Shukra Pradosh 2026: १६ जानेवारी 'शुक्र प्रदोष': सुख-समृद्धी आणि अखंड सौभाग्यासाठी करा 'हे' उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 07:00 IST2026-01-16T07:00:01+5:302026-01-16T07:00:02+5:30
Shukra Pradosh 2026: सुख, समृद्धी आणि कौटुंबिक सौख्य देणारे शुक्र प्रदोष व्रत १६ जानेवारी रोजी आहे, त्यादिवशी दिलेले उपाय केले असता होतो लाभ!

Shukra Pradosh 2026: १६ जानेवारी 'शुक्र प्रदोष': सुख-समृद्धी आणि अखंड सौभाग्यासाठी करा 'हे' उपाय!
हिंदू धर्मात प्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे. दर महिन्याच्या त्रयोदशीला प्रदोष पाळला जातो. शुक्रवारी येणाऱ्या प्रदोषाला 'भृगुवारा प्रदोष' किंवा 'शुक्र प्रदोष(Shukra Pradosh 2026) असेही म्हणतात. १६ जानेवारी रोजी असणाऱ्या या प्रदोषाचा शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजा विधी जाणून घेऊया.
Palmistry: तळहातावर शंख, कमळ, मासा, धनुष्य यांसारखी चिन्ह देतात राजयोगाचे संकेत
शुक्र प्रदोषाचे महत्त्व
शुक्र प्रदोष हा केवळ भगवान शिवच नाही, तर माता लक्ष्मीच्या कृपेसाठीही महत्त्वाचा मानला जातो. ज्यांच्या कुंडलीत शुक्र ग्रह कमजोर आहे किंवा ज्यांना वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत, त्यांच्यासाठी हे व्रत वरदान ठरते. असे मानले जाते की, या दिवशी विधीवत पूजा केल्याने दारिद्र्य दूर होऊन जीवनात ऐश्वर्य येते.
पूजेचा शुभ मुहूर्त (प्रदोष काळ)
प्रदोषाची पूजा नेहमी सूर्यास्तानंतरच्या ठराविक काळात (प्रदोष काळ) केली जाते.
त्रयोदशी तिथी प्रारंभ: १६ जानेवारी २०२६
प्रदोष पूजा वेळ: १६ जानेवारी संध्याकाळी (स्थानिक सूर्यास्ताच्या वेळेनुसार साधारण ५:५० ते ८:२५ च्या दरम्यान)
पूजेची विधी
१. शुचिर्भूत व्हा: सकाळी स्नान करून पांढरे किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करा.
२. उपवास: शक्य असल्यास निराहार उपवास करावा किंवा फलाहार घ्यावा.
३. अभिषेक: संध्याकाळी प्रदोष काळात महादेवाला पंचामृत आणि गंगाजलाने अभिषेक करावा.
४. विशेष अर्पण: शंकराला पांढरी फुले, बेलपत्र, शमीची पाने आणि भस्म अर्पण करावे. शुक्र प्रदोष असल्याने महादेवाला तांदळाची खीर अर्पण करणे शुभ मानले जाते.
५. मंत्र जप: "ॐ नमः शिवाय" किंवा "महामृत्युंजय मंत्राचा" १०८ वेळा जप करावा.
काही हरवलंय? काळजी सोडा! 'हा' एक मंत्र तुमची वस्तू शोधून देईल; अनेकांनी घेतलाय अनुभव
शुक्र प्रदोष विशेष उपाय
सुखी वैवाहिक जीवनासाठी: शुक्र प्रदोषाच्या दिवशी उकळलेल्या दुधात खडीसाखर घालून त्याचा नैवेद्य शंकराला दाखवावा.
आर्थिक भरभराटीसाठी: संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा आणि गरिबांना पांढऱ्या वस्तूंचे (साखर, दूध किंवा तांदूळ) दान करावे.