड्याची सुरुवात गजकेसरी योगाने; करिअर, कमाईत ६ राशींना मिळणार भरघोस फायदे!
काल ६ ऑक्टोबर रोजी आपण कोजागरी साजरी केली, या तिथीने ७ ऑक्टोबरचा सूर्योदय पाहिला, त्यामुळे आज आपण नवान्न पौर्णिमा साजरी करणार आहोत. ती कशी करावी, कोणते विधी करता येतात, पूजा विधीसाठी योग्य मुहूर्त कोणता असे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर संपूर्ण माहिती वाचा.
दसऱ्याला आपण झेंडू आणि आम्रपल्लवाचे तोरण तर लावतोच, शिवाय भाताच्या लोंबी, आंब्याचे पान, कुरडूचे फूल, झेंडूचे फूल यापासून तयार केलेले तोरणही लावतो. हे तोरण प्रतीक असते नवान्न पौर्णिमेला केल्या जाणाऱ्या नवधान्याच्या पूजेचे!
गणपतीनंतर कमी कालावधीत तयार होणाऱ्या पिकांची कापणी केली जाते. भात हे त्यापैकी एक धान्य! नवरात्रीत नुकताच कापणी करून आलेला भात जेवणात घेण्यापूर्वी किंवा बाजारात विकायला नेण्यापूर्वी देवाला त्याच तांदुळाचा भात किंवा खीर असा नैवेद्य केला जातो. त्याची पूजा केली जाते. म्हणून दसऱ्यालाही भाताच्या लोम्बी तोरणात अडकवून ते वैभवाचे प्रतीक म्हणून वापरले जाते.
कोजागिरीला आपण लक्ष्मीची, चंद्राची तर पूजा करतोच, पण नवान्न पौर्णिमेच्या निमित्ताने पूजा करायची ती माता अन्नपूर्णेची, कारण तीच आपल्याला धन धान्य देते. तिच्या कृपेने सर्वांना सुख समृद्धी प्राप्त होउदे, हीच प्रार्थना करायची आणि शेगडीची पूजा करून तांदळाच्या खिरीचा नैवेद्य अर्पण करावा.
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
नवान्न पौर्णिमेला म्हणा हा श्लोक :
स्वयं पञ्चाननः पुत्रौ गजाननषडाननौ।दिगम्बरः कथं जीवेदन्नपूर्णा न चेद्गृहे॥
पाच मुखे असणारे शंकर; गजमुख गणेश आणि सहा मुख असणारा कार्तिकेय अशी खाणारी बारा तोंडे घरी असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरळीत चालला आहे; कारण त्याच्या घरी अन्नपूर्णा गृहिणी म्हणून आहे. शिवांपासून तर जगभरातल्या सगळ्यांचे संसार ज्यांच्यामुळे सुरळीत चालले आहेत अशा गृहिणींच्या रुपात असणाऱ्या अन्नपूर्णेला नमन!
अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरः प्राणवल्लभे ।ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ।।
Web Summary : Navanna Purnima, coinciding with Kojagiri, is celebrated with Annapurna Puja for prosperity. Offer rice pudding, and recite the shloka honoring Annapurna, the provider of nourishment. The festival emphasizes gratitude for the harvest and seeks blessings for abundance.
Web Summary : कोजागिरी के साथ नवान्न पूर्णिमा, समृद्धि के लिए अन्नपूर्णा पूजा के साथ मनाई जाती है। चावल की खीर अर्पित करें और अन्नपूर्णा, पोषण प्रदाता का सम्मान करने वाला श्लोक पढ़ें। यह त्योहार फसल के लिए आभार व्यक्त करता है और प्रचुरता के लिए आशीर्वाद चाहता है।