Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 11:18 IST2025-04-26T11:17:42+5:302025-04-26T11:18:06+5:30

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता. 

Tarot Card: Let go of anger for a moment like a child, you will be happy; Read your Tarot fortune! | Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
२७ एप्रिल ते ३ मे
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============

नंबर १:

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन ऊर्जा घेऊन येत आहे. एखादी तरी आनंदी घटना घडेल! तुम्हाला हवं असलेलं काहीतरी मिळण्याची शक्यता आहे किंवा त्याबाबतीत सकारात्मक घटना घडतील. इतरांकडून मान सन्मान आणि सहकार्य मिळेल. लोकांना तुमचा सहवास आवडेल. "आज मैं उपर आसमा नीचे", साधारण असा काळ आहे!

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही उत्साहयुक्त राहण्याची गरज आहे. काहीही झालं तरी खचून जाऊ नका. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. लढण्याची वृत्ती ठेवा पण कोणाशी विनाकारण भांडू नका. स्पर्धा जिंकण्यापेक्षा काम असं करा की तुम्ही इतरांचं मन जिंकाल. आत्मविश्वास, प्रसंगावधान आणि खेळाडू वृत्ती ठेवा. चांगले नेतृत्व करा.

नंबर २:

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी उत्साहाचा आणि आनंदाचा आहे. काहीतरी नवीन शिकायला मिळेल. अडकलेल्या गोष्टी काही प्रमाणात पुढे सरकतील. दुरावलेली नाती जवळ येतील. एखादी आनंदाची बातमी येऊ शकते. तुम्हाला समाधान लाभेल. लहान मुलांमध्ये मन रमेल. तुम्हाला आतून सकारात्मक आणि तजेलदार वाटेल.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला मुंगी होऊन साखर खाण्याची गरज आहे. सगळ्यांना मदत करा, दुसऱ्याचे एखादे काम स्वतःहून करा! लहान मुलं जशी निरागसपणे माफी मागून किंवा माफ करून सोडून देतात तसं तुम्हाला वागण्याची गरज आहे. "चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नं" या प्रमाणे मन आनंदी ठेवलंत तर घर आनंदी राहील हे लक्षात ठेवून वागा.

नंबर ३:

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी संभ्रम आणि शंका निर्माण करणारा ठरु शकतो. तुमचा स्वतः वरचा विश्वास कमी होऊ शकतो. इतरांनी तुमच्या डोक्यात काहीतरी घातले तर तुम्ही पूर्णपणे त्यांच्या प्रभावाखाली राहाल अशी शक्यता दिसते आहे. पण स्वतःला तटस्थ ठेवले, मन भक्कम ठेवले तर हा सप्ताह तुमच्यातील कलेला, सृजशीलतेला वाव देणारा ठरेल!

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही मनावर ताबा ठेवण्याची गरज आहे. मनाप्रमाणे वागता वागता तुम्ही वाहवत तर जात नाही ना याकडे लक्ष द्या. इतरांचे बोलणे किती ऐकायचे हे तुम्ही ठरवा. ध्यान मेडीटेशन प्रार्थना करा. पटकन कोणावर विश्वास ठेवू नका. "मन करा रे प्रसन्न" तुकोबांच्या अभंगाप्रमाणे तुम्ही मन आनंदी ठेवले तर हा काळ आनंदी!

संपर्क : ९५६१०९३७४०

श्रीस्वामी समर्थ.

Web Title: Tarot Card: Let go of anger for a moment like a child, you will be happy; Read your Tarot fortune!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.