Tarot Card: रागावर नियंत्रण आणि आरोग्याची काळजी महत्त्वाची; फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्याचे राशिभविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 10:28 IST2026-02-21T10:25:43+5:302026-02-21T10:28:15+5:30
Tarot Card: टॅरो मार्गदर्शन वाचण्यासाठी मनामध्ये एखादा विषय किंवा प्रश्न ठेवून तीनपैकी कोणताही एक नंबर निवडा आणि नंबरप्रमाणे मार्गदर्शन वाचा

Tarot Card: रागावर नियंत्रण आणि आरोग्याची काळजी महत्त्वाची; फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्याचे राशिभविष्य!
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
२२ ते २८ फेब्रुवारी
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन वाचण्यासाठी १/२/३ पैकी कोणताही एक नंबर निवडा. नंबर निवडताना मनामध्ये एखादा विषय किंवा प्रश्न ठेवून नंबर निवडा आणि मग त्या नंबर साठी तुमच्या विषयानुसार किंवा प्रश्ननुसार मार्गदर्शन वाचा!
नंबर १:
वैयक्तिक आयुष्य - घरात किंवा कुटुंबात तुमचे महत्त्व वाढेल. कुटुंबातील सदस्य तुमच्याकडे आदराने बघतील. अपेक्षा वाढतील. भावनिक समाधान राहील!
नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात तुम्ही चांगली वाटचाल कराल. काही बाबतीत तुम्ही उच्च आणि जास्त निकष ठेवाल जे इतरांसाठी अवघड असतील. त्यामुळे समतोल साधा!
फायनान्स - आर्थिक बाबतीत तुमचे निर्णय योग्य ठरतील. नवीन गुंतवणूक फलदायी ठरेल. आमिषाला मात्र भुलू नका.
रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत एक पाऊल पुढे टाकणार आहात. विश्वास संपादन होईल. एकमेकाला अधिक समजून घ्याल!
शिक्षण/परीक्षा - अभ्यास करताना मनाचा आवाज ऐका. अभ्यासाच्या बाबतीत तुम्हाला आतून जे वाटेल त्या पद्धतीने अभ्यास करा.
खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात यशस्वी वाटचाल होईल. नवीन संधी उपलब्ध होतील. खात्रीशीर ठिकाणी व्यवहार करा!
कोर्ट कचेरी - या बाबतीत भावनेच्या भरात एखादे पाऊल चुकू शकते त्यामुळे सावध रहा. सल्लागार जसे सांगेल तसे वागा!
आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत काही अंशी सुधारणा होईल. कफाचे त्रास संभवतात. त्यामुळे थंड पाणी इत्यादी टाळणे योग्य!
प्रवास - प्रवास करण्यासाठी अनुकूल काळ आहे. प्रवासात किंवा प्रवास करुन पोहचाल तिथे आनंद मिळेल!
नंबर २:
वैयक्तिक आयुष्य - घरात संपूर्ण जबाबदारी अंगावर घेऊ नका. इतरांची मदत घ्या. त्याचप्रमाणे स्वतःवर आलेली कामे पूर्णपणे झटकू ही नका!
नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात तुमच्या हाताखाली असलेल्यांना कामे नीट वाटून द्या. कोणावर अन्याय होत नाही ना याचा विचार करा.
फायनान्स - आर्थिक बाबतीत स्वार्थी विचार सोडून इतरांना मदत करण्याची गरज आहे. गरिबांना मदत करा. दानधर्म करा.
रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत स्वतःला मागे ओढू नका. नात्यामध्ये मोकळेपणाने वागा. शेअर करा. असे केल्याने तुम्हाला तसेच परत मिळेल!
शिक्षण/परीक्षा - आज जे कष्ट कराल ते उद्या फळतील. हा न्याय तुम्हाला उत्तम लागू पडेल. त्यामुळे काळजी न करता कष्ट करा.
खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात चोख व्यवहार होतील. अतिरेक खर्च नको!
कोर्ट कचेरी - कोर्टाच्या कामात मध्यस्थी होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे सर्वस्वी तुमच्या बाजूने निकाल लागेल अशी अपेक्षा ठेवू नका!
आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत संतुलन राखा. अती खाणे किंवा अती श्रम यांच्यामुळे तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतो. पथ्य सांभाळा!
प्रवास - प्रवासामुळे एखादी संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रवासात इतरांना मदत करा!
नंबर ३:
वैयक्तिक आयुष्य - घरात किंवा कुटुंबात भांडणे संभवतात. भावनांचा उद्रेक होऊ शकतो. तुम्ही सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही हे स्वतःला समजावून सांगा!
नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात तुमच्या वरिष्ठांचा अती प्रमाणात त्रास संभवतो. पण आत्ता तुमच्या हातात काहीच नसल्याने शांतपणे सहन करा!
फायनान्स - आर्थिक बाबतीत तुमचे निर्णय चुकण्याची शक्यता आहे म्हणून आहात तिथेच राहा. नवीन काही करु नका. प्राधान्य कशाला द्यायचे हे नीट ठरवा!
रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत तुमच्या अस्थिरता येऊ शकते. राग द्वेष ईर्षा यांच्यापासून सावध रहा. आपल्याला काहीच किंमत नाही अशी भावना हळूच घर करु शकते!
शिक्षण/परीक्षा - ऐन परीक्षेत काही गोष्टी आपल्या हातात नसतात हा विचार करुनच ठेवा. परीक्षेसाठी वेळेत निघा. तब्येत सांभाळा!
खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात आत्ता कोणतेही व्यवहार न केलेले चांगले. हा काळ जाऊ द्या. शांत रहा.
कोर्ट कचेरी - कोर्ट व्यवहारात एखाद्या आडवळणी ठिकाणी अडकल्या सारखे वाटत असेल. हा काळ जाऊ द्या मग मार्ग निघेल!
आरोग्य - आरोग्याच्या तक्रारी वर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुपथ्य अजिबात नको. कसलाही अतिरेक नको. जागरण, अती खाणे, अती हिंडणे हे सर्व काही टाळा!
प्रवास - अगदी गरजेचा असेल तेवढाच प्रवास करा. शॉर्टकट किंवा अडनिड्या ठिकाणी गाडी वळवू नका!
या मार्गदर्शनाबद्दल आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की ईमेल द्वारे सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही ईमेल द्वारे विचारू शकता.
ईमेल संपर्क: sumedhranade531@gmail.com
श्रीस्वामी समर्थ.