Tarot Card: येत्या आठवड्यात चिंता मिटेल की वाढेल? जाणून घ्या तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 13:18 IST2026-03-14T13:18:09+5:302026-03-14T13:18:27+5:30

Tarot Card: टॅरो मार्गदर्शन वाचण्यासाठी मनामध्ये एखादा विषय किंवा प्रश्न ठेवून तीनपैकी कोणताही एक नंबर निवडा आणि नंबरप्रमाणे मार्गदर्शन वाचा

Tarot Card: Will anxiety disappear or increase in the coming week? Know your weekly tarot prediction | Tarot Card: येत्या आठवड्यात चिंता मिटेल की वाढेल? जाणून घ्या तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य 

Tarot Card: येत्या आठवड्यात चिंता मिटेल की वाढेल? जाणून घ्या तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य 

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
१५ मार्च ते २१ मार्च
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन वाचण्यासाठी १/२/३ पैकी कोणताही एक नंबर निवडा. नंबर निवडताना मनामध्ये एखादा विषय किंवा प्रश्न ठेवून नंबर निवडा आणि मग त्या नंबर साठी तुमच्या विषयानुसार किंवा प्रश्ननुसार मार्गदर्शन वाचा! 

 नंबर १: 

वैयक्तिक आयुष्य - घरात किंवा कुटुंबात एखादा विश्वासघात होऊ शकतो. त्यामुळे सावधपणे वागा!
नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात हातातून काहीतरी निसटण्याची शक्यता आहे. तुम्हाला प्रामाणिकपणे वागण्याची आणि बोलण्याची गरज आहे.
फायनान्स - आर्थिक बाबतीत एखादी संधी चुकण्याची शक्यता आहे. सध्या निर्णय घेऊ नका.
रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत अपेक्षाभंग होऊ शकतो. एकमेकांशी नीट न बोलल्यामुळे वादाचे प्रसंग येऊन त्रास होऊ शकतो. बाहेरच्या लोकांमुळे नात्यात   ताण येत नाही ना याची काळजी घ्या!
शिक्षण/परीक्षा - काहीतरी चुकामुक होण्याची शक्यता आहे. शांतपणे एकाग्रपणें अभ्यास करा आणि परीक्षा द्या!
खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात एखादे नुकसान होण्याची शक्यता आहे. गरज असेल तरंच व्यवहार करा!
कोर्ट कचेरी - या बाबतीत समोरच्या बाजूकडून एखादा धक्का दिला जाऊ शकतो. आपल्याकडून जास्तीची माहिती दुसरीकडे पोहोचत नाहीये ना याची काळजी घ्या.
आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत थोडीशी चूक किंवा कुपथ्य अंगाशी येऊ शकतं त्यामुळे अजिबात रिस्क घेऊ नका. औषधं पथ्य सांभाळा.
प्रवास -  गरजेपुरताच प्रवास करा. फार जोखीम उचलू नका. प्रवासात सामानाकडे लक्ष द्या!

नंबर २: 

वैयक्तिक आयुष्य - घरात तुम्हाला तुमचा बराच वेळ आणि शक्ती द्यावे लागणार आहे. कुठल्यातरी गोष्टीची वाट पाहावी लागणार आहे! संयम ठेवा!
नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात तुमच्यावर बरेच कष्ट करण्याची वेळ येईल. धीराने वागा. एखाद्या कामाला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागेल.
फायनान्स - आर्थिक बाबतीत एखादा फायदा संभवतो. दिलेले पैसे परत मिळू शकतात.
रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत एखादे उत्तर मिळायला किंवा पुढे वाढायला वेळ लागेल. विश्वास संपादन करण्यासाठी वेळ लागेल!
शिक्षण/परीक्षा - तुमच्या कष्टाचे सोने होईल. त्यामुळे प्रयत्न पूर्ण करा. प्रामाणिकपणे परीक्षा द्या!
खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात आर्थिक फायदा होऊ शकतो. योग्य किंमतीत व्यवहार होईल!
कोर्ट कचेरी - कोर्ट व्यवहारात तुमच्या तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. तुमच्या कष्टाचे परिणाम लगेच मिळणार नाहीत.
आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत सुधारण व्हायला वेळ लागेल. पण चिंता कमी होईल एवढं नक्की!
प्रवास - प्रवासात विनाकारण विलंब होईल. कुठे ट्रॅफिक मधे अडकण्याची किंवा गाड्यांसाठी थांबण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे हातात वेळ ठेवून निघालेले चांगले!

नंबर ३: 

वैयक्तिक आयुष्य - घरात किंवा कुटुंबात एक दिलासादायक घटना घडेल. ताणतणाव कमी होतील!
नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात एक काम पूर्ण होईल. किंवा एखाद्या अवघड कामातून तुमची सुटका होईल. एक नवे काम देखील मिळू शकते!  
फायनान्स - आर्थिक बाबतीत अडकलेल्या गोष्टीत मार्ग मोकळा होईल. अगदी मनासारखे नाही पण आत्ताचे काम भागेल अशी आर्थिक परिस्थिती राहील!
रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत नव्याने नाते फुलेल. एकमेकांवर पुन्हा एकदा प्रेम बसेल. दुरावा आला असेल तर तो मिटेल. नवीन वाटचाल संभवते!
शिक्षण/परीक्षा - अभ्यासाच्या बाबतीत सुटेकचा निःश्वास टाकला जाईल. शेवट गोड होण्याची शक्यता आहे!
खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात तुम्हाला नवीन संधी मिळेल. पूर्वीच्याच ठिकाणी किंवा आधीही एकदा व्यवहार केला असेल अशा ठिकाणी व्यवहार लाभदायक ठरेल!
कोर्ट कचेरी - कोर्ट व्यवहारात निकाल लागण्याची शक्यता आहे. पूर्णपणे तुमच्या बाजूने नसला तरी तुम्हाला दिलासा मिळेल असा निर्णय होण्याची शक्यता आहे!
आरोग्य - आरोग्यात चांगली सुधारणा होईल. एका दीर्घकाळच्या त्रासातून किंवा तक्रारीतून तुमचे सुटका होण्याची शक्यता आहे.
प्रवास - प्रवासात अनुकूल वातावरण राहील. कुठेतरी अडकून पडल्यासारखे वाटत असेल तर एखादी लहान का असेना पण सहल करुन या, त्याने सकारात्मकता मिळेल!

या मार्गदर्शनाबद्दल आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की ईमेल द्वारे सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही ईमेल द्वारे विचारू शकता.
ईमेल संपर्क: sumedhranade531@gmail.com

श्रीस्वामी समर्थ.

Web Title : टैरो राशिफल: इस सप्ताह चिंताएं कम होंगी या बढ़ेंगी?

Web Summary : साप्ताहिक टैरो मार्गदर्शन व्यक्तिगत जीवन, करियर, वित्त, रिश्तों, शिक्षा और स्वास्थ्य में अंतर्दृष्टि प्रदान करता है। एक नंबर चुनें और जानें कि 15-21 मार्च के सप्ताह के लिए कार्ड क्या प्रकट करते हैं।

Web Title : Tarot forecast: Will worries ease or increase this week?

Web Summary : Weekly tarot guidance offers insights into personal life, career, finance, relationships, education, and health. Choose a number and discover what the cards reveal for the week of March 15-21.