Gajanan Maharaj Prakat Din 2026: रविवार, ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी गजानन महाराज प्रकट दिन आहे. विदर्भाची पंढरी आणि शेगावीचा राणा, शेगावीचे संत म्हणून ज्यांची ओळख आहे, असे गजानन महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. माघ शुद्ध सप्तमीला शेगाव येथे संत श्री गजानन महाराज प्रकट झाले. गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने लाखो भाविक शेगावला जाऊन दर्शन घेतात. महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशातील असंख्य भक्तगणांचे गजानन महाराज श्रद्धास्थान आहेत.
आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे अनेकदा मनापासून इच्छा असूनही आराध्य देवतेची सेवा करणे शक्य होत नाही. आपण आपल्या आराध्याची, देवतांची संतांची पूजा करतो, ती देवासाठी नाही, तर आपल्या मन: शांतीसाठी. अशा वेळेस मनाला रुखरुख लागू न देता, शास्त्राने दिलेला मानसपूजेचा पर्याय निवडावा, असे सांगितले जाते. प्रकट दिनाच्या निमित्ताने शेगाव येथे जाणे शक्य नसेल, तर घरीच गजानन महाराजांची मानस पूजा करावी.
मानस पूजा म्हणजे काय?
मानस पूजा म्हणजे मनातल्या मनात केलेली पूजा. अशा मानस पूजेसाठी मूर्ती, प्रतिमा, चित्र पाहिजे असे नाही. आपल्या इष्ट देवताचे स्वरुप आपल्या मन:पटलावर आणून त्याची मानसिक अर्चना करणे, म्हणजे मानसपूजा. अशी पूजा करणे सोपे नाही. त्यात नुसती शब्दांचे उच्चारण करायची नसते, तर मनाची पूर्ण एकाग्रता साधून पूजा करावी, असे सांगितले जाते. आपण जेव्हा मूर्तीची पूजा करतो, तेव्हा षोडोपचारे पूजा करतो, म्हणजे आसन, अर्ध्य, पुष्प, गंध, धूप, दिप असे सोळा उपचार पूजा करताना वापरतो. मानसपूजेत खऱ्या वस्तू न वापरता प्रतीके वापरली जातात.
मनोभावे गजानन महाराजांची आळवणी करावी
मानसपूजा करताना देवपूजा करतो, तसा विधी करावा. मनाचा गाभारा स्वच्छ करून घ्यावा. आपल्या हृदयमंदिरात देवाचे आवाहन करावे. भक्ती भावाची फुले अर्पण करावी. श्रद्धेचा धूप दीप लावून मनापासून प्रार्थना करावी. एवढी सोपी आहे मानसपूजा. शेगावच्या गजानन महाराजांच्या प्रगट दिनी भाविक दर्शनाला शेगाव संस्थानी आवर्जून जातात. ज्यांना प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेणे जमले ते भाग्यवान; पण ज्यांना शक्य नाही, त्यांनी मनोभावे गजानन महाराजांची आळवणी करावी.
असा माझा गुरु गजानन, आहे भावाचा भुकेला
गुरु गजानन सांगे, नाही सक्तीची मूर्तिपूजा,भाव मनी ठेवून, करा मानसपूजा ।।
गुरु गजानन सांगे, नाही गेलात मंदिरी,तरी हात जोडा मनोमनी, भक्ती असू द्या अंतरी।।
गुरु गजानन सांगे, नको पूजन अर्चन,करा माझे स्मरण, करण्या मला आवाहन ।।
गुरु गजानन सांगे, नको पेटवू तो दीप,सोडा अहंपणा येथ, जाळा मी पणाचा धूप ।।
गुरु गजानन सांगे, नको ती तेलवात,मोह वासनेची वात, टाळा ओवाळून प्रपंचात ।।
गुरु गजानन सांगे, नसू दे दुर्वा हिरव्या,नामजपाच्या जुड्या, तुम्ही मला वहाव्या।।
गुरु गजानन सांगे, नको मोदक एकवीस,करा त्यास अन्नाने तृप्त, जो भुकेने असेल कासावीस।।
गुरु गजानन सांगे, नको पिठले भाकरी,धावा त्यांच्यासाठी, ज्यांना मदत आहे जरुरी।।
असा माझा गुरु गजानन, आहे भावाचा भुकेला,नाही कशाचीच अपेक्षा, काव्यपुष्पांनी पुजला।।
॥ श्री गजानन जय गजानन ॥
॥ गण गण गणात बोते ॥
Web Summary : Celebrate Gajanan Maharaj Prakat Din 2026 on February 8th. If unable to visit Shegaon, perform Manas Pooja—a mental offering with devotion. It involves invoking the deity in your heart and offering symbolic prayers, prioritizing inner faith and selfless service over rituals. Remember, devotion matters most.
Web Summary : 8 फरवरी, 2026 को गजानन महाराज प्रकट दिन मनाएं। यदि शेगांव जाने में असमर्थ हैं, तो मानस पूजा करें - भक्ति के साथ एक मानसिक भेंट। इसमें अपने हृदय में देवता का आह्वान करना और प्रतीकात्मक प्रार्थना करना शामिल है, जो अनुष्ठानों पर आंतरिक विश्वास और निस्वार्थ सेवा को प्राथमिकता देता है। याद रखें, भक्ति सबसे महत्वपूर्ण है।