‘या’ ४ अक्षराने नाव सुरु होणाऱ्या मुली असतात लकी; लक्ष्मी देवीची लाभते कृपा, घरात येते भरभराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 14:20 IST2022-03-23T14:19:04+5:302022-03-23T14:20:00+5:30
या मुली भाग्यवान मानल्या जात असून, त्यांच्या जन्मानंतर वडिलांचे नशीब चमकते, सुख-सुविधांची कमतरता कधीच नसते, असे सांगितले जाते.

‘या’ ४ अक्षराने नाव सुरु होणाऱ्या मुली असतात लकी; लक्ष्मी देवीची लाभते कृपा, घरात येते भरभराट
भारतात प्राचीन काळापासून अनेक पुराणे, ग्रंथ, शास्त्रे यांना फार महत्त्व आणि मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रही प्राचीन काळापासून मान्यता पावलेले शास्त्र आहे. खगोलाच्या आधारे जन्मकुंडलीचा अभ्यास करून व्यक्तीविषयी भूत, भविष्यातील घटनांचे अंदाज ज्योतिषशास्त्रात बांधले जातात. नक्षत्र, राशी, ग्रह यांच्या माध्यमातून तर्क लावले जातात. ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखा असून, त्या माध्यमातूनही काही गोष्टी सांगितल्या जातात.
ज्योतिषशास्त्रानुसार, अशी काही अक्षरे आहेत, ज्या मुलींची नाव या अक्षरांनी सुरु होतात, त्या भाग्यवान मानल्या जातात. त्यांच्या आयुष्यात सुख-सुविधांची कधीच कमतरता नसते. त्यांच्या जन्मानंतर वडिलांचे नशीब चमकते असे म्हणतात. या मुली त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी खूप भाग्यवान मानल्या जातात. आयुष्यात पैसा आणि अन्नाची कमतरता कधीच नसते. ते स्वभावाने मैत्रीपूर्ण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर त्यांचे प्रेम असते, असे मानले जाते.
A अक्षर
ज्या मुलींचे नाव A अक्षराने सुरू होते, या मुली आनंदी स्वभावाच्या असतात. त्या स्वतःही आनंदी राहतात. तसेच जवळच्या लोकांनाही आनंदी ठेवतात. या मुली मेहनती स्वभावाच्या असतात. परिश्रमाच्या जोरावर त्या जीवनात यश, प्रगती साध्य करू शकतात. त्यांचे भाग्य खूप चांगले असते, त्यामुळे त्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळतो. त्या वडिलांसाठी खूप भाग्यवान मानल्या जातात.
D अक्षर
ज्या मुलींचे नाव D अक्षराने सुरू होते, त्यांच्या मनात कोणत्याच गोष्टी राहत नाहीत. त्या स्वच्छ मनाच्या असतात. या मुलींचे कुटुंबावर खूप प्रेम करते आणि त्या मुली मोठ्यांचा आदर करतात. या मुली वडिलांसाठी खूप भाग्यवान मानल्या जातात. त्यांच्या जन्मानंतर त्यांच्या कुटुंबात आर्थिक संपन्नता येते असे म्हणतात.
L अक्षर
ज्या मुलींचे नाव L अक्षराने सुरू होते, त्या बुद्धिमान आणि हुशार असतात. त्या त्यांच्या कुटुंबाला कधीच एकटे सोडत नाही. या मुली त्यांच्या वडिलांचे नशीब उजळवतात असे मानले जाते. त्यांच्या आयुष्यात पैसा आणि अन्नाची कमतरता कधीच नसते. या मुली त्यांच्या कारकिर्दीत मोठ्या हुद्द्यावर काम करतात.
P अक्षर
ज्या मुलींचे नाव P अक्षराने सुरू होते, या मुली खूप भावूक असतात. कुटुंबाच्या आनंदासाठी काहीतरी खास करत असतात. या मुलींचा त्यांच्या वडिलांवर जास्त जीव असतो. या मुली त्यांच्या वडिलांसाठी खूप भाग्यवान असतात असे मानले जातात.