अशक्यही शक्य करतील! श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा ‘या’ खास मराठी शुभेच्छा, Wishes, WhatsApp Status; मंगलमय करा स्वामीभक्तांचा आजचा दिवस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 13:07 IST2026-03-19T11:52:21+5:302026-03-19T13:07:15+5:30

Shree Swami Samarth Prakat Din Wishes in Marathi: स्वामी समर्थ प्रकट दिन २०२६: व्हॉट्सॲप स्टेटस आणि फेसबुकवर शेअर करण्यासाठी खास मराठी शुभेच्छा संदेशांचा खजिना!

Swami Samarth Prakat Din 2026 Wishes in Marathi Messages Images, Whatsapp Status, Shree Swami Samarth Maharaj Quotes | अशक्यही शक्य करतील! श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा ‘या’ खास मराठी शुभेच्छा, Wishes, WhatsApp Status; मंगलमय करा स्वामीभक्तांचा आजचा दिवस!

अशक्यही शक्य करतील! श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा ‘या’ खास मराठी शुभेच्छा, Wishes, WhatsApp Status; मंगलमय करा स्वामीभक्तांचा आजचा दिवस!

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" म्हणत आधार देणाऱ्या स्वामी समर्थांचा प्रकट दिन २०२६ (Shree Swami Samartha Prakat Din 2026) म्हणजे सर्व भक्तांसाठी एक सुवर्णक्षणच! या मंगलमयी निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी खास आणि हृदयस्पर्शी शुभेच्छा संदेश येथे घेऊन आलो आहोत. हे संदेश आपल्या मित्र-नातेवाईकांना आवर्जून पाठवा आणि सोशल मीडियावर शेअर करून या भक्तीचा आनंद द्विगुणित करा

श्री स्वामी समर्थप्रकट दिनाच्या शुभेच्छा (Swami Samarth Prakat Din Wishes In Marathi)

अनंत कोटी ब्रह्मांडनायक भक्तवत्सल 
श्री सद्गुरु राजाधिराज योगीराज 
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सर्व स्वामी भक्तांना कोटी कोटी प्रणाम! 

ज्यांच्या स्मरणाने दुःख दूर पळते, ज्यांच्या दर्शनाने मन शांत होते, 
अशा त्रैलोक्य स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

श्रद्धेचा दिवा तेवत ठेवा, स्वामी तुमच्या सदैव पाठीशी आहेत. 
अशक्य ही शक्य करतील स्वामी... 
श्री स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! (Shree Swami Samarth Prakat Din Chya Shubhechha)

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे... हे केवळ वाक्य नाही, 
तर प्रत्येक संकटात स्वामींनी दिलेली जणू जगण्याची ताकद आहे. 
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा!

तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम... 
स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना की तुमचे आयुष्य सुख-समाधानाने भरून जावो
स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या शुभेच्छा! (Shree Swami Samarth Prakat Dinachya Shubhechha)

स्वामींचे अस्तित्व कणाकणात आहे, 
फक्त मनोभावे हाक मारा, स्वामी सोबतच आहेत!
स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

नाम स्मरावे, ध्यान धरावे, स्वामींच्या चरणी लीन व्हावे. 
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

माझे सर्वस्व, माझे गुरु... श्री स्वामी समर्थ! 
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

निःशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी,
नित्य आहे रे मना । अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा! 

स्वामींचे नाम जपता जपता,जीवन आनंदमय होते!
भक्तीच्या या दिव्य प्रकाशात, संकटही नष्ट होऊन जाते!
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वामी समर्थांची कृपा राहो,
जीवनात सुख-समाधान लाभो!
नित्य त्यांच्या नामस्मरणाने,
संकटांचे सावटही निघून जाओ!!
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा!

स्वामींचे आशीर्वाद म्हणजे
जीवनाचा खरा आधार
श्रद्धा ठेवा, यश नक्की मिळेल.
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! (Shree Swami Samarth Maharaj Shubhechha)

सुख-समृद्धी नांदो घरोघरी,
स्वामींचा वरदहस्त लाभो!
पाप-ताप नष्ट होऊन,
जीवनात नवा प्रकाश येवो!
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वामी समर्थ, शक्ती अपार,
तुमच्याच कृपेने सुटती भार!
भक्तांसाठी आधार असता,
संकटकाळात पाठीशी उभा! 
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Web Title : श्री स्वामी समर्थ प्रकट दिन: प्रियजनों को भेजने के लिए शुभकामनाएँ।

Web Summary : श्री स्वामी समर्थ प्रकट दिन 2026 भक्तों के लिए एक सुनहरा अवसर है। इस शुभ दिन पर दोस्तों और परिवार के साथ हार्दिक शुभकामनाएँ साझा करें, आनंद और भक्ति फैलाएं। याद रखें स्वामी हमेशा आपके साथ हैं।

Web Title : Swami Samarth Prakat Din: Best wishes to share with loved ones.

Web Summary : Swami Samarth Prakat Din 2026 is a golden moment for devotees. Share these heartfelt wishes with friends and family, spreading joy and devotion on this auspicious day. Remember Swami is always there for you.