शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Sarva Pitru Amavasya 2024: सूर्यग्रहणामुळे सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करता येणार की नाही? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 14:45 IST

Sarva Pitru Amavasya 2024: यंदा २ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे आणि त्याच दिवशी सूर्य ग्रहण आहे, तर ग्रहण कालावधीत श्राद्धविधी करावे की नाही ते पहा. 

पितृ पक्षाची समाप्ती सर्वपित्री अमावस्येला होते. ज्यांची श्राद्धतिथी आपल्याला माहीत नसते अशा सर्वांचे श्राद्धविधी सर्वपित्री अमावस्येला केले जातात. यंदा २ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या (Sarva Pitru Amavasya 2024) आहे. त्याच दिवशी भाद्रपद मासाची समाप्ती आणि सूर्यग्रहण (Solar Eclipse 2024) देखील आहे. यंदा पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने आणि शेवट सूर्यग्रहणाने होणार असल्याने अनेक विधी करण्याबाबत लोकांच्या मनात विविध शंका कुशंका उपस्थित झाल्या होत्या. पितृपक्ष संपत आले, पण आता सर्वपित्रीला श्राद्धविधी करायचे की नाही हा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे, त्याचे उत्तर जाणून घेऊ. 

ग्रहण काळ शुभ कार्यासाठी निषिद्ध मानला जातो शिवाय पितृ पक्षातही शुभ कार्य केली जात नाहीत. तर हा काळ केवळ श्राद्ध विधीसाठी आणि पितरांच्या स्मरणासाठी राखीव ठेवलेला असतो. यंदा सर्वपित्री अमावस्येला सूर्य ग्रहण असणार आहे. भले ते भारतातून दिसणार नसले, तरी ग्रहण काळ देवकार्यासाठी निषिद्ध मानला जातो. त्यामुळे या काळात श्राद्धविधी करावे की नाही, याबाबतीत ज्योतिष तज्ज्ञांचे मत जाणून घेऊ. 

सर्व पितृ अमावस्या कधी असते?

हिंदू कॅलेंडरनुसार, अमावस्या तिथी १ ऑक्टोबर रोजी रात्री ९.४० मिनिटांनी सुरू होईल.सर्वपित्री अमावस्या तिथी २ ऑक्टोबर रोजी रात्री १२. १९ मिनिटांनी समाप्त होईल. म्हणजेच ही तिथी २ तारखेचा सूर्योदय पाहणार आहे म्हणून २ तारखेला सर्वपित्री अमावस्या धरली जाईल. तर, सूर्यग्रहण १ ऑक्टोबर रोजी रात्री ९.४० वाजता सुरू होईल आणि २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ३ वाजून १७ मिनिटांनी समाप्त होईल. 

सूर्यग्रहणामुळे सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध करावे की नाही?

सर्वपित्री अमावस्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हा ग्रहण काळ असल्याने शुभ कार्य वर्ज्य असेल परंतु श्राद्ध विधी करण्यास काहीच हरकत नाही असे शास्त्र सांगते. त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील त्यांनी सर्वपित्रीला श्राद्धविधी करावे. 

सर्वपित्री अमावस्येचे महत्व

पितृपक्षाचा शेवट सर्वपित्रीने होतो. या दिवशी सर्व पितरांच्या नावाने श्राद्ध विधी करता येतो. या दिवशी ज्यांच्या श्राद्धाची तारीख माहित नाही अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावावरही श्राद्ध केले जाते. म्हणूनच त्याला सर्व पित्री असे म्हटले आहे. सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पितरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३Astrologyफलज्योतिषsolar eclipseसूर्यग्रहण