Tarot Card: आवश्यक असेल तरच प्रवास करा; कठीण प्रसंगांची शक्यता; वाचा साप्ताहिक भविष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 13:30 IST2026-03-21T12:51:59+5:302026-03-21T13:30:35+5:30
Tarot Card: टॅरो मार्गदर्शन वाचण्यासाठी मनामध्ये एखादा विषय किंवा प्रश्न ठेवून तीनपैकी कोणताही एक नंबर निवडा आणि नंबरप्रमाणे मार्गदर्शन वाचा

Tarot Card: आवश्यक असेल तरच प्रवास करा; कठीण प्रसंगांची शक्यता; वाचा साप्ताहिक भविष्य
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
२२ ते २८ मार्च
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन वाचण्यासाठी १/२/३ पैकी कोणताही एक नंबर निवडा. नंबर निवडताना मनामध्ये एखादा विषय किंवा प्रश्न ठेवून नंबर निवडा आणि मग त्या नंबर साठी तुमच्या विषयानुसार किंवा प्रश्नानुसार मार्गदर्शन वाचा!
नंबर १:
वैयक्तिक आयुष्य - घरात किंवा कुटुंबात मानसिक अस्थिरता राहण्याची शक्यता आहे. काहीतरी गमावण्याचा संभव आहे. मन दुखावले जाऊ शकते. संयम ठेवा!
नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात केलेल्या कष्टाला डावलून एखादी घटना घडेल. त्याने मनात खदखद निर्माण होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवा!
फायनान्स - आर्थिक बाबतीत अपेक्षित लाभ येण्याची शक्यता खूप कमी आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय टाळा!
रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत एखादा अपेक्षाभंग होऊ शकतो. पण अधिक खचून न जाता तुमच्याकडे काय आहे याचा विचार करा. नकारात्मक विचार किंवा स्वतःला कमी लेखणे असे करणे टाळा!
शिक्षण/परीक्षा - जास्त कष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. एखादा पेपर हवा तसा जाणार नाही. गेलेल्याचा जास्त विचार करु नका. उद्याचा विचार करा!
खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात एखादे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खात्री करुन मगंच पैसे गुंतवा!
कोर्ट कचेरी - या बाबतीत मनाप्रमाणे यश येणे या आठवड्यात कठीण आहे. उलट समोरच्या पक्षाकडून त्रासदायक घटना घडू शकते.
आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत काळजी जास्त घेतलेली चांगली. विशेष करुन सर्दी खोकला व्हायरल त्रासापासून जपा. दूषित पाणी पिणे टाळा.
प्रवास - गरजेपुरताच प्रवास करा. फार जोखीम उचलू नका. अती ध्येयवादी नियोजन नको!

नंबर २:
वैयक्तिक आयुष्य - घरात किंवा कुटुंबात एक प्रकारचा ताण येण्याची शक्यता आहे. किरकोळ गोष्टींवरून भांडणे होऊ शकतात. राग डोक्यात घालून वाईट बोलू नका!
नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात कुठेतरी विजय चुकण्याची शक्यता आहे. बोलण्याचे वेगळे अर्थ निघू शकतात त्यामुळे बोलताना विचार करून बोला!
फायनान्स - आर्थिक बाबतीत तुम्ही गर्व करून चालणार नाही. स्वतःचा बडेजाव दाखवू नका. इतरांना आर्थिक मदत करा!
रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत कोणा एकाचा वापर होतो आहे असं वाटू शकतं. त्यामुळे नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. एकमेकांचा आदर करा. मोकळे बोला.
शिक्षण/परीक्षा - अती शहाणा त्याचा बैल रिकामा अशी सूचना तुम्हाला दिली जात आहे. त्यामुळे स्वतःचे वर्चस्व दाखवायला जाऊ नका.
खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात एखादे व्यवहारापेक्षा भांडण होण्याचा संभव आहे म्हणून सध्या मोठे व्यवहार टाळलेले बरे!
कोर्ट कचेरी - या बाबतीत पराभव होण्याची शक्यता आहे. वाईट पातळीवर जाऊ नका. कधीतरी स्वतःची माघार स्वीकारावीच लागते हे लक्षात ठेवा!
आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत कोणाबरोबर वहावत जाऊन काहीतरी खाणे पिणे केल्यामुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे जे खाल प्याल ते विचारपूर्वक करा.
प्रवास - प्रवासात अचानक नैसर्गिक अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता आहे त्यामुळे तशा तयारीने निघा. पटकन कोणावर विश्वास ठेवून प्रवासात निर्णय घेऊ नका.
नंबर ३:
वैयक्तिक आयुष्य - घरात तुम्हाला तुमचा बराच वेळ आणि शक्ती द्यावी लागणार आहे. कुठल्यातरी गोष्टीची वाट पाहावी लागणार आहे! संयम ठेवा!
नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात तुमच्यावर बरेच कष्ट करण्याची वेळ येईल. धीराने वागा. एखाद्या कामाला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागेल.
फायनान्स - आर्थिक बाबतीत एखादा फायदा संभवतो. दिलेले पैसे परत मिळू शकतात.
रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत एखादे उत्तर मिळायला किंवा पुढे वाढायला वेळ लागेल. विश्वास संपादन करण्यासाठी वेळ लागेल!
शिक्षण/परीक्षा - तुमच्या कष्टाचे सोने होईल. त्यामुळे प्रयत्न पूर्ण करा. प्रामाणिकपणे परीक्षा द्या!
खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात आर्थिक फायदा होऊ शकतो. योग्य किंमतीत व्यवहार होईल!
कोर्ट कचेरी - कोर्ट व्यवहारात तुमच्या तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. तुमच्या कष्टाचे परिणाम लगेच मिळणार नाहीत.
आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत सुधारण व्हायला वेळ लागेल. पण चिंता कमी होईल एवढं नक्की!
प्रवास - प्रवासात विनाकारण विलंब होईल. कुठे ट्रॅफिक मधे अडकण्याची किंवा गाड्यांसाठी थांबण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे हातात वेळ ठेवून निघालेले चांगले!
या मार्गदर्शनाबद्दल आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की ईमेल द्वारे सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही ईमेल द्वारे विचारू शकता.
ईमेल संपर्क: sumedhranade531@gmail.com
श्रीस्वामी समर्थ.