सोम प्रदोष २०२६: मानसिक शांती आणि कर्जमुक्तीसाठी 'सोम प्रदोष' आहे सर्वोत्तम! पहा पूजेचा शुभ मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 15:29 IST2026-03-28T15:28:28+5:302026-03-28T15:29:35+5:30

सोम प्रदोष २०२६: ३० मार्च, सोम प्रदोष! या काळात केलेला 'हा' एक विधी तुमचं नशीब पालटू शकतो! वाचा अचूक पूजा पद्धत

Som Pradosh 2026: 'Som Pradosh' is the best for mental peace and debt relief! See the auspicious time for worship | सोम प्रदोष २०२६: मानसिक शांती आणि कर्जमुक्तीसाठी 'सोम प्रदोष' आहे सर्वोत्तम! पहा पूजेचा शुभ मुहूर्त

सोम प्रदोष २०२६: मानसिक शांती आणि कर्जमुक्तीसाठी 'सोम प्रदोष' आहे सर्वोत्तम! पहा पूजेचा शुभ मुहूर्त

येत्या सोमवार, ३० मार्च २०२६ रोजी 'सोम प्रदोष(Som Pradosh 2026) व्रत आहे. जेव्हा प्रदोष तिथी सोमवारी येते, तेव्हा त्याला 'सोम प्रदोष' म्हणतात. हे व्रत भगवान शंकरांना अत्यंत प्रिय असून, मानसिक शांती आणि चंद्राशी संबंधित दोषांच्या निवारणासाठी हे व्रत प्रभावी मानले जाते.

सामुद्रिक शास्त्र: तुमचं कपाळ मोठं आहे? मग तुम्ही जन्मतःच 'या' खास गोष्टींचे मालक आहात; जाणून घ्या कसं!

हिंदू धर्मात प्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे. दर महिन्याच्या त्रयोदशीला प्रदोष व्रत पाळले जाते. सोमवार हा महादेवाचा वार असल्याने, या दिवशी येणारा प्रदोष 'सोम प्रदोष' म्हणून ओळखला जातो. हे व्रत केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील संकटे दूर होतात, अशी श्रद्धा आहे.

सोम प्रदोष व्रताचे महत्त्व

मानसिक शांती: सोम प्रदोष केल्याने चंद्राचे दोष दूर होतात आणि मनातील अस्थिरता कमी होऊन शांती लाभते.

इच्छापूर्ती: असे मानले जाते की, या दिवशी प्रदोष काळात (संध्याकाळी) केलेली पूजा कधीही निष्फळ ठरत नाही.

आरोग्य आणि समृद्धी: भगवान शिव आणि माता पार्वतीच्या संयुक्त पूजेमुळे घरात सुख-समृद्धी नांदते.

Ritual: आजारपण आणि दारिद्र्य तुमच्या घराचा रस्ता विसरतील! जेवणापूर्वी करा 'हा' विधी!

सोम प्रदोष पूजा विधी 

प्रदोष व्रताची मुख्य पूजा 'प्रदोष काळात' म्हणजेच सूर्यास्ताच्या ४५ मिनिटे आधी आणि ४५ मिनिटे नंतर या काळात केली जाते.

१. सकाळची तयारी: सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ पांढरे किंवा हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करावे.
२. व्रत संकल्प: देवासमोर बसून हातात थोडे पाणी आणि अक्षता घेऊन व्रताचा संकल्प करावा.
३. शिवलिंगाचा अभिषेक: प्रदोष काळात शिवलिंगावर दूध, मध, दही, तूप आणि साखरेने (पंचामृत) अभिषेक करावा. त्यानंतर शुद्ध जलाने अभिषेक करावा.
४. प्रिय वस्तू अर्पण करा: महादेवाला बेलपत्र, धोत्र्याची फुले, पांढरे चंदन आणि भस्म अर्पण करावे. 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
५. आरती आणि नैवेद्य: भगवान शिव आणि माता पार्वतीची आरती करावी. नैवेद्यासाठी खीर किंवा पांढऱ्या मिठाईचा वापर करावा.
६. दानधर्म: पूजेनंतर गरिबांना अन्नदान किंवा पांढऱ्या वस्तूंचे (उदा. तांदूळ, साखर) दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते.

Hanuman Jayanti 2026: लक्ष्मण-भरताची मंदिरं का नसतात? वाचा हनुमानाच्या 'अतुलनीय' देवत्त्वाचे रहस्य!

लक्षात ठेवण्यासारखे नियम 

आहार: या दिवशी पूर्ण उपवास करावा. शक्य नसल्यास फलाहार किंवा सात्विक भोजन घ्यावे.

संयम: मनामध्ये कोणाबद्दलही द्वेष किंवा राग आणू नये. पूर्ण दिवस नामस्मरणात घालवावा.

टाळायच्या गोष्टी: कांदा, लसूण आणि तामसिक पदार्थांचे सेवन करू नये.

Web Title : सोम प्रदोष 2026: मानसिक शांति और कर्ज मुक्ति के लिए सर्वोत्तम

Web Summary : 30 मार्च 2026 को सोम प्रदोष व्रत है, जो भगवान शिव को समर्पित है। यह व्रत मानसिक शांति, चंद्र दोषों को दूर करता है, मनोकामनाएं पूरी करता है और जीवन की बाधाओं को दूर करता है। संध्या प्रदोष काल पूजा और दान के लिए उत्तम है।

Web Title : Som Pradosh 2026: Best for mental peace and debt relief.

Web Summary : Som Pradosh on March 30, 2026, is dedicated to Lord Shiva. Observing this fast brings mental peace, removes lunar defects, fulfills wishes, and eliminates life's obstacles. The evening Pradosh period is ideal for worship, offering prayers and donations for prosperity.