Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 15:50 IST2025-05-03T15:49:50+5:302025-05-03T15:50:04+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.

Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
४ ते १० मे २०२५
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
नंबर १:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी दिलासादायक असणार आहे. तुमचे काम पूर्णत्वाकडे पोचण्याची चांगली शक्यता आहे. तुमच्या शिक्षकांचा, मोठ्या व्यक्तींचा आणि साथीदारांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. काहीतरी नवीन शिकाल आणि शिकवाल. "आधी लगीन कोंढाण्याचे" या प्रमाणे कर्तव्याला न चुकता काम केले तर समाधानकारक फळ मिळेल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमच्या मार्गदर्शक व्यक्तींचा सल्ला अजिबात टाळू नका. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालून तुमचे चांगले होणार आहे. नियमात बसेल असेच वागा आणि त्याप्रमाणे काम करा. जोखीम किंवा चौकटीबाहेरच्या गोष्टींना आत्ता हात घालू नका. आध्यात्मिक गुरुंची उपासना करा. प्रयत्नांना प्रार्थनेची शक्ती जोडा!
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी एकाच वेळी खूप पर्याय घेऊन येणार आहे. निरनिराळ्या गोष्टींमुळे निर्णय घ्यायला अवघड जाईल. मल्टी टास्किंग करावं लागेल. पण यांपैकी कोणतीही गोष्ट हवी तशी पुढे सरकणार नाही. एकूण थोडी तारांबळ उडण्याची शक्यता आहे. हवे ते साध्य होण्यासाठी अजून वेळ लागेल त्यामुळे संयम आणि सबुरीने काम करा.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही बऱ्याच गोष्टींमधून एक दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. खूप काही करायला जाऊ नका, फसवणूक संभवते. वरवर आकर्षक वाटणाऱ्या कुठल्याही गोष्टीला भुलू नका. लोभ मोह यांच्या पासून जाणीवपूर्वक लांब राहा. स्वप्नरंजन करत बसू नका, हवेत बोलत राहू नका, प्रत्यक्षात कृती करा.
नंबर ३:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी चांगला फलदायी ठरणार आहे. अपेक्षित यश मिळण्याच्या मार्गावर आहे. जे काही करत आहात त्यातून चांगले निष्पन्न निघणार आहे. थोडा विलंब होऊ शकतो पण परिणाम चांगला मिळेल. या काळात स्त्रियांचे वर्चस्व राहील. भाग्याची साथ राहील. एखादी चांगली बातमी मिळेल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमचा खर्च सांभाळण्याची गरज आहे. उधळपट्टी बंद करुन पैशाचे नीट नियोजन करण्याची गरज आहे. विनाकारण कोणाबद्दलही वाईट विचार करु नका. त्याचबरोबर स्वार्थी विचार न करता इतरांना देखील लागेल तशी मदत करण्याची गरज आहे. "आज जे पेराल तेच उद्या उगवेल" हे लक्षात ठेवा. त्यामुळे चांगल्या गोष्टीत गुंतवणूक करा.
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.