Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 11:29 IST2025-07-12T11:29:08+5:302025-07-12T11:29:30+5:30

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य जाणून घेऊ शकता. 

Tarot Card: This week, accept the situation, think holistically without getting involved in emotions! | Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!

Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
१३ ते १९ जुलै
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============

नंबर १: (राशी मेष/कर्क/तूळ/मकर)

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी पेलायला अवघड असला तरी तुम्ही संथपणे पुढे चालत राहाल. किरकोळ दुखापत होऊ शकते म्हणून सावकाश काम करा. मार्ग पटकन सापडणार नाहीत. बरीच जबाबदारी अंगावर पडेल. पण तुम्हाला त्रास देणाऱ्या काही गोष्टी आता संपणार आहेत. एक कटू शेवट होऊन, त्यापुढे एक सक्षम सुरुवात होणार आहे, हा विश्वास ठेवा!

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही परिस्थितीशी झगडायला जाऊ नका. लोकांशी बोलताना नम्रपणे आणि कमीपणा घेऊन बोललात तर त्रास कमी होईल. आत्ता तुमचे वर्चस्व दाखवण्याची वेळ नाही. थोडे धडपडलात तरी खचून जाऊ नका. विश्रांती घ्या. मान, पाठ, कंबर आणि डोकं हे काही दुखेल असं मुद्दाम वागू नका. झोप पूर्ण घ्या, रात्रीचे वाद आणि चर्चा टाळा.

नंबर २: (राशी वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ)

काय घडू शकते?
हा सप्ताह तुम्हाला बुद्धीचातुर्य दाखवण्याचे प्रसंग घेऊन येत आहे. महत्वाचे संवाद घडतील. कडक वागावं लागेल, दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यापेक्षा नियम आणि कर्तव्य यांना प्राधान्य द्यावं लागेल. वरिष्ठ लोकांच्या प्रश्नांना सामोरे जावं लागेल. काही प्रमाणात वाद संभवतात. कामामध्ये नियोजनाचा, आराखडा तयार करण्याचा एक टप्पा गाठला जाईल!

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला तुमचं बोलणं, एकदम स्पष्ट ठेवण्याची गरज आहे. मुळमुळीत उत्तर न देता, जे बोलाल ते आत्मविश्वासाने बोला आणि तसं वागा. संशयाला, खोट्याला अजिबात जागा ठेवू नका. पक्षपात करू नका. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन मग निर्णय घ्या. स्पष्ट संवाद ठेवा. लोकप्रिय नको, न्यायप्रिय आणि नीतीप्रिय वागा.

नंबर ३: (राशी मिथुन/कन्या/धनू/मीन)

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी काहीसा अवघड असणार आहे. बऱ्याच गोष्टी मनाप्रमाणे घडणार नाहीत. वादविवाद, स्पर्धा, मतभेद आणि गुंतागुंतीचे प्रसंग संभवतात. वाहन सावकाश चालवा. मतभेदातून अस्थिर परिस्थिती निर्माण होऊ शकते. एखादी न पटणारी गोष्ट करावी लागू शकते. पण तुम्ही जिद्दीने आणि स्वबळावर प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्याल.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही शांत राहण्याची आहे. उग्रपणे, अविचाराने  निर्णय घेऊ नका. लोकांचे मत तुमच्या बाजूने नसल्याने जरा धीराने पुढे चाला. तुमच्या हाताबाहेर असलेल्या गोष्टींमध्ये फार लक्ष घालू नका. लढायला जाऊ नका. टोकाच्या प्रसंगात समतोल राखा. "विकास हा नेहमी प्रतिकूल परिस्थितीतूनच होतो" हे लक्षात ठेवून वागा!

संपर्क : ९५६१०९३७४०

श्रीस्वामी समर्थ.

Web Title: Tarot Card: This week, accept the situation, think holistically without getting involved in emotions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.