Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 08:57 IST2025-12-13T08:56:53+5:302025-12-13T08:57:34+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून किंवा राशीनुसार तुम्हाला साप्ताहिक भविष्य जाणून घेता येईल.

Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
१४ ते २० डिसेंबर
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
नंबर १: (राशी: मेष/कर्क/तूळ/मकर)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी एक अवघड वळण घेऊन येत आहे. तुमचे कष्ट या काळात कमी प्रमाणात फलित होतील म्हणून जास्त अपेक्षा न ठेवलेल्या चांगल्या. वास्तविक परिस्थिती पेक्षा तुमची मानसिक स्थिती कशी आहे यावर तुमचा हा काळ अवलंबून राहील. म्हणून "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण!" हे लक्षात ठेवा!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमच्या मनाला येईल तसे वागायला जाऊ नका कारण त्यात तुमची चुकण्याची शक्यता जास्त आहे. कोणत्याही प्रसंगात कोणाचा तरी आधार घेऊन, सल्ला घेऊन पुढे चाला. तुमच्याकडे काय नाही यापेक्षा तुमच्याकडे काही उत्तम आहे, काय चांगले आहे याकडे लक्ष केंद्रित करा आणि त्यावर काम करा, यश नक्कीच येईल!
नंबर २: (राशी :वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी खोळंबलेला काळ घेऊन येत आहे. गोष्टी अडकल्यासारख्या वाटतील. त्यामुळे तुम्हाला बेचैन वाटू शकतं. कामाच्या ठिकाणी तेच तेच काम करुन कंटाळा येण्याचा संभव आहे. मनातून उत्साह आणि ऊर्जा कमी राहील. अपेक्षित गती किंवा परिणाम मिळणार नाहीत. सगळं असूनही काहीतरी नसल्याची भावना निर्माण होईल!

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमच्याकडे जे चांगलं आहे, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जे नाही त्यामुळे स्वतःला त्रास करुन घेण्यापेक्षा आहे त्यात आनंद मानायला शिका. इतरांमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर संयम ठेवा, माणसं आणि नाती पटकन तोडायला जाऊ नका. विवेकाने विचार करा. कृतज्ञ रहा, कृतज्ञतेचा सराव करा.
नंबर ३: (राशी मिथुन/कन्या/धनू/मीन)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी उत्साहाचा आणि आनंदाचा आहे. काहीतरी नवीन शिकायला मिळेल. अडकलेल्या गोष्टी काही प्रमाणात पुढे सरकतील. दुरावलेली नाती जवळ येतील. एखादी आनंदाची बातमी येऊ शकते. तुम्हाला समाधान लाभेल. लहान मुलांमध्ये मन रमेल. तुम्हाला आतून सकारात्मक आणि तजेलदार वाटेल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला मुंगी होऊन साखर खाण्याची गरज आहे. सगळ्यांना मदत करा, दुसऱ्याचे एखादे काम स्वतःहून करा! लहान मुलं जशी निरागसपणे माफी मागून किंवा माफ करून सोडून देतात तसं तुम्हाला वागण्याची गरज आहे. "चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नं" या प्रमाणे मन आनंदी ठेवलंत तर घर आनंदी राहील हे लक्षात ठेवून वागा.
श्रीस्वामी समर्थ.