Shukrawar Upay: शुक्रवारची प्रसन्न सुरुवात: सुख-समृद्धी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी करा 'हे' ५ सोपे उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 16:41 IST2026-02-05T16:39:25+5:302026-02-05T16:41:15+5:30
Shukrawar Laxmi Puja: देवी लक्ष्मीची आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहावी म्हणून शुक्रवारी दिलेले उपाय करा, लाभ होईल!

Shukrawar Upay: शुक्रवारची प्रसन्न सुरुवात: सुख-समृद्धी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी करा 'हे' ५ सोपे उपाय!
शुक्रवारचा दिवस आपल्या आयुष्यात 'लक्झरी' आणि 'शांती' घेऊन येतो. जर तुमची शुक्रवारची सुरुवात योग्य झाली, तर केवळ तो दिवसच नाही तर संपूर्ण आठवडा आनंदी जातो. शास्त्रानुसार शुक्रवारची सकाळ कशी असावी, याच्या काही खास टिप्स खालीलप्रमाणे आहेत.
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात नशिबाचे धनी; आयुष्यभर लाभतं अमाप सुख-समाधान!
१. लवकर उठून स्नान आणि स्वच्छता:
शुक्रवारी सूर्योदयापूर्वी उठणे अत्यंत शुभ मानले जाते. स्नानाच्या पाण्यात थोडे 'गंगाजल' किंवा 'वेलची' टाकून स्नान केल्यास अंगातील नकारात्मकता दूर होते आणि शुक्र ग्रह बलवान होतो. या दिवशी शक्यतो स्वच्छ आणि इस्त्री केलेले कपडे परिधान करावेत.
२. उंबरठ्याचे पूजन आणि रांगोळी:
लक्ष्मीचा प्रवेश मुख्य दारातून होतो, असे मानले जाते. शुक्रवारी सकाळी घराचा मुख्य उंबरठा स्वच्छ पुसून घ्यावा. उंबरठ्यावर हळद-कुंकू वाहावे आणि दारासमोर तांदळाच्या पिठाची किंवा रंगाची सुंदर रांगोळी काढावी. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेरच राहते.
औदुंबर पंचमी: साक्षात कल्पवृक्षाच्या पूजेचा दिवस; 'या' पद्धतीने करा साधना, मिळेल गुरूंचा आशीर्वाद
३. माता लक्ष्मीची उपासना:
देवघरात गाईच्या तुपाचा दिवा लावावा. माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल किंवा पांढरी फुले अर्पण करावीत. शक्य असल्यास 'महालक्ष्मी अष्टकम' किंवा 'श्री सूक्त' याचे पठण करावे. यामुळे घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते.
४. पांढऱ्या वस्तूंचा वापर आणि दान:
शुक्र ग्रहाचा रंग पांढरा आहे. त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे वापरणे किंवा पांढऱ्या वस्तूंचे (उदा. साखर, तांदूळ, दूध) दान करणे अत्यंत फलदायी ठरते. सकाळी काहीतरी गोड पदार्थ खाऊन घराबाहेर पडल्यास कामात यश मिळते.
नागासाधूंसाठी प्राणापेक्षाही प्रिय असते 'ही' वस्तू; ती तुटली तर मिळते कठोर शिक्षा!
५. स्त्रीशक्तीचा सन्मान:
शुक्रवार हा देवीचा दिवस आहे, घरातल्या स्त्रियांचा आदर ठेवावा, एखाद्या कुमारिकेला गरजू वस्तूंचे दान द्यावे, ज्येष्ठ गरजू बाईला अन्नदान करावे. विविध रूपातील स्त्री शक्तीला आनंदी ठेवल्याने घरात आपोआप सुख-समाधान नांदते.