Sade Sati 2025: कोणत्या राशीची साडेसाती सुरु होणार आणि कोणाची कधी संपणार; घ्या थोडक्यात आढावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 07:05 IST2025-02-15T07:00:00+5:302025-02-15T07:05:02+5:30

Sade Sati 2025: साडेसातीचा बागुलबुवा करण्याची गरज नाही, पण ती आपल्या राशीला कधी येणार हे लक्षात घेऊन सावध राहणे केव्हाही चांगले!

Sade Sati 2025: For which zodiac sign will Sade Sati begin and when will it end; Take a brief overview! | Sade Sati 2025: कोणत्या राशीची साडेसाती सुरु होणार आणि कोणाची कधी संपणार; घ्या थोडक्यात आढावा!

Sade Sati 2025: कोणत्या राशीची साडेसाती सुरु होणार आणि कोणाची कधी संपणार; घ्या थोडक्यात आढावा!

सतत अडचणी येऊ लागल्या ,की नकळत आपल्या तोंडातून  निघते की काय साडेसाती लागलीय .... कधी संपणार कोणास ठाऊक?  कोणाच्या कुंडलीत खरोखरच साडेसाती सुरु असेल किंवा येणार असेल तर तो माणूस खूपच भेदरलेला असतो की काय होणार काय माहित ...आजचा लेख लिहिण्याचे मूळ उद्दिष्ट हेच आहे की साडेसाती म्हणजे काय आणि तिला घाबरांयचे खरोखर कारण आहे का?

आकाशामध्ये जे १२ प्रकारचे तारकासमूह आहेत त्यांना राशी म्हणतात. 
१) मेष ,२) वृषभ,३) मिथुन ,४) कर्क ,५) सिंह , ६) कन्या ,७) तूळ , ८) वृश्चिक ,९) धनु ,१०) मकर ,११) कुंभ,१२) मीन   

त्यामध्ये जेव्हा शनी या १२ राशी पैकी एखाद्या विशिष्ट राशीतून भ्रमण करतो तेव्हा, त्या राशीच्या आधीच्या राशीला, त्या विशिष्ट राशीला आणि नंतरच्या राशीला  साडेसाती आहे असे म्हणले जाते .म्हणजेच उदाहरणार्थ शनी सध्या मकर राशीत आहे म्हणुन मकर राशीला ,तिच्या मागच्या धनु राशीला आणि  पुढच्या कुंभ राशीला साडेसाती आहे.

आता या साडेसातीला घाबरण्याचे कारण म्हणजे शनी जेव्हा आपल्या राशीत ,किंवा आपल्या राशीच्या जवळच्या राशीत येतो तेव्हा आपल्याला बऱ्याच अडचणी उत्पन्न  होतात .याचे कारण समजून घ्यायचे म्हणले तर आपल्याला शनी ग्रहाचे गुणधर्म लक्षात घेतले पाहिजेत .हा ग्रह अतिशय संथ ,सावकाश आहे . एकलकोंडा ,सत्य प्रिय आणि प्रत्येक व्यक्तीला, त्या व्यक्तीची स्वतःची जागा दाखवून देणारा ग्रह आहे .म्हणूनच ज्या व्यक्तीचे पाय जमिनीवरच आहेत तिला या साडेसातीचा विशेष त्रास होत नाही .पण स्वतःच्याच धुंदीत असणाऱ्या ,काम क्रोध ,लोभ ,मोहात अडकलेल्या व्यक्तीला या साडेसातीचा अतिशय त्रास होतो.  चला तर जाणून घेऊ, आगामी काळात कोणत्या राशीची साडेसाती सुरु होणार आणि कोणत्या राशीची साडेसाती संपणार. 

मेषः- दिनांक २९ मार्च २०२५ रोजी सुरु होईल व दिनांक ३१ मे २०३२ रोजी संपेल.

वृषभः-  ३ जुन २०२७ रोजी सुरु होईल व दिनांक १३ जुलै २०३४ रोजी संपेल.

मिथुन:- ८ ऑगष्ट २०२९ रोजी सुरु होईल व दिनांक २७ ऑगष्ट २०३६ संपेल.

कर्क:- ३१ मे २०३२ रोजी सुरु होईल व दिनांक १३ जुलै २०३९ संपेल.

सिंहः- १३ जुलै २०३४ रोजी सुरु होईल व दिनांक २६ सप्टेबर २०४१ संपेल.

कन्याः- २७ ऑगष्ट २०३६ रोजी सुरु होईल व दिनांक ३० ऑगष्ट २०४४ संपेल.

तुला:- १० सप्टेंबर २००९ रोजी सुरु झालेली असुन दिनांक २६ ऑक्टोबर २०१७ रोजी संपेल

वृश्चीकः- ५ नोव्हेंबर २०११ रोजी सुरु सुरु झालेली असुन दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी संपेल.

धनु:- २ नोव्हेंबर २०१४ रोजी सुरु सुरु झालेली असुन दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी संपेल.

मकर:- २६ जानेवारी २०१७ रोजी सुरु सुरु झालेली असुन दिनांक २९ मार्च २०२५ रोजी संपेल.

कुंभ:- २४ जानेवारी २०२० रोजी सुरु होईल व दिनांक २३ फेब्रुवारी २०२८ संपेल.

मीनः- २९ एप्रिल २०२२ रोजी सुरु होईल व दिनांक १७ एप्रिल २०३० संपेल.

Web Title: Sade Sati 2025: For which zodiac sign will Sade Sati begin and when will it end; Take a brief overview!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.