Ritual: सावधान! तुम्हीही मंदिरात मूर्तीच्या मागच्या बाजूला डोकं टेकवता का? आधी 'हे' वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:32 IST2026-01-09T13:31:10+5:302026-01-09T13:32:30+5:30
Ritual: आपण मंदिरात जातो, मात्र प्रदक्षिणा घालताना आपण एक अशी चूक करतो, ज्याच्या ऊर्जेचा आपल्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो

Ritual: सावधान! तुम्हीही मंदिरात मूर्तीच्या मागच्या बाजूला डोकं टेकवता का? आधी 'हे' वाचा
मंदिरात गेल्यावर आपण मनोभावे दर्शन घेतो आणि प्रदक्षिणा घालतो. मात्र, अनेकदा आपण केवळ 'सगळे करतात' म्हणून काही कृती करत असतो. मंदिरातील प्रदक्षिणेबाबत आणि देवाच्या पाठीमागून नमस्कार करण्याबाबत कथाकार शिवराम साधक यांनी एक अत्यंत महत्त्वाचा शास्त्रोक्त इशारा दिला आहे.
१० जानेवारी: गुरु-आदित्य योग: तुमच्या आयुष्यातील अडचणी निवारणासाठी उत्तम योग; करा 'हा' उपाय
मंदिरात गेल्यावर आपण मूर्तीच्या पुढून दर्शन घेतो आणि त्यानंतर प्रदक्षिणा घालतो. प्रदक्षिणा घालताना अनेक भाविक मूर्तीच्या बरोबर पाठीमागे (गाभाऱ्याच्या मागच्या भिंतीला) हात टेकवून नमस्कार करतात. मात्र, कथाकार शिवराम साधक यांच्या मते, ही कृती शास्त्राला धरून नाही. यामागे एक गंभीर आध्यात्मिक कारण आणि 'धुंधकारी'चा संदर्भ आहे.
देवाच्या पाठीमागे नमस्कार का टाळावा?
अध्यात्मिक शास्त्रानुसार, मंदिरातील मूर्तीमध्ये 'चैतन्य' असते, जे मूर्तीच्या दर्शनी भागातून प्रवाहित होत असते. मूर्तीच्या पाठीमागचा भाग हा तुलनेने 'तम' प्रधान मानला जातो. शिवराम साधक सांगतात की, अनेकदा अतृप्त आत्मे किंवा प्रेतयोनीतील जीव (जसे धुंधकारी नावाचा राक्षस) भगवंताच्या आश्रयासाठी मूर्तीच्या पाठीमागच्या भागात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतात.
जेव्हा आपण देवाच्या पाठीमागे हात टेकवून नमस्कार करतो, तेव्हा तिथल्या नकारात्मक लहरी किंवा त्या योनीतील जीवांचा स्पर्श आपल्या ऊर्जेला होऊ शकतो. त्यामुळेच देवाचे दर्शन नेहमी 'पुढूनच' घेण्याचा नियम आहे.
Chanakya Niti: लोकांमध्ये तुमची किंमत शून्य आहे? चाणक्य नीतीचे 'हे' ५ नियम वापरा, जग तुमचा आदर करेल!
हे सविस्तर कळण्यासाठी कोण होता हा धुंधकारी? ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे!
धुंधकारीची कथा 'श्रीमद्भागवत महात्म्य' मध्ये येते. धुंधकारी हा अत्यंत पापी आणि दुराचारी माणूस होता. त्याच्या पापांमुळे मृत्यूनंतर त्याला कुठेही थारा मिळाला नाही आणि तो भयंकर 'प्रेतयोनी'त (पिशाच्च) अडकला.
धुंधकारीला मुक्ती मिळत नव्हती. जेव्हा त्याचा भाऊ 'गोकर्ण' याने श्रीमद्भागवत कथेचे आयोजन केले, तेव्हा धुंधकारी प्रेत स्वरूपात तिथे आला. त्याला बसण्यासाठी जागा नव्हती, म्हणून तो तिथे असलेल्या एका सात गाठींच्या बांबूमध्ये शिरून बसला. सात दिवस कथा ऐकल्यावर त्याच्या पापांचा नाश झाला आणि तो दिव्य रूपात मुक्त झाला.
आशय: धुंधकारी सारखे जीव मुक्तीच्या आशेने किंवा ईश्वराच्या ऊर्जेच्या छायेत राहण्यासाठी मंदिराच्या अशा कोपऱ्यात किंवा पाठीमागच्या भागात दडलेले असू शकतात, जिथे भक्तांची नजर जात नाही. त्यामुळे तिथे डोकं टेकवणे शास्त्राला धरून नाही.
Makar Sankranti 2026: यंदा 'संक्रांत' कोणावर? जाणून घ्या तिचे वाहन, वस्त्र, शस्त्र आणि राशीभविष्य!
'सगळे करतात' म्हणून कृती करणे योग्य का?
आपल्याकडे प्रदक्षिणा घालताना मागच्या भिंतीला कपाळ टेकवण्याची किंवा नमस्कार करण्याची एक पद्धत रूढ झाली आहे. पण शिवराम साधक म्हणतात, "सगळे करतात म्हणून आपणही आंधळेपणाने तीच कृती करणे चुकीचे आहे. त्यामागचा शास्त्रीय आशय समजून घेतला पाहिजे."
दर्शनाचे योग्य नियम:
१. देवाचे दर्शन नेहमी मूर्तीच्या समोर उभे राहून (किंवा थोड्या बाजूला सरकून) घ्यावे.
२. प्रदक्षिणा घालताना देवाचे स्मरण करावे, पण मागच्या भागाला स्पर्श करून नमस्कार करणे टाळावे.
३. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा समोरून नतमस्तक व्हावे. पाहा व्हिडीओ -