शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी समर्थ प्रकट दिन २०२६: तुमच्यावर स्वामींची कृपा झाली आहे का? ओळखा 'या' ५ अदृश्य खुणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 12:43 IST

Swami Samarth: प्रत्येक स्वामी भक्ताला वाटते, आपल्यावर स्वामींची कृपा व्हावी, पण ती अगोदरच झाली आहे, हे कसे ओळखायचे ते आज स्वामी प्रगट दिनानिमित्त जाणून घ्या. 

आज २० मार्च २०२६, अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन(Swami Samartha Prakat Din 2026) सर्वत्र 'स्वामी समर्थ' नामाचा जयघोष सुरू आहे. पण या मंगलदिनी अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न येतो की, "इतकी सेवा करूनही स्वामींची माझ्यावर कृपा आहे का? ती कशी ओळखावी?"

अशक्यही शक्य करतील! श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा ‘या’ खास मराठी शुभेच्छा, Wishes, WhatsApp Status; मंगलमय करा स्वामीभक्तांचा आजचा दिवस!

संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, 'आपणासारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयालागी'. याचाच अर्थ असा की, सद्गुरू आपल्या शिष्याला वेळ न घालवता स्वतःसारखेच तेजस्वी बनवतात. आजच्या या शुभ मुहूर्तावर, स्वामींची कृपा झाली आहे हे ओळखण्याच्या काही 'अंतर्गत खुणा' आपण या लेखातून जाणून घेऊया.

स्वामींची कृपा झाली आहे हे कसे ओळखावे?

१. भीतीचा अभाव आणि अढळ विश्वास

जेव्हा तुमच्या मनात "कुणीतरी माझ्यासोबत सतत आहे, मी एकटा नाही" ही भावना दृढ होते, तेव्हा समजावे की स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. संकटे आली तरी मन विचलित न होता शांत राहते आणि तुमच्या प्रयत्नांबरोबरच "स्वामी बघून घेतील" हा विश्वास तुम्हाला मार्ग दाखवतो, हेच कृपेचे पहिले लक्षण आहे.

२. देहबोली आणि स्वभावात बदल

स्वामींची कृपा केवळ मठात नसते, ती तुमच्या वागण्यातून दिसते. जर तुमच्यातील अहंकार कमी झाला असेल, दुसऱ्यांना मदत करण्याची बुद्धी होत असेल आणि लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांशी तुम्ही प्रेमाने वागत असाल, तर स्वामी तुमच्यातच वास करत आहेत. दोन तास पूजा करून जर माणसांशी वाईट वागत असाल, तर ती भक्ती पोकळ आहे.

स्वामी समर्थ प्रकट दिन: श्री स्वामी समर्थांच्या दिव्य अवतारकार्याची आणि अक्कलकोट वास्तव्याची संपूर्ण कथा

३. कर्तव्याप्रती जागरुकता

अनेकदा आपल्याला वाटते की अध्यात्म म्हणजे संसार सोडणे. पण खरी गुरुकृपा माणसाला उत्तम 'संसार' करायला शिकवते. मुलांचे शिक्षण, धन-संपत्तीचा योग्य विनियोग आणि कुटुंबाप्रती आपली कर्तव्ये पार पाडण्याची जाणीव होणे, ही स्वामींचीच कृपा आहे.

४. नामस्मरणाची ओढ

जेव्हा तुम्हाला सांगून नाही, तर ओढीने नामस्मरण करावेसे वाटते; जेव्हा ८:२३ ची ट्रेन चुकली तरी चालेल पण दर्शनासाठी मन व्याकुळ होते, तेव्हा समजावे की स्वामींनी तुम्हाला आपल्या छत्रछायेत घेतले आहे. 

 

५. प्रसादापेक्षा 'प्रसारा'ची ओढ

एक चांगला भक्त केवळ स्वतःसाठी प्रसाद आणत नाही, तर तो ज्ञानाचा प्रसार करतो. जर तुम्हाला स्वामींचे विचार, पोथी किंवा ग्रंथ इतरांना वाटावेसे वाटत असतील, जेणेकरून त्यांनाही हा मार्ग गवसावा, तर तुमची भक्ती 'सोळा नंबरी सोन्यासारखी' झाली आहे असे समजावे.

गुरुकृपा: एक सुखद अनुभव : "गुरुकृपा म्हणजे थेट भेट—ह्या मनाची त्या मनाशी, ह्या हृदयाची त्या हृदयाला!"

दिलासादायक! ज्योतिषांनी सांगितली युद्ध समाप्तीची तारीख; दोन ग्रहांची धोकादायक 'युती' तुटायचा दिवस येतोय जवळ!

जेव्हा तुम्हाला समाधानाची शांत झोप लागते, जेव्हा भविष्याची अनामिक भीती उरत नाही आणि जेव्हा तुमची ओंजळ भरलेली नसली तरी मन तृप्त असते, तेव्हा समजावे की स्वामींचा वरदहस्त तुमच्या पाठीवर आहे. एकदा का त्यांचे बोट धरले की, मग आपण आपले राहतच नाही; ते नेतील तिथे आणि करतील ते, या विश्वासाने आयुष्य मार्गस्थ होते.

आजच्या प्रकट दिनी स्वतःला एकच प्रश्न विचारा— "मी स्वामींच्या आज्ञेत आहे का?" जर उत्तर 'हो' असेल, तर खात्री बाळगा, ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत!

English
हिंदी सारांश
Web Title : Swami Samarth Prakat Din: Signs of His Blessings in Your Life

Web Summary : On Swami Samarth Prakat Din, discover if you're blessed. Signs include unwavering faith, humility, duty awareness, devotional yearning, and spreading wisdom. These indicate Swami's grace and guidance in your life, bringing peace and fulfillment.
टॅग्स :shree swami samarthश्री स्वामी समर्थIndian Festivalsभारतीय उत्सव-सणspiritualअध्यात्मिकPrakatdinप्रकट दिन