शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Tarot Card: रागावर नियंत्रण आणि आरोग्याची काळजी महत्त्वाची; फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्याचे राशिभविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 10:28 IST

Tarot Card: टॅरो मार्गदर्शन वाचण्यासाठी मनामध्ये एखादा विषय किंवा प्रश्न ठेवून तीनपैकी कोणताही एक नंबर निवडा आणि नंबरप्रमाणे मार्गदर्शन वाचा

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२२ ते २८ फेब्रुवारी===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन वाचण्यासाठी १/२/३ पैकी कोणताही एक नंबर निवडा. नंबर निवडताना मनामध्ये एखादा विषय किंवा प्रश्न ठेवून नंबर निवडा आणि मग त्या नंबर साठी तुमच्या विषयानुसार किंवा प्रश्ननुसार मार्गदर्शन वाचा! 

 नंबर १: 

वैयक्तिक आयुष्य - घरात किंवा कुटुंबात तुमचे महत्त्व वाढेल. कुटुंबातील सदस्य तुमच्याकडे आदराने बघतील. अपेक्षा वाढतील. भावनिक समाधान राहील!नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात तुम्ही चांगली वाटचाल कराल. काही बाबतीत तुम्ही उच्च आणि जास्त निकष ठेवाल जे इतरांसाठी अवघड असतील. त्यामुळे समतोल साधा!फायनान्स - आर्थिक बाबतीत तुमचे निर्णय योग्य ठरतील. नवीन गुंतवणूक फलदायी ठरेल. आमिषाला मात्र भुलू नका.रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत एक पाऊल पुढे टाकणार आहात. विश्वास संपादन होईल. एकमेकाला अधिक समजून घ्याल!शिक्षण/परीक्षा - अभ्यास करताना मनाचा आवाज ऐका. अभ्यासाच्या बाबतीत तुम्हाला आतून जे वाटेल त्या पद्धतीने अभ्यास करा.खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात यशस्वी वाटचाल होईल. नवीन संधी उपलब्ध होतील. खात्रीशीर ठिकाणी व्यवहार करा!कोर्ट कचेरी - या बाबतीत भावनेच्या भरात एखादे पाऊल चुकू शकते त्यामुळे सावध रहा. सल्लागार जसे सांगेल तसे वागा!आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत काही अंशी सुधारणा होईल. कफाचे त्रास संभवतात. त्यामुळे थंड पाणी इत्यादी टाळणे योग्य!प्रवास -  प्रवास करण्यासाठी अनुकूल काळ आहे. प्रवासात किंवा प्रवास करुन पोहचाल तिथे आनंद मिळेल!

नंबर २: 

वैयक्तिक आयुष्य - घरात संपूर्ण जबाबदारी अंगावर घेऊ नका. इतरांची मदत घ्या. त्याचप्रमाणे स्वतःवर आलेली कामे पूर्णपणे झटकू ही नका!नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात तुमच्या हाताखाली असलेल्यांना कामे नीट वाटून द्या. कोणावर अन्याय होत नाही ना याचा विचार करा.फायनान्स - आर्थिक बाबतीत स्वार्थी विचार सोडून इतरांना मदत करण्याची गरज आहे. गरिबांना मदत करा. दानधर्म करा.रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत स्वतःला मागे ओढू नका. नात्यामध्ये मोकळेपणाने वागा. शेअर करा. असे केल्याने तुम्हाला तसेच परत मिळेल!शिक्षण/परीक्षा - आज जे कष्ट कराल ते उद्या फळतील. हा न्याय तुम्हाला उत्तम लागू पडेल. त्यामुळे काळजी न करता कष्ट करा.खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात चोख व्यवहार होतील. अतिरेक खर्च नको!कोर्ट कचेरी - कोर्टाच्या कामात मध्यस्थी होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे सर्वस्वी तुमच्या बाजूने निकाल लागेल अशी अपेक्षा ठेवू नका!आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत संतुलन राखा. अती खाणे किंवा अती श्रम यांच्यामुळे तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतो. पथ्य सांभाळा!प्रवास - प्रवासामुळे एखादी संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रवासात इतरांना मदत करा!

नंबर ३: 

वैयक्तिक आयुष्य - घरात किंवा कुटुंबात भांडणे संभवतात. भावनांचा उद्रेक होऊ शकतो. तुम्ही सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही हे स्वतःला समजावून सांगा!नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात तुमच्या वरिष्ठांचा अती प्रमाणात त्रास संभवतो. पण आत्ता तुमच्या हातात काहीच नसल्याने शांतपणे सहन करा!फायनान्स - आर्थिक बाबतीत तुमचे निर्णय चुकण्याची शक्यता आहे म्हणून आहात तिथेच राहा. नवीन काही करु नका. प्राधान्य कशाला द्यायचे हे नीट ठरवा!रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत तुमच्या अस्थिरता येऊ शकते. राग द्वेष ईर्षा यांच्यापासून सावध रहा. आपल्याला काहीच किंमत नाही अशी भावना हळूच घर करु शकते!शिक्षण/परीक्षा - ऐन परीक्षेत काही गोष्टी आपल्या हातात नसतात हा विचार करुनच ठेवा. परीक्षेसाठी वेळेत निघा. तब्येत सांभाळा!खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात आत्ता कोणतेही व्यवहार न केलेले चांगले. हा काळ जाऊ द्या. शांत रहा.कोर्ट कचेरी - कोर्ट व्यवहारात एखाद्या आडवळणी ठिकाणी अडकल्या सारखे वाटत असेल. हा काळ जाऊ द्या मग मार्ग निघेल!आरोग्य - आरोग्याच्या तक्रारी वर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुपथ्य अजिबात नको. कसलाही अतिरेक नको. जागरण, अती खाणे, अती हिंडणे हे सर्व काही टाळा!प्रवास - अगदी गरजेचा असेल तेवढाच प्रवास करा. शॉर्टकट किंवा अडनिड्या ठिकाणी गाडी वळवू नका!

या मार्गदर्शनाबद्दल आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की ईमेल द्वारे सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही ईमेल द्वारे विचारू शकता.ईमेल संपर्क: sumedhranade531@gmail.com

श्रीस्वामी समर्थ.

English
हिंदी सारांश
Web Title : Control anger, prioritize health: Weekly Tarot Horoscope, end of February!

Web Summary : This week's Tarot guidance advises on relationships, career, finance, health and education based on chosen numbers. It emphasizes balanced decisions, helping others, and managing emotions to avoid conflicts. Health requires attention.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषWeekly Horoscopeसाप्ताहिक राशीभविष्य