शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

Shakambhari Navratri 2024: महिषासुर मर्दिनी स्तोत्र आणि भावार्थ; शाकंभरी नवरात्र उपासना भाग ८

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 7:00 AM

Shakambhari Navratri 2024: शाकंभरी नवरात्रीनिमित्त आपण महिषासुर मर्दिनी स्तोत्राचा भावार्थ जाणून घेत तिची उपासना सुरु केली आहे, तिचा शेवटचा  भाग!

>> रवींद्र गाडगीळ 

स्तुतिमित स्तिमित: सुसमाधीना नियमतोsयमतोsनुदिनं पठेत | परमया रमया स निषेव्यते परिजनोsरिजनोsपि च तं भजेत ||२२||

हे माते, जो कोणी तुझा भक्त हे स्तोत्र नित्यनेमाने शांत चित्ताने, भक्तीने, एकाग्रतेने, यम नियमांचे पालन करून, संयम पाळून, निरपेक्षपणे ध्यानस्थ होऊन वाचेल, मनन करेल, चिंतन करेल, त्याला तू नक्कीच त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्तच, आनंद, सुख, शांति, समाधान करणार्‍या गोष्टी उपलब्ध करून देशील यात शंकाच नाही. शेवटी मानवाची इच्छा ती काय असणार कंचन आणि कांचन. तीच इंद्राप्रमाणे भोग मिळावेत अशी सामान्य माणसांची इच्छा असते. जी तू पुरी करतेस. परंतु असामान्य माणसे मात्र तुझी कृपा त्यांना तुझ्या चरणसेवेची इच्छा असते ती मात्र तू दे, हीच प्रार्थना. ज्यामुळे परके व आपले सगळेच त्याच्यावर नितांत प्रेम करायला लागतील. 

रामायती किलकर्षस्तेषु चित्त नराणाम वरज ईव यासमाद्रामकृष्ण: कविनाम | अकृत सुकृतिगम्य रम्य पद्यैक हर्म्यम, स्तवनमवनहेतुं प्रीतये विश्वमातू: ||२३||

बालकाचे बोबडे बोल हे सर्वांनाच गोड व ऐकावेसे वाटतात. म्हणून मी हे महिषासुरमार्दिनी, विश्वमाता पार्वती, तुला प्रसन्न करण्यासाठी हे काव्य रचले आहे, हे तू गोड मानून घेशील व तुझ्या भक्तांना ही  गाविशी वाटेल अशी मी आशा करतो आणि त्यासाठी तुझा आम्हा सर्वांना आशीर्वाद अपेक्षितो. 

इंदूरभ्यो मुहूर्विंदूरम्यो यत: सोsनवद्य: स्मृत:, श्रीपते: सूनुनाकारितो योsधुना विश्वमातू: पदे पद्यपुष्पांजली: ||२४||

आवडलीना ही जगदंबास्तुति? जिच्यात इंदु (शिव) पासून बिन्दु (शिवा) पर्यन्त सर्वांची दखल घेतली आहे. सर्व देवदेवतांची, सज्जनांची स्तुति करण्यात आल्यामुळे ती दोषमुक्त व निर्दोष झाली आहे. हे पद्य तुझ्या चरणावर अर्पण आहे, तू त्याचा स्वीकार कर. म्हणून हे महिषासुरमर्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

अशा रीतीने आई जगदंबे शाकाहारी माते, या शाकंभारी नवरात्रोत्सव निमित्त तुझे हे पद्यगान आम्ही करू शकलो,तुझी कृपा आमचे सर्वांवर कायम राहो. नावाप्रमाणे आम्हीही तुझी सेवा यच्चयावत जीवांना अभय देऊन शाकाहारी राहण्याचा प्रयत्न करू. जीवांना मारून त्यांचा तळतळाट घेऊन आम्ही आमच्या जिभेचे चोचले पुरवणार नाही आणि अनासाये होणारे प्रदूषण वाचवू, कोणालाही दूषण न देता, सर्वांना विश्वास वाटेल असेच आमचे आचरण राहील. नुकताच अति मासाहारांमुळे घडलेला जगभरावर आलेले नैसर्गिक संकटातून आम्ही बाहेर आलेलो आहोत. त्यामुळे हयातून धडा घेऊन जे पचेल, रुचेल, जचेल तेच आम्ही करू. आमचे पोशिंदे तुझ्याच प्रमाणे असलेले शेतकरी, प्राणी, पक्षी, कीटक, सैनिक, रक्षक, पोलिस, सफाई कामगार, डॉक्टर, नर्स, वॉर्डबोय, शिक्षक, आईवडील, समाज, या सर्वांचा मान राखून आमची वर्तणूक ठेवू व राष्ट्राचा, कुटुंबाचा, समाजाचा, धर्माचा विकास साधू, फक्त तुझी कृपा हवी. 

या देवी सर्वभुतेषु शाक रूपेण संस्थिता, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम: ।।

टॅग्स :Navratriनवरात्री