शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मनात एक प्रश्न धरा आणि १ ते ३ पैकी एक आकडा निवडा आणि जाणून घ्या तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 09:59 IST

Tarot Card: १ ते ७ मार्च साप्ताहिक टॅरो: १, २ की ३? तुमचा एक नंबर उलगडणार या आठवड्याचे भविष्य!

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन१ ते ७ मार्च===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन वाचण्यासाठी १/२/३ पैकी कोणताही एक नंबर निवडा. नंबर निवडताना मनामध्ये एखादा विषय किंवा प्रश्न ठेवून नंबर निवडा आणि मग त्या नंबर साठी तुमच्या विषयानुसार किंवा प्रश्ननुसार मार्गदर्शन वाचा! 

 नंबर १: 

वैयक्तिक आयुष्य - घरात किंवा कुटुंबात तुमच्या कष्टाला किंमत नाही असं वाटू शकतं पण काही दिवसांत तुमच्या बद्दल सगळ्यांना आदर वाटेल, त्यामुळे गैरसमज करू नका, अतिविचार करु नका. जबाबदारी नीट पार पाडा!नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात तुम्ही केलेल्या कष्टाचे चीज व्हायला अजून वेळ लागेल. त्यामुळे वाट बघणे चांगले. पुढचे नियोजन करा!फायनान्स - आर्थिक बाबतीत चांगला फलदायी काळ आहे. त्यामुळे पुढची महत्त्वाची गुंतवणूक करू शकता. आर्थिक निर्णय घेण्यास अनुकूल.रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत तुमची खूप शक्ती खर्च होत आहे असे वाटत असेल तर मध्ये ब्रेक घेऊन स्वतःला वेळ द्या. विचार पक्के करा, शरीराने मनाने ठाम राहा आणि मग पुन्हा नात्यात तुमचे प्रेम द्या!शिक्षण/परीक्षा - कष्ट कराल तर फळ उत्तम मिळेल हेच सांगणारा हा काळ आहे. त्यामुळे प्रयत्नापासून अजिबात दूर पळू नका.खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात थोडे थांबलात तर एखादा चांगला व्यवहार हाती लागेल. घाईघाईत निर्णय नको!कोर्ट कचेरी - या बाबतीत वाट बघण्याची ही वेळ आहे. ज्यांचे तुम्ही देणे लागता त्यांना देऊन टाका. त्यातून मुक्त व्हा!आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत सुधारण व्हायला थोडा वेळ लागेल. त्यामुळे संयम ठेवा. चालू असलेल्या गोळ्या औषधे यांच्याबाबतीत प्रामाणिक रहा. चुकवू नका. प्रवास -  प्रवासात सावकाश वाहन चालवा. घाई गडबड करु नका. प्रवासात तुमच्या वस्तू सांभाळा.

नंबर २: 

वैयक्तिक आयुष्य - घरात एक प्रकारचे समाधान आणि दुःखावर फुंकर अनुभवायला मिळेल. साध्या सोप्या गोष्टींतून आनंद मिळवा!नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात तुम्हाला समतोल राखण्याची गरज आहे. धीराने काम करा. मध्यम मार्ग निवडा.फायनान्स - आर्थिक बाबतीत मागचे नुकसान भरून निघण्याची शक्यता आहे. विवेक बुद्धी वापरून निर्णय घ्या.रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत दोघांनी एकत्र येऊन काहीतरी चांगलं करा. जसे की बागकाम, एखादी छोटी सहल, एखादे वर्कशॉप चित्रकला इत्यादी. त्यातून प्रेमात आनंद मिळेल!शिक्षण/परीक्षा - प्रामाणिकपणा आणि खरेपणा तुम्हाला पुढे घेऊन जाईल. मेहनत गरजेची आहे हे लक्षात ठेवा. एकत्र पेक्षा एकट्यात अभ्यास करा.खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात मध्यम मार्ग निघेल. टोकाचा निर्णय किंवा अतिरेक अपेक्षा ठेवू नका.कोर्ट कचेरी - कोर्टाच्या कामात मध्यस्थी होण्याची शक्यता आहे. निकाल तुमच्या बाजूने न लागता सुवर्णमध्य साधला जाईल.आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत संयम ठेवण्याची गरज आहे. कुठल्याच गोष्टीचा अतिरेक नका. शक्यतो बाहेरचे पेय पदार्थ टाळा.प्रवास - प्रवासातून मन शांत होईल. मागे घडलेल्या घटनांचा त्रास कमी होईल. मनाला उभारी येईल!

नंबर ३: 

वैयक्तिक आयुष्य - घरात किंवा कुटुंबात शांतता ठेवणे गरजचे राहील. वादाचे प्रसंग आलेच तर त्यातून शांतपणे मार्ग काढा. निर्णय पुढे ढकला!नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात तुम्ही काम केलेलं आहे त्यावर विश्वास ठेवा आणि स्वस्थ बसा. उताविळपणा करु नका. धीराने वागा.फायनान्स - आर्थिक बाबतीत आत्ता तुम्ही काहीच न करता नुसती वाट बघण्याची गरज आहे. आत्ता कोणत्याच निर्णयापर्यंत पोचू नका.रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत तुमच्या आतल्या आवाजाचे ऐका. इतरांपेक्षा स्वतःला काय योग्य वाटत आहे याचा विचार करा आणि त्याप्रमाणे वागा!शिक्षण/परीक्षा - इतरांच्या मतापेक्षा स्वतःला किंमत द्या. आपण आपलं आत्मपरीक्षण करा आणि जिथे कमी पडत आहोत तिथे जास्त कष्ट घ्या!खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात आत्ता कोणतेही व्यवहार न केलेले चांगले. हा काळ जाऊ द्या. शांत रहा.कोर्ट कचेरी - कोर्ट व्यवहारात आत्ता तुमच्या हातात काही नसणार त्यामुळे कुणाशीच हुज्जत घालू नका. वाद टाळा. शांत रहा कुठलीच कृती करायला जाऊ नका.आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत मानसिक स्थितीचा शरीरावर परिणाम होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे मेडिटेशन करा. डोकं, डोळे, घसा, हात खांदे यांची विशेष काळजी घ्या!प्रवास - प्रवास गरजेपुरता करा. स्वतःसाठी नक्की वेळ काढा. निसर्गाच्या सान्निध्यात आनंद मिळेल!

या मार्गदर्शनाबद्दल आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की ईमेल द्वारे सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही ईमेल द्वारे विचारू शकता.ईमेल संपर्क: sumedhranade531@gmail.com

श्रीस्वामी समर्थ.

English
हिंदी सारांश
Web Title : Weekly Tarot: Choose a number, know your future (March 1-7)

Web Summary : Tarot guidance for March 1-7 offers insights based on chosen number. Focus on personal life, career, finance, relationships, education, and health. Get weekly advice from Sumedh Ranade, Tarot card reader, Pune.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष