Shravan Shukrawar 2023: श्रावण शुक्रवारी, गोकर्णीचे रोप लावा दारी; लक्ष्मीमातेची होईल कृपा मिळेल अपार धनसंपदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 17:31 IST2023-09-07T17:28:46+5:302023-09-07T17:31:26+5:30
Shravan Shukrawar 2023: श्रावण शुक्रवारी आपण जिवतीचे आणि लक्ष्मी मातेचे पूजन करतो, त्याला जोड द्या वास्तू शास्त्राने सांगितलेल्या गोकर्णाच्या उपायाची!

Shravan Shukrawar 2023: श्रावण शुक्रवारी, गोकर्णीचे रोप लावा दारी; लक्ष्मीमातेची होईल कृपा मिळेल अपार धनसंपदा!
वास्तुशास्त्रानुसार गोकर्णीचे रोप घरामध्ये योग्य दिशेला लावल्यास देवी लक्ष्मीचे आगमन होते. तसेच भगवान विष्णू, शनिदेव आणि भगवान शिव यांना गोकर्णीची फुले आवडतात. गोकर्णीची रोप घरात ठेवल्यास घरातील प्रत्येक सदस्याला सुख, शांती, ऐश्वर्य आणि समृद्धी लाभते. श्रावण शुक्रवारनिमित्त वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या, घराच्या कोणत्या दिशेला आणि कोणत्या दिवशी गोकर्णीचे रोप लावणे शुभ असते.
वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या प्रत्येक गोष्टीतून नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. इतकेच नाही तर घरातील रोपट्यांचा प्रभाव व्यक्तीच्या आरोग्यावर आणि प्रगतीवरही पडतो. असे मानले जाते की ही झाडे जितक्या वेगाने वाढतील तितक्या वेगाने घरात आनंद आणि समृद्धीसह सकारात्मक उर्जेचा संचार वाढतो. तसेच ईश्वराचे वास्तव्य राहते. यादृष्टीने गोकर्णीचे रोप घरात लावा असे सुचवले जाते.
गोकर्णीचे रोप कोणत्या दिशेला लावावे?
वास्तुशास्त्रानुसार उत्तर-पूर्व दिशेला गोकर्णीचे रोप लावणे शुभ ठरते. कारण ही दिशा देवांच्या आगमनाची दिशा मानली जाते. देवतांना आकृष्ट करण्यासाठी या दिशेला गोकर्णीचे रोप लावा. या दिशेला लक्ष्मी माता तसेच कुबेर या देवतांचे निवास स्थान असते. तसेच या वनस्पतीमुळे शनी दशेतून सुटका होते असेही म्हणतात. म्हणून ईशान्य दिशा गोकर्णीसाठी शुभ मानली जाते. तसेच हे रोप गुरुवारी किंवा शुक्रवारी लावल्यास अधिक लाभ होतो असे म्हणतात.
मात्र हेच रोप पश्चिम किंवा दक्षिण दिशेला लावू नये. या दिशेला लावल्याने अधिक नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू लागते. त्याऐवजी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा हॉलमध्ये लावावे. दिसायला आकर्षक आणि लाभदायकही ठरते.