शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

Shakambhari Navratri 2024: शाकंभरी पौर्णिमेला होणार शाकंभरी नवरात्र समाप्ती; न विसरता म्हणा 'ही' पारंपरिक आरती!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 10:11 AM

Shakambhari Purnima 2024: गेले नऊ दिवस आपण शाकंभरी देवीचा उत्सव साजरा केला, २५ जानेवारी रोजी उत्सवाची सांगता करताना असा द्या भावपूर्ण निरोप!

शाकंभरी अर्थात फळ भाज्या देणारी देवी. एकेकाळी दुष्काळजन्य परिस्थिती होती, तेव्हा सर्व सजीवांच्या रक्षणार्थ देवीने आपल्या शरीरातून फळ भाज्यांची निर्मिती केली होती. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा. तिच्या कृपेने आपल्या बळी राजाच्या हाताला यश येते आणि तो मातीतून अन्न धान्य पिकवतो आणि या दोहोंच्या कृपेने आपण दोन वेळचे सुग्रास भोजन करू शकतो. यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाकंभरी नवरात्रीचा उत्सव आपण साजरा करतो. या सोहळ्याचा गुरुवारी अर्थात २५ जानेवारी रोजी अंतिम दिवस. यानिमित्त देवीला निरोप देताना आपण पारंपरिक आरती म्हणूया आणि तिच्या कृपेने कोणाही जीवाची उपासमार होऊ नये अशी मनोभावे प्रार्थना करूया. 

शाकंभरी देवीची मराठीत आरती 

शताक्षी, बनशंकरी, चामुंडा काली दुर्गम, शुंभ निशुंभा स्वर्गी धाडियली येतां भक्ता संकट धावुनी ही आली दु:खे नाशुनि सकला सुखी ठेविली ॥१॥जयदेवी जयदेवी जय शाकंभरी ललिते अज्ञ बालकावरी त्वा कृपा करी माते ॥धृ॥

मधुकैटभ, महिषासुर मातले फार दुर्गारूपाने केलास दानव संहार शक्ती तुझी महिमा आहे अपार म्हणूनि वंदन करिती ब्रह्मादिक थोर ॥२॥

अवर्षणाने जग हे झाले हैराण अन्नपाण्याविना झाले दारूण शरिरातुनि भाज्या केलिस उत्पन्न खा‌ऊ घालुनि प्रजा केलीस पालन ॥३॥

चंडमुंडादिक भैरव उद्धरिले भानू ब्राह्मणासी चक्षु त्वा दिधले नृपपद्माचे त्वा वंश वाढविले अगाध लीला माते करून दाखविले ॥४॥

पाहुनी माते तुजला मन होते शांत मी पण् उरे न काही मानव हृदयात प्रसन्न चित्ते राही तुझ्या क्षेत्रात ब्रह्मानंदी निमग्न होतो तुझा भक्त ॥५॥

वसंत प्रार्थी शंकरी शाकंभरी तुजसी आलो शरण तुला मी आशिष दे मजसी अखंड सेवा घडु दे इच्छा उरी ऐसी अंती सद्गती द्यावे मम या जीवासी ॥६॥

शाकंभरी देवीची पारंपरिक आरती 

हरि ॐ श्री शाकुम्भरी अम्बाजी की आरती कीजोऐसी अद्भुत रूप हृदय धर लीजो शताक्षी दयालु की आरती कीजोतुम परिपूर्ण आदि भवानी मां, सब घट तुम आप बखानी मांशाकुम्भरी अम्बाजी की आरती कीजो तुम्हीं हो शाकुम्भर, तुम ही हो सताक्षी मांशिवमूर्ति माया प्रकाशी मां,शाकुम्भरी अम्बाजी की आरती कीजो नित जो नर-नारी अम्बे आरती गावे मांइच्छा पूर्ण कीजो, शाकुम्भर दर्शन पावे मांशाकुम्भरी अम्बाजी की आरती कीजो जो नर आरती पढ़े पढ़ावे मां, जो नर आरती सुनावे मांबस बैकुंठ शाकुम्भर दर्शन पावेशाकुम्भरी अंबाजी की आरती कीजो। 

टॅग्स :Navratriनवरात्रीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३