शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

आगामी काळात शनी स्थित्यंतराचा ५ राशींवर पडणार प्रभाव; त्या राशी कोणत्या ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 12:36 IST

शनीचे नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी, संबंधित राशीच्या लोकांनी उपाय करत राहिले पाहिजे. जेणेकरून शनी पीडा सौम्य प्रमाणात जाणवेल!

ज्योतिषशास्त्रात शनी हा अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनीचा मनुष्य जीवनावर मोठा प्रभाव पडतो. हा ग्रह प्रत्येक राशीमध्ये अडीच वर्षे राहिल्याने त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. शनीची अडीच वर्षे आणि साडे साती संबंधित राशीच्या लोकांवर दीड वर्षासाठी प्रभाव दाखवतो. यावेळी, संबंधित राशींना शनीचा प्रभाव सहन करावा लागतो, म्हणूनच लोकांना हे जाणून घेण्याची उत्सुकता असते की शनीची साडेसाती कोणत्या राशीवर कधी होणार आहे आणि तो प्रभाव कधी संपेल. हे चक्र अविरत सुरू असते. काही काळानंतर, शनी पुन्हा राशी बदलतो आणि नवीन राशीला साडे साती सुरू होते. 

सद्यस्थितीत शनीचा प्रभाव पुढील राशींवर राहणार आहे :

जेव्हाही शनी राशी बदलतो, त्याचा थेट परिणाम एकाच वेळी ५ राशींवर होतो. सध्या शनी मकर राशीत आहे आणि एप्रिल २०२२ मध्ये तो कुंभ राशीत प्रवेश करेल. दरम्यान, मकरसाठी काही काळ क्लेषदायक असेल. शनी कुंभ राशीत प्रवेश करताच मीन राशीवर शनीची साडेसाती सुरू होईल. दुसरीकडे, राशी बदलताच, धनु राशीवर साडेसाती संपेल. तथापि, शनीच्या साडेसातीचा दुसरा, तिसरा टप्पा अनुक्रमे मकर आणि कुंभ राशीवर चालेल. याशिवाय कर्क आणि वृश्चिक राशीवर शनीचा प्रभाव दिसेल. 

मीन राशीचा स्वामी बृहस्पति असल्याने आणि तो शनीचा मित्र ग्रह असल्याने मीन राशीच्या जातकांना इतर राशींच्या तुलनेत साडेसातीचा फार वाईट परिणाम सहन करावा लागणार नाही.  तरीसुद्धा, शनीचे नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी, संबंधित लोकांनी उपाय करत राहिले पाहिजे. साडे साती दरम्यान, संबंधित राशीच्या व्यक्तीनी दर शनिवारी शनिदेवाच्या मूर्तीवर राईचे तेल अर्पण करावे आणि शनिशी संबंधित वस्तूंचे दान करावे. पिंपळाची पूजा करावी आणि हातून जेवढे सत्कार्य शक्य होईल ते करत राहावे, जेणेकरून शनी पीडा सौम्य प्रमाणात जाणवेल!

टॅग्स :Astrologyफलज्योतिष