Shravan Shanivar 2025: ज्यांची साडेसाती सुरू आहे त्यांनी शनिवारी म्हणा ही शनि चालीसा, होईल लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 07:05 IST2025-08-02T07:00:00+5:302025-08-02T07:05:02+5:30

Shravan Shanivar 2025: २ ऑगस्ट रोजी दूसरा श्रावणी शनिवार आहे, त्यानिमित्त मारूतीचे आणि शनिदेवाचे पूजन करून दिलेले स्तोत्र म्हटल्यास लाभ होतो.

Shravan Shanivar 2025: Those who are in Sade Sati should recite this Shani Chalisa on Saturday, it will be beneficial! | Shravan Shanivar 2025: ज्यांची साडेसाती सुरू आहे त्यांनी शनिवारी म्हणा ही शनि चालीसा, होईल लाभ!

Shravan Shanivar 2025: ज्यांची साडेसाती सुरू आहे त्यांनी शनिवारी म्हणा ही शनि चालीसा, होईल लाभ!

शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनी देवाची विधिवत पूजा केली असता ते प्रसन्न होतात  आणि भक्तांचे सर्व दु:ख, वेदना दूर करतात. याचा अर्थ देवाला स्वतःचे कौतुक करून घेणे प्रिय आहे का? तर नाही! त्यानिमित्ताने पूजेत काही क्षण का होईना आपण आपले मन स्थिर करून देवाच्या पायाशी एकरूप करावे आणि ती प्रसन्नता अनुभवावी हा त्या उपचामागचा हेतू आहे. आपण प्रसन्न असलो की आपली कामे सुनियोजित होतात, आपल्या बरोबर असलेले लोक आपल्यामुळे प्रसन्न होतात आणि सकारात्मकतेचे चक्र पूर्ण होते व त्यातच ईश्वराचे अस्तित्त्व असते. यासाठी हे मंत्रोच्चार, विधी आणि पूजा. ती देवासाठी नसून देवाच्या निमित्ताने स्वतःचे मन प्रसन्न करून ईश्वराशी तादात्म्य पावण्याचा उपचार आहे हे सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे. 

Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांना शनीची महादशा आणि साडेसातीचा त्रास होत असेल त्यांनी शनिवारी शनी देवाची तसेच हनुमंताची पूजा करण्याचा सल्ला दिला आहे. असे मानले जाते की शनिवारी विधिपूर्वक शनि चालीसाचे पठण केल्यास व्यक्तीला साडेसाती तसेच शनी दोषापासून मुक्ती मिळते. चला जाणून घेऊ शनि चालीसा करण्याची योग्य पद्धत.

शनिवारी सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे घालावेत. या दिवशी काळ्या, तपकिरी आणि राखाडी रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. यानंतर संध्याकाळी शनि मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. तसेच शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करावे. यानंतर शनिदेवाच्या मूर्तीजवळ बसून शनि चालिसाचे पठण करावे. ही उपासना मन प्रसन्न करते. चैतन्य देते. अनुभव घेऊन बघा. पुढील स्तोत्राचे पठण करा! श्रावणातल्या शनिवारी(Shravan Shanivar 2025) हे स्तोत्र म्हटल्याने विशेष लाभ होतो!

दोहा :
जय-जय श्री शनिदेव प्रभु, सुनहु विनय महराज।

करहुं कृपा हे रवि तनय, राखहु जन की लाज।।

चौपाई:
जयति-जयति शनिदेव दयाला।
करत सदा भक्तन प्रतिपाला।1।
चारि भुजा तन श्याम विराजै।
माथे रतन मुकुट छवि छाजै।।
परम विशाल मनोहर भाला।
टेढ़ी दृष्टि भृकुटि विकराला।।
कुण्डल श्रवण चमाचम चमकै।
हिये माल मुक्तन मणि दमकै।2।
कर में गदा त्रिशूल कुठारा।
पल विच करैं अरिहिं संहारा।।
पिंगल कृष्णो छाया नन्दन।
यम कोणस्थ रौद्र दुःख भंजन।।
सौरि मन्द शनी दश नामा।
भानु पुत्रा पूजहिं सब कामा।।
जापर प्रभु प्रसन्न हों जाहीं।
रंकहु राउ करें क्षण माहीं।।
पर्वतहूं तृण होई निहारत।
तृणहूं को पर्वत करि डारत।।
राज मिलत बन रामहि दीन्हा।
कैकइहूं की मति हरि लीन्हा।।
बनहूं में मृग कपट दिखाई।
मात जानकी गई चुराई।।
लषणहि शक्ति बिकल करि डारा।
मचि गयो दल में हाहाकारा।।
दियो कीट करि कंचन लंका।
बजि बजरंग वीर की डंका।।
नृप विक्रम पर जब पगु धारा।
चित्रा मयूर निगलि गै हारा।।
हार नौलखा लाग्यो चोरी।
हाथ पैर डरवायो तोरी।।
भारी दशा निकृष्ट दिखाओ।
तेलिहुं घर कोल्हू चलवायौ।।
विनय राग दीपक महं कीन्हो।
तब प्रसन्न प्रभु ह्नै सुख दीन्हों।।
हरिशचन्द्रहुं नृप नारि बिकानी।
आपहुं भरे डोम घर पानी।।
वैसे नल पर दशा सिरानी।
भूंजी मीन कूद गई पानी।।
श्री शकंरहि गहो जब जाई।
पारवती को सती कराई।।
तनि बिलोकत ही करि रीसा।
नभ उड़ि गयो गौरि सुत सीसा।।
पाण्डव पर ह्नै दशा तुम्हारी।
बची द्रोपदी होति उघारी।।
कौरव की भी गति मति मारी।
युद्ध महाभारत करि डारी।।
रवि कहं मुख महं धरि तत्काला।
लेकर कूदि पर्यो पाताला।।
शेष देव लखि विनती लाई।
रवि को मुख ते दियो छुड़ाई।।
वाहन प्रभु के सात सुजाना।
गज दिग्गज गर्दभ मृग स्वाना।।
जम्बुक सिंह आदि नख धारी।
सो फल ज्योतिष कहत पुकारी।।
गज वाहन लक्ष्मी गृह आवैं।
हय ते सुख सम्पत्ति उपजावैं।।
गर्दभहानि करै बहु काजा।
सिंह सिद्धकर राज समाजा।।
जम्बुक बुद्धि नष्ट करि डारै।
मृग दे कष्ट प्राण संहारै।।
जब आवहिं प्रभु स्वान सवारी।
चोरी आदि होय डर भारी।।
तैसहिं चारि चरण यह नामा।
स्वर्ण लोह चांदी अरु ताम्बा।।
लोह चरण पर जब प्रभु आवैं।
धन सम्पत्ति नष्ट करावैं।।
समता ताम्र रजत शुभकारी।
स्वर्ण सर्व सुख मंगल भारी।।
जो यह शनि चरित्रा नित गावै।
कबहुं न दशा निकृष्ट सतावै।।
अद्भुत नाथ दिखावैं लीला।
करैं शत्रुा के नशि बल ढीला।।
जो पंडित सुयोग्य बुलवाई।
विधिवत शनि ग्रह शान्ति कराई।।
पीपल जल शनि-दिवस चढ़ावत।
दीप दान दै बहु सुख पावत।।
कहत राम सुन्दर प्रभु दासा।
शनि सुमिरत सुख होत प्रकाशा।।

दोहा :
प्रतिमा श्री शनिदेव की, लोह धातु बनवाय।
प्रेम सहित पूजन करै, सकल कष्ट कटि जाय।।
चालीसा नित नेम यह, कहहिं सुनहिं धरि ध्यान।
नि ग्रह सुखद ह्नै, पावहिं नर सम्मान।।

Web Title: Shravan Shanivar 2025: Those who are in Sade Sati should recite this Shani Chalisa on Saturday, it will be beneficial!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.