शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Ganesh Mahotsav: उत्खननात प्रकट झाली उजव्या सोंडेची गणेश मूर्ती, अमरावतीतील वायगावात वाड्याचे झाले मंदिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 09:09 IST

Ganesh Mahotsav: महाराष्ट्रात उजव्या सोंडेच्या गणेश मूर्ती दोनच. त्यापैकी मुंबईतील सिद्धिविनायक ही स्थापन केलेली, तर वायगावची सिद्धिविनायक गणेश मूर्ती ही वाड्याची पायाभरणी करताना उत्खननात सापडलेली. इंगोले यांच्या याच वाड्यात मूर्ती स्थापित करून त्याचे मंदिर करण्यात आले.

- मनीष तसरे अमरावती : महाराष्ट्रात उजव्या सोंडेच्या गणेश मूर्ती दोनच. त्यापैकी मुंबईतील सिद्धिविनायक ही स्थापन केलेली, तर वायगावची सिद्धिविनायक गणेश मूर्ती ही वाड्याची पायाभरणी करताना उत्खननात सापडलेली. इंगोले यांच्या याच वाड्यात मूर्ती स्थापित करून त्याचे मंदिर करण्यात आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने येथे भाविकांची गर्दी होत आहे. अज्ञातवासात असलेल्या पांडवांनी येथे भेट दिल्याची आख्यायिका आहे. अमरावती-परतवाडा मार्गापासून वलगावनंतर एक मैल अंतरावर वायगाव हे इंगोलेंचे गाव. १८६५च्या सुमारास परंपरागत वतनदार इंगोले यांच्या वाड्याच्या बांधकामासाठी पाया खोदत असताना सुबक गणेशमूर्ती आढळून आली. उजव्या सोंडेचा हा गणपती पंचक्रोशीत नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्धीस आला. २०१२ मध्ये आळंदीचे रामचंद्रबाबा बोदे यांच्या हस्ते कळस स्थापना झाली.  

पारंपरिक दिंडीने विसर्जन  साडेतीन हजार लोकसंख्येच्या या गावात गणेश विसर्जनाची मिरवणूक पौर्णिमेला पारंपरिक वारकरी दिंडीने काढली जाते. पालखी, घोडे यांच्या समावेशाने दिंडी देखणी होते. यानिमित्त नागरिक, विशेषत: सासुरवाशीण मुली आवर्जून हजर राहतात, असे संस्थानचे अध्यक्ष विलासराव इंगोले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.  

४० किलो चांदीचे छत उजव्या सोंडेच्या आसनस्थ सिद्धिविनायकाच्या मूर्तीवर ४० किलोचे चांदीचे छत आहे. मूर्ती एकदंत, पायावर पद्म, शंख चिन्हांकित आहे. आजूबाजूला रिद्धी-सिद्धी आहेत.सूर्यकिरणे थेट मूर्तीवर सूर्यप्रकाशाचा पहिला कवडसा सिद्धिविनायकाच्या मूर्तीवर पडावा, अशी वाड्याची बांधणी करण्यात आली होती. मंदिराचा जीर्णोद्धार करताना ही बाब लक्षात ठेवून बांधकाम झाले आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीGanesh Mahotsavगणेशोत्सव