श्री स्वामी समर्थ प्रकट दिन २०२६: स्वामी पूजनाची तयारी कशी कराल? पूजा साहित्यात ‘या’ वस्तू हव्यातच; पाहा, यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 09:48 IST2026-03-18T09:44:07+5:302026-03-18T09:48:06+5:30

Shree Swami Samarth Prakat Din 2026: स्वामी पूजनात भाव महत्त्वाचा. मनापासून स्वामी सेवा करावी, असे सांगितले जाते.

shree swami samarth prakat din 2026 know how to prepare for swami pujan these items are a must in the puja sahitya here see the list | श्री स्वामी समर्थ प्रकट दिन २०२६: स्वामी पूजनाची तयारी कशी कराल? पूजा साहित्यात ‘या’ वस्तू हव्यातच; पाहा, यादी

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन २०२६: स्वामी पूजनाची तयारी कशी कराल? पूजा साहित्यात ‘या’ वस्तू हव्यातच; पाहा, यादी

Shree Swami Samarth Maharaj Prakat Din 2026: श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा प्रत्येक स्वामी भक्तासाठी पर्वणीच असतो. स्वामींची सेवा कशी करावी, काय करावी, काय तयारी करावी, याबाबत विचारविनिमय सुरू होतो. स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी कोट्यवधि भाविक आवर्जून स्वामींची विशेष सेवा, स्वामींचे विशेष पूजन करत असतात. प्रत्येक जण आपापला भाव, परंपरा याप्रमाणे स्वामी पूजनाची तयारी करत असतो. परंतु, अशा काही गोष्टी आहेत, ज्या स्वामी पूजनात असाव्यातच असे सांगितले जाते. 

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून, अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भूत अनुभव येतो. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. यंदा, शुक्रवार २० मार्च २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आहे. 

स्वामी पूजनाची तयारी कशी करावी?

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनी स्वामींचे विशेष पूजन करावे. षोडषोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजा करावी. स्वामींना पंचामृत अर्पण करायचे असेल, तर दूध, दही, साखर, तूप आणि मध हे पूजा साहित्यात घ्यावे. तसेच चौरंग, त्यावर घालायला पिवळे वस्त्र (पिवळ्या रंगाचे नसेल तर ज्या रंगाचे असेल ते), पाट, अभिषेक करणार असाल तर त्यासाठी अभिषेक पात्र, पूजेसाठी तांब्या, ताम्हण, पळी पंचपात्री, श्रीफल, विडा, पाच प्रकारची फळे, फुले असावीत. त्यासह धूप, दीप, कापूर आरती याचीही तयारी करावी. 

पूजा साहित्यात ‘या’ वस्तू हव्यातच

स्वामी महाराजांना पिवळी फुले अवश्य अर्पण करावी. यासाठी पिवळ्या रंगाची विविध प्रकारची फुले आणून ठेवा. सोनचाफा असेल तर उत्तमच. तसेच स्वामींना अर्पण करण्यासाठी पिवळ्या रंगाची मिठाई आणून ठेवा. स्वामींच्या आवडीचे पदार्थ नैवेद्यासाठी आणून ठेवा किंवा आधीच घरी तयार करून ठेवा. स्वामी पूजनात भाव महत्त्वाचा. त्यामुळे तुमची जी तयारी होईल, त्यानुसार स्वामींचे पूजन करा. मनापासून स्वामी सेवा करावी. स्वामी पूजन झाल्यानंतर तारक मंत्र म्हणावा. ‘श्री स्वामी समर्थ’ या मंत्रांचा १०८ वेळा जप करावा. स्वामींची स्तोत्रे म्हणावीत, असे सांगितले जाते. 

॥ श्री स्वामी समर्थ ॥

Web Title : श्री स्वामी समर्थ प्रकट दिन २०२६: पूजा की तैयारी कैसे करें?

Web Summary : 20 मार्च, 2026 को श्री स्वामी समर्थ महाराज के प्रकट दिन की तैयारी भक्ति के साथ करें। पंचामृत सामग्री, पीला कपड़ा, फूल, मिठाई शामिल करें। प्रार्थना करें, मंत्रों का जाप करें और आशीर्वाद लें।

Web Title : Preparing for Shree Swami Samarth's Prakat Din 2026: Essential items list.

Web Summary : Prepare for Shree Swami Samarth Maharaj's Prakat Din on March 20, 2026, with devotion. Essential items include Panchamrit ingredients, yellow cloth, flowers, sweets. Offer prayers, chant mantras and seek blessings.