शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 17:26 IST

Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात, यादीवशी कोळीबांधव समुद्राची पूजा करतात, त्यामागचे कारण जाणून घ्या.

यंदा ८ ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमा(Shravan Purnima 2025) आहे जिला आपण नारळी पौर्णिमा(Narali Purnima 2025) म्हणतो आणि दुसर्‍या दिवशी ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन(Raksha Bandhan 2025) यादिवशी आपले कोळीबांधव समुद्राची पूजा करतात आणि त्याला श्रीफळ अर्पण करून ऋणनिर्देश व्यक्त करतात. परंतु ही कृतार्थता कशाबद्दल? ते सविस्तर जाणून घेऊ. 

नदी वहावत जाते परंतु समुद्र आपली मर्यादा कधीच ओलांडत नाही. आणि यदाकदाचित त्याने आपली मर्यादा ओलांडली तर प्रलय, त्सुनामी आलीच म्हणून समजा. खवळलेल्या समुद्राकडे पाहून आपल्याल धडकी भरते, परंतु कोळीबांधव त्याला आपला मायबाप मानून खुशाल स्वत:ला झोकून देत लाटांवर स्वार होतात. कारण तोच त्यांचा पोशिंदा असतो. समुद्री मेवा त्यांना पुरवतो. तोच आपल्यापर्यंत पोहोचतो. अशा सागराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा (Narali Purnima 2025)

आपल्याकडे कोणाचाही आदर सत्कार करायचा असेल तर मानाची वस्तू म्हणून शाल श्रीफळ देण्याचा प्रघात आहे. त्याचप्रमाणे समुद्राचा सत्कार म्हणून त्याला नारळ अर्थात श्रीफळ अर्पण केले  जाते आणि आमचा सांभाळ कर, पोटापाण्याचा प्रश्न सुटू दे अशी प्रार्थना केली जाते. 

या दिवशी पावसाळ्यामुळे उधाण आलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी विधिवत त्याची म्हणजे जलदेवता वरुणाची पूजा करून त्याला नारळ अर्पण केला जातो. प्रामुख्याने समुद्राशी संबंधित व्यवसाय करणारे कोळीबांधव आणि जलपर्यटन हा व्यवसाय करणारी मंडळी हा सण `उत्सव' म्हणून साजरा करतात. कोळीवाडयातील आपल्या निवासस्थानापासून समुद्रापर्यंत सोनेरी कागदाने सुशोभित केलेला नारळ पालखीत घालून सर्व आबालवृद्ध स्त्री पुरुष नाचत गात आनंदाने मिरवणूक काढतात. समुदायानेच आपापला नारळ समुद्रात अर्पण करतात. धंद्याला बरकत यावी आणि पुढचे वर्ष समुद्राने आपले रक्षण करावे म्हणून प्रार्थना करतात. नंतरही बराच वेळ सर्व समुद्रकिनारे आणि कोळीवाडे नाचत बागडत असतात. या दिवशी नारळ घातलेला गोड पदार्थ केला जातो. पावसाळा सुरू झाल्यापासून बंद ठेवलेले व्यवसाय या दिवशी पुन्हा सुरू केले जातात. 

यादिवशी अनेक घरांमध्ये नारळी भात किंवा नारळाच्या वड्यांचा मुख्य बेत केला जातो. कारण याच दिवशी रक्षाबंधन हा सणही साजरा केला जातो. आवडत्या भाऊरायाला औक्षण करून राखी बांधली जाते आणि त्याची किर्ती सागरासारखी अमर्याद पसरू देत अशी देवाकडे प्रार्थना केली जाते. 

सणांचे हे सुंदर रूप पाहिले, की आपल्या संस्कृतीचा आणि पूर्वजांचा हेवा वाटतो. त्यांच्या दूरदृष्टीची कमाल वाटते. नर्मदेला साडी नेसवणे असो नाहीतर समुद्राला नारळ अर्पण करणे असो, निसर्गाला कवेत घेण्याचा, सलगी साधण्याचा, ऋणानुबंध जोडण्याचा प्रयत्न किती सुंदर आहे. निसर्गामुळे आपले अस्तित्त्व टिकून आहे अन्यथा नदी, डोंगर, वृक्ष, फळं, फुलं, आकाश, समुद्र, पर्वतरांगा यांच्याशिवाय आपण अपूर्ण आहोत. याचे भान राहावे, यासाठीच धर्मशास्त्राने या सणांची सांगड चपखलपणे निसर्गाशी घालून दिली आहे. 

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनTraditional Ritualsपारंपारिक विधीPuja Vidhiपूजा विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण