Tarot Card: जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागेल सेल्फ मोटिव्हेशनची गरज; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:59 IST2025-06-28T13:58:32+5:302025-06-28T13:59:18+5:30

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घ्या. 

Tarot Card: Self-motivation will be needed in the first week of July; Read weekly tarot prediction! | Tarot Card: जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागेल सेल्फ मोटिव्हेशनची गरज; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

Tarot Card: जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागेल सेल्फ मोटिव्हेशनची गरज; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
२९ जून ते ५ जुलै
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============

नंबर १: (राशी- वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ)

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी एका कलाटणीचा असणार आहे. महत्त्वाचे बदल घडतील. हे बदल तुमच्या मनाप्रमाणे नसतील आणि तुम्हाला शरणागती पत्करावी लागेल. अपेक्षित ध्येय गाठण्यात अजून वेळ आणि कष्ट लागतील. पण असं असूनही घाबरु नका, हे बदल सुधारणा करण्यासाठी गरजेचे आहेत. "बदल हा निसर्गाचा नियम आहे" हे विसरू नका!

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही स्वतःचा अहंकार, गर्व आणि मोठेपणा बाजूला ठेवून वागण्याची गरज आहे. आलेल्या परिस्थितीशी झगडायला जाऊ नका, शांतपणे स्वीकार करा. मागे झालेल्या वाईट घटना विसरण्याचा प्रयत्न करा. अंधार झाल्यानंतरच नवा सूर्योदय होतो आणि अंधारात आपल्याला सोबत करायला एखादी तरी चांदणी नेहमी असते हे लक्षात ठेवा!

नंबर २: (राशी - मिथुन/कन्या/धनू/मीन)

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी खोळंबलेला काळ घेऊन येत आहे. गोष्टी अडकल्यासारख्या वाटतील. त्यामुळे तुम्हाला बेचैन वाटू शकतं. कामाच्या ठिकाणी तेच तेच काम करुन कंटाळा येण्याचा संभव आहे. मनातून उत्साह आणि ऊर्जा कमी राहील. अपेक्षित गती किंवा परिणाम मिळणार नाहीत. सगळं असूनही काहीतरी नसल्याची भावना निर्माण होईल!

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमच्याकडे जे चांगलं आहे, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जे नाही त्यामुळे स्वतःला त्रास करुन घेण्यापेक्षा आहे त्यात आनंद मानायला शिका. इतरांमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर संयम ठेवा, माणसं आणि नाती पटकन तोडायला जाऊ नका. विवेकाने विचार करा. कृतज्ञ रहा, कृतज्ञतेचा सराव करा.

नंबर ३: (राशी- मेष/कर्क/तूळ/मकर)

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी भौतिक संपन्नता आणि आर्थिक सक्षमता घेऊन येत आहे. आर्थिक कामे अडकलेली असतील तर ती आता मार्गी लागतील. आहात त्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत पोहोचाल. एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात. नोकरी व्यवसायामध्ये चांगले यश संभवते. आरोग्यात सुधारणा होईल.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जवळ असलेल्या वस्तूंचा अत्यंत चांगल्या प्रकारे वापर करायचा आहे. काहीही वाया घालवू नका आणि कशाचाही अती वापर करू नका. एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन मग आर्थिक निर्णय घ्या. एखाद्या अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन खूप उपयोगी पडेल. इतरांसाठी आधार बना. स्वार्थापलीकडे जाऊन लोकसेवा करा!

संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.

Web Title: Tarot Card: Self-motivation will be needed in the first week of July; Read weekly tarot prediction!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.