Tarot Card: संमिश्र घटनांचा काळ पण शेवट गोडच; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 11:10 IST2026-01-24T11:09:00+5:302026-01-24T11:10:48+5:30
Tarot Card: टॅरो मार्गदर्शन वाचण्यासाठी मनामध्ये एखादा विषय किंवा प्रश्न ठेवून तीनपैकी कोणताही एक नंबर निवडा आणि नंबरप्रमाणे मार्गदर्शन वाचा.

Tarot Card: संमिश्र घटनांचा काळ पण शेवट गोडच; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
२५ ते ३१ जानेवारी
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन वाचण्यासाठी १/२/३ पैकी कोणताही एक नंबर निवडा. नंबर निवडताना मनामध्ये एखादा विषय किंवा प्रश्न ठेवून नंबर निवडा आणि मग त्या नंबर साठी तुमच्या विषयानुसार किंवा प्रश्ननुसार मार्गदर्शन वाचा!
नंबर १:
वैयक्तिक आयुष्य - घरात क्लेशदायक गोष्टी संभवतात. अपेक्षाभंग किंवा मनाप्रमाणे न झाल्यामुळे त्रास होऊ शकतो. संयम ठेवा!
नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात वरिष्ठांसमोर शरणागती पत्करावी लागेल. स्वीकार करा फार लढायला जाऊ नका!
फायनान्स - आर्थिक बाबतीत हवे तेवढे यश येणार नाही त्यामुळे महत्त्वाचे आर्थिक व्यवहार टाळा!
रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत एखादी घटना अशी घडेल ज्यामुळे मोठा बदल होऊ शकतो. सगळ्याच गोष्टी तुमच्या हातात नसतील हे लक्षात ठेवा!
शिक्षण/परीक्षा - अती शहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा अनुभव येण्याची शक्यता आहे त्यामुळे जपून वागा, अती आत्मविश्वास नको!
खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात माघार घ्यावी लागेल. परिस्थितीचा स्वीकार करावा लागेल.
कोर्ट कचेरी - या बाबतीत तुमच्या हातात काहीच नसणार, त्यामुळे दुसऱ्यांवर अवलंबून रहावा लागेल. स्वतःचा इगो बाजूला ठेवून वागा!
आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे, कुपथ्य अंगाशी येऊ शकतं. अती साहस किंवा अती पराक्रम करायला जाऊ नका!
प्रवास - प्रवासात शांत राहिलात तर त्रास होणार नाही. अती श्रम किंवा दगदग करु नका!
नंबर २:
वैयक्तिक आयुष्य - घरात भावभावनांचे चांगले गुंफण होईल! खेळीमेळीचे वातावरण राहील. पाहुण्यांची ये जा होईल आणि त्यामुळे आनंदी वाटेल!
नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात समाधानकारक घटना घडतील. अचानक एखाद्याची मदत मिळेल! इतरांशी पटवून वागलात तर उत्तम!
फायनान्स - आर्थिक बाबतीत एखादी संधी येऊ शकते. पण खात्री करुन मगच गुंतवणूक करा. एखादा किरकोळ फायदा होऊ शकतो!
रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक वाटचाल होईल! दुरावलेली नाती जवळ येतील. अबोला मिटेल. प्रेम, सामंजस्य, समाधान वाढेल!
शिक्षण/परीक्षा - प्रामाणिक राहिलात तर मनाप्रमाणे यश येण्याची शक्यता आहे. जीव ओतून परिश्रम करा!
खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात तुम्हाला हवे तसे घडू शकते. ओळखीच्या व्यक्तींकडून मदत मिळेल.
कोर्ट कचेरी - कोर्ट व्यवहारात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. स्वार्थी विचार न करता समोरच्या बाजूचा देखील थोडा विचार करा, संवेदनशीलपणे वागा!
आरोग्य - आरोग्यात सुधारणा होईल. पाणी भरपूर प्या. कोणत्याही थेरपीला चांगला गुण येईल!
प्रवास - प्रवासात सुखद अनुभव येतील. समुद्र किनारी किंवा पाण्याच्या ठिकाणी प्रवास असेल तर उत्तम!

नंबर ३:
वैयक्तिक आयुष्य - घरात एखादा आर्थिक प्रश्न अडथळे आणण्याची शक्यता आहे. पण तुम्ही यशस्वीरित्या त्यातून मार्ग काढू शकता! संयमाने वागा!
नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात स्थिर आणि सक्षम प्रगती होईल. थेंबे थेंबे तळे साचे असा अनुभव येईल.
फायनान्स - आर्थिक बाबतीत अनुकूल प्रसंग येतील. केलेल्या कष्टाचे उशिराने पण चांगले फळ मिळेल!
रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत नात्यात आर्थिक आणि भौतिक मुद्दे महत्त्वाचे ठरतील. किरकोळ गोष्टींकडे अती लक्ष जाण्याची शक्यता आहे.
शिक्षण/परीक्षा - भरपूर कष्ट केले तर यश येईल! घाई गडबड करु नका. कुठेही जायचे असल्यास वेळेच्या आत निघा.
खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात मनासारखे मोल मिळणार नाही. तडजोडी कराव्या लागतील.
कोर्ट कचेरी - कोर्ट व्यवहारात धीराने घ्या. घाई गडबड केलीत तर नुकसान संभवते त्यामुळे सावकाश निर्णय घ्या.
आरोग्य - आरोग्यात हळू पण स्थैर्यपूर्ण सुधारणा होईल. झाडांच्या सहवासात वेळ घालवा. बागेत चाला त्याने तजेलदार वाटेल.
प्रवास - प्रवासात विनाकारण विलंब होण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळेआधी निघा. पैशाचे पाकीट, तिकीट, गाडीचे पेट्रोल इत्यादी सांभाळा.
या मार्गदर्शनाबद्दल आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की ईमेल द्वारे सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ईमेल द्वारे विचारू शकता -
sumedhranade531@gmail.com
श्रीस्वामी समर्थ.