शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

आयुष्यात दोनच अशा गोष्टी आहेत, ज्या दिल्याने वाढतात!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: April 08, 2021 12:28 PM

या दोन्ही गोष्टी आपल्याकडे असतात पण आपण त्याचा वापर करत नाही. या दोन्ही गोष्टीची जगाला गरज आहे. कधी देऊन तर बघा, मोबदल्यात किती आनंद मिळतो ते कळेल!

आपण केवळ कुठून काय, कधी मिळेल याचा सतत विचार करत असतो. त्यामुळे कुठे, कधी, काय द्यायचे हा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. कारण आपल्याला घेण्याची सवय लागलेली आहे, देण्याची नाही. दिल्याने गोष्टी कमी होतात आणि घेतल्याने वाढतात, एवढाच हिशोब आपल्याला माहित असतो. परंतु अशा दोन गोष्टी आहेत, ज्या दिल्याने वाढतात. त्याचा वापर आपण कधी केलाय का? त्या दोन गोष्टी म्हणजे सुहास्य आणि सदिच्छा! या दोन्ही गोष्टी आपल्याकडे असतात पण आपण त्याचा वापर करत नाही. या दोन्ही गोष्टीची जगाला गरज आहे. कधी देऊन तर बघा, मोबदल्यात किती आनंद मिळतो ते कळेल!

एकदा एका बांधकामाच्या ठिकाणी अभियंता देखरेख ठेवत होता. काम सुरळीत चालले होते. अशातच त्या धुळीने माखलेल्या परिसरात एक बालमूर्ती डोक्यावर वीटांचा भार वाहून नेत होती. अभियंत्याने हाक मारून त्या मुलाला जवळ बोलावले. त्याला कोणी कामावर ठेवले म्हणून विचारणा केली. मुलगा घाबरला, तो हात जोडून म्हणाला, `मीच ठेकेदाराच्या हातापाया पडून हे काम मिळवले आहे, माझे काम काढून घेऊ नका.'

अभियंता म्हणाला, `बालमजरांकडून काम करून घेणे हा गुन्हा आहे. तुझे वय काम करण्याचे नाही, शाळेत जाण्याचे आहे. तू शाळेत जात नाहीस का? तुझ्या वडिलांनी तुला कामाला जा सांगितले का?'

मुलगा म्हणाला, `नाही, माझ्या आई वडिलांनी मला शाळेत पाठवले होते. तिथे खिचडी मिळते म्हणून. पण त्याने फक्त माझे एकट्याचे पोट भरले असते. ते दोघे उपाशी राहिले असते. म्हणून शाळेत न जाता मी इथे कामाला आलो. रोजंदारी मिळाली, तर आई वडिलांचेही पोट भरू शकेन.''तुझे वडील काम करत नाहीत का?'- अभियंता म्हणाला.'करतात ना, इथे तेच काम करत होते. परंतु गेल्या आठवड्यात सामानाची ने आण करताना अपघात झाला आणि त्यांचा पाय जखमी झाला. त्यामुळे ते कामाला येऊ शकले नाहीत आणि आमच्या घराचे अन्न पाणी बंद झाले. म्हणून मी कामावर आलो.'

मुलाचे बोल ऐकून अभियंत्याला आपले बालपण आठवले आणि कष्ट करून इथवर केलेला प्रवास आठवला. अभियंता म्हणाला, `तुला पाढे पाठ आहेत? कितीपर्यंत येतात? मला लिहून दाखवशील?' 

मुलगा हुशार होता. हो म्हणत लगेच त्याने कागद पेन्सिल घेऊन पंधरा पर्यंतचे पाढे स्वच्छ हस्ताक्षरात लिहून दाखवले. ते पाहून अभियंत्याने त्याची पाठ थोपटली आणि ठेकेदाराला बोलावून घेत पंधरा दिवसांचा पगार मुलाला द्यायला लावला. तसेच त्याच्या वडिलांच्या उपचाराची जबाबदारीही घ्यायला सांगितली. अभियंता मुलाला म्हणाला, 'बाळा, ही तुझी रोजंदारी नाही, तर हा पगार आहे. जो शिक्षण पूर्ण करून नोकरी केल्यावर मिळतो. तू इमानदारीने आणि हुशारीने पंधरा पाढे लिहिले, त्याचा पंधरा दिवसांचा पगार. पुढच्या पंधरा दिवसात १६-३० पाढे पाठ करून ये आणि आणखी पंधरा दिवसांचा पगार घेऊन जा. तोवर तुझे वडील बरे होतील आणि तुला मजुरी न करता शाळेत जाता येईल. तुझी खरी जागा शाळेत आहे. मेहनत घ्यायची तर शिक्षणात घे, बाकी गोष्टी आपोआप मिळतील. भविष्यात तूही माझ्यासारखा अभियंता होशील आणि दुसऱ्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व समजवून सांगशील.'

मुलगा आनंदाने घरी गेला. त्याचे आयुष्य सावरता आले, याचा अभियंत्याला आनंद झाला. त्याने एकाच वेळी सुहास्य आणि सदिच्छा यांची भेट देऊन मुलाला सन्मार्गाला लावले. तेच काम आपल्यालाही कोणाच्या बाबतीत करता आले तर किती बरे होईल ना?