शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

Tarot Card: संमिश्र घटनांचा काळ पण शेवट गोडच; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 11:10 IST

Tarot Card: टॅरो मार्गदर्शन वाचण्यासाठी मनामध्ये एखादा विषय किंवा प्रश्न ठेवून तीनपैकी कोणताही एक नंबर निवडा आणि नंबरप्रमाणे मार्गदर्शन वाचा.

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२५ ते ३१ जानेवारी===============

सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन वाचण्यासाठी १/२/३ पैकी कोणताही एक नंबर निवडा. नंबर निवडताना मनामध्ये एखादा विषय किंवा प्रश्न ठेवून नंबर निवडा आणि मग त्या नंबर साठी तुमच्या विषयानुसार किंवा प्रश्ननुसार मार्गदर्शन वाचा! 

 नंबर १: 

 वैयक्तिक आयुष्य - घरात क्लेशदायक गोष्टी संभवतात. अपेक्षाभंग किंवा मनाप्रमाणे न झाल्यामुळे त्रास होऊ शकतो. संयम ठेवा! नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात वरिष्ठांसमोर शरणागती पत्करावी लागेल. स्वीकार करा फार लढायला जाऊ नका! फायनान्स - आर्थिक बाबतीत हवे तेवढे यश येणार नाही त्यामुळे महत्त्वाचे आर्थिक व्यवहार टाळा! रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत एखादी घटना अशी घडेल ज्यामुळे मोठा बदल होऊ शकतो. सगळ्याच गोष्टी तुमच्या हातात नसतील हे लक्षात ठेवा! शिक्षण/परीक्षा - अती शहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा अनुभव येण्याची शक्यता आहे त्यामुळे जपून वागा, अती आत्मविश्वास नको! खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात माघार घ्यावी लागेल. परिस्थितीचा स्वीकार करावा लागेल. कोर्ट कचेरी - या बाबतीत तुमच्या हातात काहीच नसणार, त्यामुळे दुसऱ्यांवर अवलंबून रहावा लागेल. स्वतःचा इगो बाजूला ठेवून वागा!आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे, कुपथ्य अंगाशी येऊ शकतं. अती साहस किंवा अती पराक्रम करायला जाऊ नका!प्रवास - प्रवासात शांत राहिलात तर त्रास होणार नाही. अती श्रम किंवा दगदग करु नका!

 नंबर २: 

 वैयक्तिक आयुष्य - घरात भावभावनांचे चांगले गुंफण होईल! खेळीमेळीचे वातावरण राहील. पाहुण्यांची ये जा होईल आणि त्यामुळे आनंदी वाटेल! नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात समाधानकारक घटना घडतील. अचानक एखाद्याची मदत मिळेल! इतरांशी पटवून वागलात तर उत्तम! फायनान्स - आर्थिक बाबतीत एखादी संधी येऊ शकते. पण खात्री करुन मगच गुंतवणूक करा. एखादा किरकोळ फायदा होऊ शकतो! रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक वाटचाल होईल! दुरावलेली नाती जवळ येतील. अबोला मिटेल. प्रेम, सामंजस्य, समाधान वाढेल!  शिक्षण/परीक्षा - प्रामाणिक राहिलात तर मनाप्रमाणे यश येण्याची शक्यता आहे. जीव ओतून परिश्रम करा! खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात तुम्हाला हवे तसे घडू शकते. ओळखीच्या व्यक्तींकडून मदत मिळेल. कोर्ट कचेरी - कोर्ट व्यवहारात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. स्वार्थी विचार न करता समोरच्या बाजूचा देखील थोडा विचार करा, संवेदनशीलपणे वागा!आरोग्य - आरोग्यात सुधारणा होईल. पाणी भरपूर प्या. कोणत्याही थेरपीला चांगला गुण येईल!प्रवास - प्रवासात सुखद अनुभव येतील. समुद्र किनारी किंवा पाण्याच्या ठिकाणी प्रवास असेल तर उत्तम!

 नंबर ३: 

वैयक्तिक आयुष्य - घरात एखादा आर्थिक प्रश्न अडथळे आणण्याची शक्यता आहे. पण तुम्ही यशस्वीरित्या त्यातून मार्ग काढू शकता! संयमाने वागा!नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात स्थिर आणि सक्षम प्रगती होईल. थेंबे थेंबे तळे साचे असा अनुभव येईल.फायनान्स - आर्थिक बाबतीत अनुकूल प्रसंग येतील. केलेल्या कष्टाचे उशिराने पण चांगले फळ मिळेल!रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत नात्यात आर्थिक आणि भौतिक मुद्दे महत्त्वाचे ठरतील. किरकोळ गोष्टींकडे अती लक्ष जाण्याची शक्यता आहे.शिक्षण/परीक्षा - भरपूर कष्ट केले तर यश येईल! घाई गडबड करु नका. कुठेही जायचे असल्यास वेळेच्या आत निघा.खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात मनासारखे मोल मिळणार नाही. तडजोडी कराव्या लागतील.कोर्ट कचेरी - कोर्ट व्यवहारात धीराने घ्या. घाई गडबड केलीत तर नुकसान संभवते त्यामुळे सावकाश निर्णय घ्या.आरोग्य - आरोग्यात हळू पण स्थैर्यपूर्ण सुधारणा होईल. झाडांच्या सहवासात वेळ घालवा. बागेत चाला त्याने तजेलदार वाटेल.प्रवास - प्रवासात विनाकारण विलंब होण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळेआधी निघा. पैशाचे पाकीट, तिकीट, गाडीचे पेट्रोल इत्यादी सांभाळा.

या मार्गदर्शनाबद्दल आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की ईमेल द्वारे सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ईमेल द्वारे विचारू शकता - sumedhranade531@gmail.com

श्रीस्वामी समर्थ.

English
हिंदी सारांश
Web Title : Tarot Card: Mixed events, sweet ending; weekly forecast inside.

Web Summary : Weekly Tarot guidance offers insights for personal life, career, finance, relationships, education, and health. Choose a number (1, 2, or 3) with a specific question in mind to receive relevant advice for the week of January 25-31.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषWeekly Horoscopeसाप्ताहिक राशीभविष्य