Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 11:46 IST2025-11-15T11:45:21+5:302025-11-15T11:46:41+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून किंवा राशीनुसार तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.

Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
१६ ते २२ नोव्हेंबर
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
नंबर १: (राशी- मिथुन/कन्या/धनू/मीन)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचं चिंतन आणि मनन करण्याचा आहे. हव्या तशा गतीने गोष्टी पुढे सरकणार नाहीत. एखाद्या गूढ आणि संभ्रम निर्माण करण्याऱ्या प्रसंगाला सामोरे जाऊ शकता. एकाच ठिकाणी स्वस्थ बसून रहाल. पण हे तुमच्या चांगल्यासाठीच असणार आहे. यातून उत्तम निष्पन्न निघेल. नेहमी वेग हाच पुढे जाण्याचे प्रमाण नसतो, हे लक्षात ठेवा!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कोणत्याही प्रसंगी इतरांकडे धाव घेण्यापेक्षा स्वतः अंतर्मुख होऊन उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. संथपणे आणि शांतपणे काम करा. कमी वेगाने प्रगती करा. विवेक आणि संयम ठेवा. निर्णय घेताना सगळ्या बाजूने विचार करा. ध्यान करा. काही वेळ तरी स्वतः साठी ठेवा.
नंबर २: (राशी- मेष/कर्क/तूळ/मकर)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा आहे. तुम्ही एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोचण्याची शक्यता आहे. मागे केलेल्या नियोजनाला आणि कष्टाला चांगले यश मिळेल. पण मार्गावर पुढे जाण्यासाठी कुठल्यातरी गोष्टीची वाट बघावी लागेल. लोकांचं सहकार्य मिळेल. यात्रा किंवा प्रवास संभवतात.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही धैर्य आणि संयम ठेवण्याची गरज आहे. आहात त्या मार्गावर पुढे जाताना, विचारमंथन करा, इतरांचे मत जाणून घ्या. कामाचा विस्तार कसा करता येईल हा विचार करा. कोणत्याही परिस्थितीचा सगळ्या बाजूने विचार करा. तुम्ही आज जिथे पोचला आहात त्यात इतरांचा मोलाचा वाटा आहे याची जाणीव ठेवा.
नंबर ३: (राशी - वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी संसाधनांकची मुबलकता घेऊन येत आहे. तुम्ही वस्तू, पैसे, लोक, कौशल्य यांनी युक्त असाल. कामामध्ये लोकांकडून चांगला अभिप्राय मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाल. घराबाबत किंवा जमिनीबाबत चांगली घटना घडेल. समृद्धी आणि संपन्नता राहील. लाभ होतील!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक नियोजन नीट करा. कुठे आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर करू शकता. लोकांना मदत करा. सगळ्यांचा सांभाळ करा. व्यावहारिक वागा, पण तुटक वागू नका. वागण्या बोलण्यात धैर्य आणि संयम ठेवा. स्वार्थ सोडून लोकहिताचा विचार करा!
संपर्क : sumedhranade90@gmail.com
श्रीस्वामी समर्थ.