Swami Samartha: पुष्य नक्षत्रावर सुरु करा स्वामीभक्ती, अध्यात्मात मिळेल गती, आयुष्यात होईल दुप्पट प्रगती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 10:15 IST2025-10-14T10:14:23+5:302025-10-14T10:15:57+5:30
Mangal Pushya Yoga 2025: आज १४ ऑक्टोबर रोजी पुष्य नक्षत्रावर सुरु केलेल्या कोणत्याही चांगल्या कामाचा दुप्पट लाभ होतो, म्हणून समर्थ कृपेसाठी 'ही' उपासना आजच सुरु करा.

Swami Samartha: पुष्य नक्षत्रावर सुरु करा स्वामीभक्ती, अध्यात्मात मिळेल गती, आयुष्यात होईल दुप्पट प्रगती!
पुष्य नक्षत्र हे भारतीय ज्योतिषशास्त्रातील २७ नक्षत्रांपैकी आठवे असून, याला सर्व नक्षत्रांचा 'राजा' किंवा 'नक्षत्रराज' म्हणून ओळखले जाते. हे नक्षत्र समृद्धी, पोषण, ऊर्जा आणि स्थैर्य प्रदान करणारे मानले जाते, ज्याचे मुख्य देवता देवगुरू बृहस्पती आहेत. या नक्षत्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, या काळात केलेले कोणतेही शुभ कार्य (उदा. खरेदी, गुंतवणूक, नवीन संकल्प) हे अक्षय (कधीही न संपणारे) फल देते. म्हणूनच, दिवाळीपूर्वी धनत्रयोदशीप्रमाणेच पुष्य नक्षत्राचा दिवस धन आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या नक्षत्रात फक्त विवाहाचे कार्य वर्ज्य आहे; बाकी सर्व शुभ कार्यांसाठी हा दिवस उत्तम मुहूर्त ठरतो.
विशेषत: आज, मंगळवार, १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दिवाळीच्या(Diwali 2025) आधी पुष्य नक्षत्राचा मंगळवारी संयोग जुळून आल्यामुळे हा दिवस 'मंगल-पुष्य योग(Mangal Pushya Yoga 2025) म्हणून ओळखला जाईल. मंगळाचे आधिपत्य भूमीवर असल्याने, आजच्या दिवशी जमीन, घर, फ्लॅट किंवा स्थावर मालमत्ता खरेदी करणे अत्यंत शुभ ठरते. याशिवाय, सोने, चांदीचे दागिने तसेच म्युच्युअल फंड किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीची सुरुवात करण्यासाठी हा योग सर्वात फलदायी मानला जातो. आज दुपारी ३:४२ वाजल्यापासून सुरू होणारे हे नक्षत्र उद्या, १५ ऑक्टोबरला दुपारी ३:१९ पर्यंत राहील, ज्यामुळे या काळात गुंतवणूक आणि खरेदी केल्यास घरात स्थिर धनलक्ष्मीचा वास होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. या सुख समृद्धीला गुरु पाठबळ नसेल तर काहीच उपयोग नाही. यासाठी गुरु उपासनेची सुरुवात या मुहूर्तावर करा, ज्याचा दुप्पट लाभ तुम्हाला होईल.
स्वामी समर्थांची करेल भक्ती, मिळेल त्याला सुख, शांती आणि मुक्ती! हा आहे स्वामी समर्थांच्या उपासनेचा महिमा! अनेकांना स्वामी भक्ती करावी असे मनापासून वाटते. परंतु उपासना नेमकी कशी करावी हेच कळत नाही. अध्यात्म मार्गात उपास आणि उपासना दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. उपास असो वा उपासना या देवाच्या नावे करत असलो तरी त्याचा लाभ आपल्याला होणार असतो. उपवासामुळे आपले मन बाह्य गोष्टींकडून अलिप्त होते आणि अंतर्मनाकडे झुकते. तर उपासनेमुळे मन एकाग्र होते आणि चिंता मिटते.
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
सद्यस्थितीत ज्यांना शक्य आहे, त्यांनी स्वामी भक्ती म्हणून गुरुवारचा उपास करावा. मात्र जे ज्येष्ठ नागरिक असतील, औषध, गोळ्या सुरू असतील, त्यांनी उपास न करता उपासनेवर भर द्यावा. जे उपास करणार असतील त्यांनी केवळ फलाहार करावा. उपासाचे पदार्थ खाण्यापेक्षा उपास न केलेला बरा. अशा वेळी उपासापेक्षा उपासना जास्त फलदायी ठरते.
गुरु गोचर २०२५: १३ ऑक्टोबरचे गुरु भ्रमण अडलेल्या कामांना, विवाहाला, व्यवहाराला देणार सुपरफास्ट गती!
त्यासाठी दैनंदिन पूजेत पुढील गोष्टींचा समावेश करा :
>> रोज सकाळी देवपूजेसाठी १० मिनिटं राखीव ठेवा. अंघोळ झाल्यावर स्वामींसमोर शांत चित्ताने बसा. दिवा लावा. उदबत्ती लावा. स्वामींना सुगंधी फुल अर्पण करा. या प्राथमिक उपचाराने तुमचे मन शांत व एकाग्र होईल.
>> त्यानंतर 'श्री स्वामी समर्थ' हा जप १०८ प्रमाणे ११ वेळा जपमाळ करा. ११ वेळा शक्य नसेल तर निदान १ वेळा जपमाळ करा.
>> स्वामी चरित्र सारामृतातील तीन अध्याय वाचा. आठवड्याभरात पूर्ण ग्रंथ वाचून होईल. हेच रुटीन पुढच्या आठवड्यात सुरु ठेवा.
>> अध्याय वाचून झाले की स्वामींचा तारक मंत्र म्हणा.
>> स्वामींजवळ ठेवलेले पाणी सगळ्या घरातल्याना तीर्थ म्हणून द्या.
अशी ही स्वामी उपासना तुम्हाला निश्चितच फलदायी ठरेल याबाबत निःशंक व्हा आणि निर्भय व्हा!