प्रसिद्ध ज्योतिषी अरुण कुमार व्यास यांनी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या 'कंकणाकृती सूर्यग्रहणा'बद्दल (Ring of Fire) एक अत्यंत महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते, हे ग्रहण केवळ खगोलीय घटना नसून अनेक राशींसाठी 'गोल्डन पिरीयड' (सुवर्णकाळ) सुरू करणारी एक आध्यात्मिक किल्ली आहे.
सोमवती अमावास्या २०२६: सोमवती अमावास्येला ग्रहणाचे सावट! या काळात काय करावे आणि काय टाळावे?
१७ फेब्रुवारी २०२६ रोजी अवकाशात 'कंकणाकृती सूर्यग्रहण(Solar Eclipse 2026) म्हणजेच 'रिंग ऑफ फायर' दिसणार आहे. या ग्रहणासोबतच सोमवती अमावास्येचा प्रभाव आणि पंचक काळ यांचा दुर्मिळ संयोग जुळून येत आहे. ज्योतिषी अरुण कुमार व्यास यांच्या मते, दुपारी ३ ते ५ ही वेळ तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता संपवून नवीन ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
काय आहे हा 'गोल्डन पिरीयड'?
व्यास यांच्या दाव्यानुसार, हे ग्रहण कुंभ राशीत होत असून तिथे ग्रहांची जी स्थिती निर्माण होत आहे, ती योग्य पद्धतीने हाताळल्यास पुढील ५ वर्षे तुमच्यासाठी यशाची आणि समृद्धीची दारे उघडू शकतात. या काळाला त्यांनी 'गोल्डन पिरीयड' असे संबोधले आहे. या काळात पुढे दिलेली कृती प्रभावी ठरेल.
शॅडो मॅनिफेस्टेशन (Shadow Manifestation) म्हणजे काय?
ग्रहणाच्या काळात चंद्राची सावली सूर्याला झाकते. या 'सावलीच्या' काळात आपल्या अंतर्मनातील सुप्त इच्छा आणि भीती बाहेर येतात. अरुण कुमार व्यास यांनी या काळात शॅडो मॅनिफेस्टेशन करण्याचा सल्ला दिला आहे.
अर्थ: आपल्या आयुष्यातील ज्या उणिवा किंवा जुन्या सवयी (Shadows) आपल्याला प्रगतीपासून रोखत आहेत, त्या ओळखून त्यांचा त्याग करणे आणि नवीन ध्येयांचा संकल्प करणे.
वेळ: दुपारी ३ ते ५ या काळात शांत बसून स्वतःच्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित केल्यास ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या इच्छा पूर्ण करण्यास मदत करते.
दुपारी ३ ते ५ या काळात काय करावे?
१. मौन पाळा: शक्य असल्यास या दोन तासांत मौन पाळावे. विनाकारण बोलण्याने ऊर्जा खर्च होते.२. जप आणि ध्यान: 'ॐ नमः शिवाय' किंवा आपल्या इष्टदेवतेचा जप करावा. या काळात केलेली उपासना १० पटीने अधिक फलदायी ठरते.३. संकल्प सोडा: तुम्हाला पुढील ५ वर्षांत काय साध्य करायचे आहे, याचा ठाम संकल्प मनात ठेवा.४. भयमुक्त व्हा: शॅडो मॅनिफेस्टेशनचा अर्थच हा आहे की, मनात असलेली भविष्याची भीती काढून टाका आणि आत्मविश्वासाने सुवर्णकाळाचे स्वागत करा.५. सूर्याकडे पाठ करा: सूर्याकडे पाठ करून उभे राहा, ज्यामुळे जमिनीवर तुमची सावली पडेल, तिच्याकडे बघत सूर्यदेवाला मनोमन वंदन करून आपली इच्छा मनात बोलून दाखवा आणि येत्या काळात ती पूर्ण होणार आहे याची अनुभूती घ्या. यालाच शॅडो मॅनिफेस्टेशन म्हणतात.
पंचक आणि अमावास्येचे भान ठेवा
१६ फेब्रुवारीला सोमवती अमावस्या(Somavati Amavasya 2026) आणि १७ तारखेचे ग्रहण, सोबतच पंचक(Panchak 2026) सुरु होत असल्याने मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. अशा वेळी गोंधळून न जाता अरुण कुमार व्यास यांनी सांगितल्याप्रमाणे धैर्याने आणि आध्यात्मिक बळाने या काळाचा उपयोग करून घेतल्यास अनपेक्षित लाभ होऊ शकतात. पाहा त्यांचा व्हिडीओ -
Web Summary : Astrologer Arun Kumar Vyas predicts the 2026 solar eclipse will trigger a 'Golden Period' for many zodiac signs. Embrace this time by practicing shadow manifestation, focusing on your goals between 3 PM and 5 PM, and releasing fears to welcome success.
Web Summary : ज्योतिषी अरुण कुमार व्यास के अनुसार, 2026 का सूर्य ग्रहण कई राशियों के लिए 'गोल्डन पीरियड' लाएगा। 3 से 5 बजे के बीच छाया अभिव्यक्ति का अभ्यास करें, अपने लक्ष्यों पर ध्यान केंद्रित करें और सफलता का स्वागत करने के लिए भय त्यागें।