शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Tarot Card: नोकरी व्यवसायात प्रगतीचा काळ; पण सबुरीने घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 10:47 IST

Tarot Card: टॅरो मार्गदर्शन वाचण्यासाठी मनामध्ये एखादा विषय किंवा प्रश्न ठेवून तीनपैकी कोणताही एक नंबर निवडा आणि नंबरप्रमाणे मार्गदर्शन वाचा.

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन१ ते ७ फेब्रुवारी===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन वाचण्यासाठी १/२/३ पैकी कोणताही एक नंबर निवडा. नंबर निवडताना मनामध्ये एखादा विषय किंवा प्रश्न ठेवून नंबर निवडा आणि मग त्या नंबर साठी तुमच्या विषयानुसार किंवा प्रश्ननुसार मार्गदर्शन वाचा! 

 नंबर १: 

 वैयक्तिक आयुष्य - घरात एखादी आकस्मिक घटना घडू शकते. काही. प्रमाणात मतभेद भांडणे संभवतात. धीराने वागणे हिताचे! नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात कामात एखादा अचानक अनपेक्षित अडथळा येऊ शकतो. त्यामुळे इतरांवर खूप अवलंबून राहू नका. फायनान्स - आर्थिक बाबतीत रचलेल्या पायाला धक्का लागण्याची शक्यता आहे. मोठे निर्णय घेण्याचे टाळा. रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत तुमच्या प्रिय व्यक्तीबद्दल तुमचे मत बदलण्याचा संभव आहे. किरकोळ भांडणातून दुरावा येऊ शकतो. टोकाचे निर्णय घेऊ नका! शिक्षण/परीक्षा - तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळेच प्रश्न किंवा वेगळीच परिस्थिती परीक्षेत येण्याची शक्यता आहे. अभ्यासाचा बेस पक्का असेल तर घाबरण्याचे कारण नाही! खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात एखादा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे विश्वासार्ह ठिकाणीच व्यवहार करा! कोर्ट कचेरी - या बाबतीत विरोधी पक्षाकडून तुम्हाला एक धक्का बसण्याची शक्यता आहे. चुकीच्या किंवा खोट्या गोष्टींचा पाया असेल तर सांभाळणे गरजेचे!आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत अचानक किरकोळ आजारपण येण्याची शक्यता आहे. वाहन सावकाश चालवा आणि सगळी कामे सावकाश करा, घाई नको!प्रवास - प्रवासात एखादे अनपेक्षित वळण येऊ शकते त्यामुळे सगळं काही तुमच्या नियोजनाप्रमाणेच होईल असा अट्टाहास न ठेवलेला बरा!

नंबर २: 

वैयक्तिक आयुष्य - घरात किंवा कुटुंबात कुणीतरी दूर जाण्याचा संभव आहे. मागच्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करा. लहानांना उंच भरारी घेण्यासाठी प्रोत्साहन द्या!नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात बदल घडवून आणण्याची शक्ती तुमच्यात येईल. नवीन नोकरी किंवा व्यवसायात गती आणण्याची संधी शोधा!फायनान्स - आर्थिक बाबतीत नियोजन चांगले करण्याचा हा काळ आहे. फक्त लगेच फळाची अपेक्षा करु नका. वाट बघावी लागणार आहे!रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला एक प्रकारचा निश्चय करावा लागेल. तुमचे मत मांडा आणि त्यावर ठाम राहा. तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी काहीतरी ठोस करुन दाखवा!शिक्षण/परीक्षा - मागच्या कष्टांचे फळ चांगले मिळण्याची शक्यता आहे. अभ्यासात नुसत्या पाठांतरापेक्षा व्यापकता आणा. नीट नियोजन केले तर उत्तम फळ मिळेल!खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात ऑनलाईन व्यवहार फायद्याचे ठरतील. जवळच्या पेक्षा दुरचे व्यवहार चांगले होतील. थोडी पायपीट केली तर चांगले! कोर्ट कचेरी - कोर्ट व्यवहारात तुमच्या सल्लागारांच्या मताप्रमाणे वागा. तुम्हाला इतरांच्या मदतीची गरज आहे याची जाणीव ठेवा.आरोग्य - आरोग्यात सुधारणा होईल. एखादा लहान प्रवास केलात तर मनाला उभारी येईल! सकाळच्या उन्हात चालणे हितकारक ठरेल! सूर्याला नमस्कार करा!प्रवास - प्रवासात आनंद मिळेल. विशेष करुन दूरच्या प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. नदी तलाव समुद्र यांच्या किनारी जाणार असाल तर उत्तम!

नंबर ३: 

वैयक्तिक आयुष्य - घरात भावनिक वर्चस्व राहील. लहान मुलांमुळे किंवा लहानसहान प्रसंगातून आनंद निर्माण होईल. कलेत चांगली प्रगती होईल!नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचा आतला आवाज ऐका आणि त्याप्रमाणे निर्णय घ्या!फायनान्स - आर्थिक बाबतीत एखादी लहान रक्कम हातात येऊ शकते, लहानसा फायदा होऊ शकतो. इतरांना आर्थिक मदत नक्की करा!रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक वाटचाल होईल! एकमेकांना समजून घ्याल! एक पाऊल पुढे जायला मदत होईल.शिक्षण/परीक्षा - एखादा अनपेक्षित प्रश्न आला तरी तुम्ही त्यावर अचूक उत्तर देऊ शकणार आहात. तयारीत कमी पडू नका, अती आत्मविश्वास धोक्याचा!खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात तुमच्यापेक्षा लहान व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. लहान मुलांसंबंधी काही घ्यायचे असल्यास फायद्याचे राहील.कोर्ट कचेरी - कोर्ट व्यवहारात एखादा लहान धक्का लागू शकतो. तुमच्या बाजूने निर्णय न लागता ही तुम्हाला आधार मिळेल!आरोग्य - आरोग्यात सुधारणा होईल. घरगुती उपाय विशेष करुन काढे, दूध, पाणी अशा द्रव्य पदार्थांचा योग्य वापर करा. पाणी भरपूर प्या!प्रवास - प्रवासात अचानकपणे एखादी चांगली घटना घडेल. अनपेक्षित लहानसा आनंद मिळू शकतो. समुद्र किनारी किंवा पाण्याच्या ठिकाणी प्रवास असेल तर उत्तम!

या मार्गदर्शनाबद्दल आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की ईमेल द्वारे सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही ईमेल द्वारे विचारू शकता.ईमेल संपर्क: sumedhranade531@gmail.com

श्रीस्वामी समर्थ.

English
हिंदी सारांश
Web Title : Tarot Card: Career progress, patience advised; weekly forecast revealed.

Web Summary : Weekly tarot guidance suggests choosing a number for insights into various aspects like personal life, career, finance, relationships, education, and health. It advises caution in some areas and opportunities in others, urging readers to seek personalized advice via email.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषWeekly Horoscopeसाप्ताहिक राशीभविष्य