Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 11:23 IST2025-11-08T11:22:05+5:302025-11-08T11:23:20+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून किंवा तुमच्या राशीनुसार साप्ताहिक टॅरो भविष्य जाणून घेऊ शकता.

Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
९ ते १५ नोव्हेंबर
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
नंबर १: राशी: वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी काही अडथळे आणि अडचणी घेऊन येत आहे. हव्या तशा गोष्टी घडणार नाहीत. हव्या तशा वेगाने कामे पुढे सरकणार नाहीत. अडकलेली कामे तशीच राहण्याची शक्यता आहे. पण असं असूनही तुम्हाला त्याचा फार त्रास होणार नाही. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करुन चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकणार आहात.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही एक नवीन दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. आलेली अवघड परिस्थिती तुम्हाला शिकवायला आणि समृद्ध करायला आली आहे असा सकारात्मक विचार ठेवून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच यश येईल. फक्त एक करा, की संयम आणि धैर्य ठेवा. कारण, काहीही करताना विलंब होऊ शकतो.
नंबर २: (राशी मिथुन/कन्या/धनू/मीन)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी भावभावनांचं प्राधान्य घेऊन येत आहे. तुम्ही मुख्यत्वे आनंदी राहणार आहात. तुम्हाला तुमच्या मनाचा कौल घेऊन इतर व्यवहारिक गोष्टींपेक्षा मन काय सांगत आहे त्याप्रमाणे वागून चांगला अनुभव येईल. कठीण परिस्थितीसुद्धा सकारात्मकतेने हाताळू शकाल. स्वतःमध्ये समाधानी रहाल. कला क्षेत्रात चांगली प्रगती होईल.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही भावनांमध्ये वाहवत जात नाही आहात ना, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कोणामध्येही भावनिक दृष्ट्या अडकू नका. तुम्हाला आवडणारा एखादा छंद किंवा एखादी कला आत्मसात करा, त्यात वेळ घालवा. इतरांना पूर्ण मदत करा. तुमच्या बोलण्याने इतरांना आधार मिळू शकतो त्याप्रमाणे वागा. कृतज्ञ रहा.
नंबर ३: (राशी मेष/कर्क/तूळ/मकर)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण तुमच्या समोर अशी परिस्थिती येईल जिथे तुमच्या धैर्याचा आणि संयमाचा कस लागेल. तुम्हाला हव्या तशा वेगाने गोष्टी घडणार नाहीत. जे मिळायला हवे, त्यात काहीतरी कमी राहू शकते. तुम्हाला मध्यस्ती करावी लागू शकते. गरजेपुरते काम भागेल. मध्यम फलदायी असा हा सप्ताह राहील.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही धैर्य ठेवा, संयम ठेवा, मन शांत ठेवा. इतरांची समजूत काढा. सगळयांना एकत्र घेऊन पुढे चाला. तुम्ही स्वतः कोणताही पक्ष किंवा कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नका. कोणत्याही प्रसंगात मध्यम मार्ग निवडा. संथ गतीने वाटचाल करा, घाई गडबड करू नका. सगळ्या पसाऱ्यातून चांगलं काय ते निवडा. ध्यान करा, मेडिटेशन करा.
संपर्क: sumedhranade90@gmail.com
श्रीस्वामी समर्थ.