Tarot Card: येत्या आठवड्यात वर्ष बदलतेय, त्याबरोबर भाग्यही बदलणार? वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 12:25 IST2025-12-27T12:24:15+5:302025-12-27T12:25:32+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तसेच राशीनुसार तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.

Tarot Card: येत्या आठवड्यात वर्ष बदलतेय, त्याबरोबर भाग्यही बदलणार? वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
२८ डिसेंबर ते ३ जानेवारी
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
नंबर १: (राशी : मिथुन/कन्या/धनू/मीन)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी एकाच वेळी अनेक पर्याय घेऊन येणार आहे. निरनिराळ्या गोष्टींमुळे निर्णय घ्यायला अवघड जाईल. मल्टी टास्किंग करावं लागेल. पण यांपैकी कोणतीही गोष्ट हवी तशी पुढे सरकणार नाही. एकूण थोडी तारांबळ उडण्याची शक्यता आहे. हवे ते साध्य होण्यासाठी अजून वेळ लागेल त्यामुळे संयम आणि सबुरीने काम करा.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही बऱ्याच गोष्टींमधून एक दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. खूप काही करायला जाऊ नका, फसवणूक संभवते. वरवर आकर्षक वाटणाऱ्या कुठल्याही गोष्टीला भुलू नका. लोभ मोह यांच्या पासून जाणीवपूर्वक लांब राहा. स्वप्नरंजन करत बसू नका, हवेत बोलत राहू नका, प्रत्यक्षात कृती करा.
नंबर २: (राशी: मेष/कर्क/तूळ/मकर)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाच्या वळणाचा आहे. कष्टाचे हवे तसे फळ मिळणार नाही. विलंब होईल. पण यामुळेच तुम्ही अंतर्मुख व्हाल आणि नवीन मार्ग सापडेल! परिस्थितीचा स्वीकार करुन आनंदाने मार्गक्रमण कराल. निरस व्हाल पण निराश नाही! स्वार्थ सोडून परमार्थाचा विचार येईल. "मन प्रसन्न तर घर प्रसन्न" असा अनुभव येईल!

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही विवेकबुद्धी आणि धीराने वागा. आत्मोन्नतीचा मार्ग शोधा. इतरांकडून फार अपेक्षा ठेवू नका, त्या पूर्ण होणार नाहीत. भौतिक पसाऱ्यातून स्वतःला थोडे अलिप्त करून बघा. एकांतात वेळ घालवा. तुम्ही करत असलेली उपासना सुरू ठेवा, सुंदर अनुभव येतील! "मन मंदिरा तेजाने उजळून घेई साधका!" हे तुमच्यासाठी आहे!
नंबर ३: (राशी: वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी भौतिक आणि आर्थिक जडणघडणीचा असणार आहे. इतरांच्या मदतीने निश्चितंच एक टप्पा गाठला जाईल. सक्षम आणि स्थिर वाटेल. प्रयत्नांना यश येईल. तुम्ही केलेल्या कामाला ओळख मिळेल. घर, जमीन, गाडी, नोकरी, व्यवसाय किंवा इतर व्यावहारिक गोष्टींमध्ये चांगली प्रगती होईल, संपन्नता राहील.
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामात संपूर्ण लक्ष देऊन, जीव ओतून आणि भरपूर कष्ट करून पुढे वाढण्याची गरज आहे. कामामध्ये परिपूर्णता आणायचा प्रयत्न करा. इतरांच्या मदतीने, सोबतीने पुढे चाला. कोणीतरी दिलेल्या सूचना अंमलात आणा. इतरांना तुम्ही देखील मदत करा. एकट्या पेक्षा मिळून मिसळून काम करा. "एकीचे बळ" लक्षात ठेवा!
श्रीस्वामी समर्थ.