Tarot Card: एकूणच जूनचा शेवटचा आठवडा पांडुरंगाच्या कृपेने आनंददायी ठरणार, वाचा टॅरो भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 11:38 IST2025-06-21T11:38:11+5:302025-06-21T11:38:47+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.

Tarot Card: एकूणच जूनचा शेवटचा आठवडा पांडुरंगाच्या कृपेने आनंददायी ठरणार, वाचा टॅरो भविष्य!
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
२२ ते २८ जून
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
या सप्ताहात एकच योजना, मने सांभाळा, जपा भावना!
नंबर १: (राशी मेष/कर्क/तूळ/मकर)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा असणार आहे! एखाद्या कामाचा मोबदला चांगला मिळेल. एखादी अपेक्षित घटना घडेल. मागच्या दुःखावर सुखाची फुंकर घालणारा हा काळ आहे. नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल. कलेला प्रोत्साहन मिळेल. या सगळ्यात तुम्हाला समाधान वाटेल. "आज मैं ऊपर आसमां नीचे" असं म्हणावंसं वाटेल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुमच्याकडून कळत नकळत स्वार्थी वागणूक होऊ शकते त्यामुळे ते लक्षपूर्वक टाळा. कुटुंबामध्ये एकोप्याने वागा. तुम्हाला आवडत असणाऱ्या गोष्टीसाठी वेळ काढा. इतरांची विचारपूस करा, सर्वांना तुमच्या आनंदात सहभागी करुन घ्या. कुठल्या नात्यात वितुष्ट आलं असेल तर ती कटुता दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा!
नंबर २: (राशी वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी, तुम्ही आहात त्या मार्गावर पुढे नेणारा असणार आहे. बुध्दी पेक्षा भावनांचा पगडा राहील. मध्यम गतीने कामे पुढे सरकतील. लोकांचे सहकार्य लाभेल. उत्तम नातेसंबंध जोडले जातील. तुम्हाला आतून प्रसन्न वाटेल, दुसऱ्यांना तुम्ही आनंद देऊ शकाल. एखादा छंद किंवा कला यातून तुम्हाला समाधान मिळेल. प्रवास आनंद देईल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही लोकांपर्यंत कसे पोचता येईल याचा विचार करायचा आहे. इतरांना तुमच्या बरोबर घेऊन चाला. तुम्हाला कृतीशील होण्याची गरज आहे. तुमच्यातील चांगुलपणाने लोकांचे मन जिंका. पण कोणाच्या कुठल्याही आमिषाला भुलू नका. "मन जीता ते जग जीता" याप्रमाणे स्वतःचे आणि इतरांचे मन जिंकलात तर तुमचा खरा विजय होईल!
नंबर ३: (राशी मिथुन/कन्या/धनू/मीन)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी सोबतीने पुढे वाढण्याचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. घरामध्ये जोडीदाराकडून अपेक्षित किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात साहचर्य मिळेल. दुरावलेली नाती पुन्हा जवळ येतील. प्रेम आणि नात्यांच्या बाबतीत आनंददायी घटना घडेल. साथ संगतीमुळे अवघड मार्ग सोपा होईल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला एकटे राहण्यापेक्षा इतरांच्या सोबत राहणे जास्त फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे कुठल्याही बाबतीत एकटे पडू नका. तुमचे मत वेगळे असेल तरी चार लोकांच्या सांगण्याप्रमाणे वागा. एखाद्या कलेतून आनंद मिळवा. बुध्दीचा तर्क बाजूला ठेवून भावना समजून घ्या. जवळच्या व्यक्तीला तुमच्या भावना व्यक्त करुन सांगा!
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.