सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 14:29 IST2025-09-19T14:28:12+5:302025-09-19T14:29:22+5:30
Solar Eclipse 2025: ज्यांना पितरांची तिथी माहीत नसते, ते सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करतात, मात्र त्यादिवशी ग्रहण असल्याने श्राद्धविधीबाबत शंका दूर करा.

सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण(Solar Eclipse 2025) जवळ येत आहे. हे सूर्यग्रहण सर्वपित्री अमावस्येला(Sarva Pitru Amavasya 2025) होणार आहे, ज्यामुळे सूर्यग्रहणाशी संबंधित विधींबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात. भारतातून हे ग्रहण दिसणार नसले, तरी ग्रहणाचा काळ, त्यादिवशी पितृपक्षाचा शेवट, त्यामुळे श्राद्धविधी आणि ग्रहणाशी संबंधित इतर गोष्टी याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
Surya Grahan 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
२०२५ चे शेवटचे सूर्यग्रहण कधी आहे?
२१ सप्टेंबरच्या रात्री वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होईल. या दिवशी सर्वपित्री अमावस्येला देखील आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, हे ग्रहण रात्री १०:५९ ते पहाटे ३:२३ पर्यंत राहील. ते भारतात दिसणार नाही. मात्र ग्रहण काळ आणि ग्रहण प्रभाव पाळण्याची आपल्याकडे परंपरा आहे. त्यानुसार ग्रहण कन्या राशीत होईल. ग्रहणाचा काळ १२ तास आधी सुरू होतो. भारतीय वेळेनुसार सकाळी १०:५९ वाजता ग्रहण काळ सुरू होईल. शिवाय, हे आंशिक सूर्यग्रहण असेल, जे सूर्याच्या अगदी थोड्या भागाला व्यापेल. त्याची वेळ आणि श्राद्धविधी नियम जाणून घेऊ.
सूर्यग्रहण २०२५ वेळ
ग्रहण रात्री १०:५९ वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होईल
ग्रहण रात्री १:५९ वाजता (भारतीय वेळेनुसार) संपेल
ग्रहण पहाटे ३:२३ वाजता (भारतीय वेळेनुसार) संपेल.
सूर्यग्रहणाच्या वेळी आपण पूर्वजांना तर्पण करू शकतो का?
२१ तारखेला होणारे सूर्यग्रहण सर्वपित्री अमावस्येला आहे. अनेकांना प्रश्न पडतो, की या दिवशी पूर्वजांना तर्पण करावे की नाही आणि श्राद्ध विधी करता येतील का? ज्योतिषी सांगतात, की सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे त्याचा परिणाम येथे जाणवणार नाही, म्हणून तुम्ही श्राद्ध आणि तर्पण इत्यादी विधी सामान्यपणे करू शकता. फक्त देवघरावर वस्त्र टाकावे आणि अन्न-पाण्यावर तुळशी पत्र ठेवावे.