२३ दिवस केवळ २ उपाय न चुकता सलग करा; स्वामी शुभ तेच करतील, अशक्यही शक्य होईल, विश्वास ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 15:31 IST2026-02-25T15:30:39+5:302026-02-25T15:31:27+5:30

Shree Swami Samarth Prakat Din 2026: हे सरळ आणि सोपे उपाय करण्यासाठी फक्त पाच ते दहा मिनिटे लागू शकतील. हे उपाय करताना कोणते नियम पाळावेत? जाणून घ्या...

shree swami samarth prakat din 2026 should do only 2 remedies continuously without fail and swami maharaj will even impossible become possible only have faith | २३ दिवस केवळ २ उपाय न चुकता सलग करा; स्वामी शुभ तेच करतील, अशक्यही शक्य होईल, विश्वास ठेवा!

२३ दिवस केवळ २ उपाय न चुकता सलग करा; स्वामी शुभ तेच करतील, अशक्यही शक्य होईल, विश्वास ठेवा!

Shree Swami Samarth Prakat Din 2026: भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून, अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भूत अनुभव येतो. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. मार्च महिन्यात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. २६ फेब्रुवारी २०२६ च्या गुरुवारपासून एक संकल्प घेऊन केवळ पाच ते दहा मिनिटांत होणारे दोन उपाय अवश्य करून पाहावेत, असे म्हटले जाते. जाणून घेऊया...

स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. अनेकदा समस्या, अडचणी, संकटे काही केल्या पाठ सोडत नाहीत. एक संपली की दुसरी समोर उभी असते. धकाधकीच्या जीवनात बरे वाईट अनुभव येत असतात. काही वेळेस अशा काही घटना घडतात, तेव्हा मन उद्विग्न होते. बेचैन व्हायला होते. अनेक दिवस अशाच अशांत मानसिकतेत जात असतात. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतो, चाचपडत असतो. केवळ अंधारच डोळ्यासमोर दिसत असतो. सगळे दिवस सारखे नसतात, सुख दुःखाचा ससेमिरा सुरूच राहतो. चांगले दिवस दाखवण्याआधी स्वामी परीक्षा घेतात, असे म्हटले जाते. स्वामींची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहावी, असे नेहमीच वाटत असते. त्यासाठी आपणही स्वामी सेवा करण्यात कमी पडता कामा नये, असे सांगितले जाते. 

२३ दिवस केवळ २ उपाय न चुकता सलग करा

गुरुवार, २६ फेब्रुवारी २०२६ पासून पुढे २३ दिवसांनी शुक्रवार, २० मार्च २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आहे. मनाशी संकल्प करावा आणि सलग २३ दिवस न चुकता हे दोन उपाय अवश्य करून पाहावेत, असे सांगितले जाते. यापैकी एक उपाय सकाळी करायचा आहे आणि दुसरा सायंकाळी करायचा आहे. अगदी लगेच २६ फेब्रुवारीच्या गुरुवारपासून शक्य नसेल, तर २१ दिवसांचा कालावधी निश्चित करून स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत तरी हे दोन उपाय करावेत. जर शक्य होणार असेल, तर स्वामी प्रकट दिनाच्या नंतरही जोपर्यंत तुम्हाला शक्य आहे, तोपर्यंत हे दोन उपाय सुरूच ठेवावेत. त्यात खंड पडू देऊ नये. 

नेमके कोणते २ उपाय करावेत?

सकाळच्या वेळात पहिला उपाय करावा. एक वही घ्यावी आणि त्यावर २१ वेळा ‘श्री स्वामी समर्थ’ असे लिहावे. तसेच सायंकाळी स्वामींचा अत्यंत प्रभावी मानला गेलेला तारक मंत्र म्हणावा किंवा श्रवण करावा. हे दोन्ही उपाय करताना सकाळी आणि सायंकाळी वेळ निश्चित करावी. तुम्हाला जी वेळ योग्य वाटते, ती वेळ निवडावी आणि हे दोन्ही उपाय करावेत. न चुकता आणि सलग हे उपाय करावेत. हे दोन्ही उपाय करणार असल्याचा संकल्प करावा. सुरुवातीला श्री स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत तरी हे उपाय करावेत. नंतर शक्य असेल, तर पुढे तुम्हाला जोपर्यंत हे दोन्ही उपाय करायला जमत आहेत, तोपर्यंत हे उपाय करावेत. 

- स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे. 

- स्वामी नक्कीच शुभ करतील, अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. 

- स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण, स्वामी सेवा करत राहा. 

- स्वामी निश्चित मदत करतील अन् अशक्यही शक्य करतील, असा दृढ विश्वास मनात कायम ठेवा.

॥ श्री स्वामी समर्थ ॥

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

 

Web Title : 23 दिनों का स्वामी उपाय: मनोकामना पूरी, असंभव भी संभव!

Web Summary : भक्त मानते हैं कि स्वामी समर्थ असंभव को भी संभव करते हैं। 26 फरवरी, 2026 से शुरू करके, 23 दिनों तक दो सरल दैनिक उपाय करें: सुबह 21 बार 'श्री स्वामी समर्थ' लिखें और शाम को तारक मंत्र का जाप करें। आशीर्वाद के लिए अटूट विश्वास रखें।

Web Title : 23-Day Swami Remedy: Fulfill Wishes, Believe in the Impossible!

Web Summary : Devotees believe Swami Samarth makes the impossible possible. Starting February 26, 2026, do two simple daily remedies for 23 days: write 'Shree Swami Samarth' 21 times in the morning and chant the Taraka Mantra in the evening. Have unwavering faith for blessings.