Ram Navami 2026 Puja: रामनवमीला घरी पूजा कशी करावी? जन्मवेळ, पाळणा आणि राममंत्रांची संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 11:53 IST2026-03-25T11:52:38+5:302026-03-25T11:53:37+5:30

Ram Navami 2026 Puja Vidhi: २६ मार्च रोजी श्रीराम नवमी आहे, त्यादिवशी मंदिरात जाऊन दर्शन घेणे इष्ट, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी घरी पूजा कशी करावी ते जाणून घ्या. 

Ram Navami 2026: How to perform Ram Navami puja at home? Complete information about birth time, cradle and Ram mantras | Ram Navami 2026 Puja: रामनवमीला घरी पूजा कशी करावी? जन्मवेळ, पाळणा आणि राममंत्रांची संपूर्ण माहिती

Ram Navami 2026 Puja: रामनवमीला घरी पूजा कशी करावी? जन्मवेळ, पाळणा आणि राममंत्रांची संपूर्ण माहिती

प्रभू श्रीराम हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आणि 'मर्यादा पुरुषोत्तम' मानले जातात. गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी संपूर्ण देशात 'श्रीराम नवमी(Ram Navami 2026) मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. चैत्र शुद्ध नवमीला दुपारी १२ वाजता जेव्हा सूर्य डोक्यावर येतो, तेव्हा प्रभू रामांचा जन्म झाला, असे मानले जाते. या मंगल दिनानिमित्त पूजेचा विधी, शुभ मुहूर्त आणि मंत्रांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 

Ram Navami 2026: रामनवमीला मनगटावर बांधा ११ गाठींचा 'हा' धागा; तुमचे आणि कुटुंबाचे होईल संरक्षण!

राम नवमी हा दिवस केवळ उपवास करण्याचा नसून, श्रीरामांच्या आदर्शांना आठवण्याचा आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याचा दिवस आहे.

१. राम जन्मोत्सव शुभ मुहूर्त (Ram Navami 2026 Shubh Muhurat)

दिनांक: २६ मार्च २०२६, गुरुवार.

राम जन्म मुहूर्त: प्रभू श्रीरामांचा जन्म माध्यान्ह काळी (दुपारी) झाला होता.

पूजेची मुख्य वेळ: दुपारी ११:०५ ते दुपारी १:३५ पर्यंत.

जन्म वेळ: दुपारी १२:०० ते १२:४० च्या दरम्यान राममंदिरांमध्ये पाळणा हलवला जातो आणि जन्मोत्सव साजरा होतो.

२. पूजा विधी (Puja Vidhi)

घरी राम नवमीची पूजा कशी करावी?

स्वच्छता: सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि घराची तसेच देव्हाऱ्याची स्वच्छता करावी.

स्थापना: पाटावर किंवा चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि भक्त हनुमानाची मूर्ती किंवा तसबीर ठेवावी.

अभिषेक: शक्य असल्यास श्रीरामांच्या मूर्तीवर पंचामृताने आणि शुद्ध जलाने अभिषेक करावा.

पूजा साहित्य: श्रीरामांना पिवळी फुले, तुळशीची पाने, चंदनाचा टिळा आणि अक्षता अर्पण कराव्यात.

नैवेद्य: रामाला 'सुंठवडा' (गूळ आणि सुंठ यांचे मिश्रण) अत्यंत प्रिय आहे. तसेच खीर किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.

पठण: या दिवशी रामरक्षा स्तोत्र, रामाष्टक किंवा रामायणाचे वाचन करणे अत्यंत फलदायी ठरते.

कोणत्या देवाकडे काय मागावे? विष्णूंनी स्वतः सांगितलेले 'ते' रहस्य; जे तुमचे आयुष्य बदलू शकते!

३. राम जन्माचा पाळणा (Shree Ram Janma Palna in Marathi)

दुपारी १२ वाजता श्रीरामांच्या बालमूर्तीला पाळण्यात ठेवून फुलांनी सजवले जाते. यावेळी महिला एकत्र येऊन पारंपरिक पाळणा गातात:

जो जो जो जो रे, कुलभूषणा, दशरथनंदना, बाळा जो जो रे!

रत्न जडित पालख, किती बहू अमोलिक 
वरती पहुडले कुलदीपक 
त्रिभुवन नायक 
बाळा जो जो रे! 

जन्मा आलासी सुपवित्र, 
म्हणविसी अमुचा पुत्र, 
बाळा जो जो रे! 

रावण खल मोठा,
अति खोटा, सन्मार्गी जणू काटा, 
अंगी बहू ताठा, 
त्या दुष्टा, लवकर करी उफराटा, 
बाळा जो जो रे!

यावेळी 'श्रीराम जय राम जय जय राम' असा जयघोष केला जातो आणि सुंठवडा प्रसादाचे वाटप केले जाते.

Numeroloy: अंकशास्त्र सांगतंय तुमच्या जन्मतारखेचं गुपित; तुमचं मॅजिकल गिफ्ट तुम्हाला माहित आहे का?

४. प्रभावशाली राम मंत्र (Powerful Mantras)

रामनवमीच्या दिवशी खालील मंत्रांचा १०८ वेळा जप केल्याने मनाला शांती आणि शक्ती मिळते:

विजय मंत्र: "श्रीराम जय राम जय जय राम"

राम गायत्री मंत्र: "ॐ दाशरथाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि, तन्नो राम: प्रचोदयात्"

मूलाक्षर मंत्र: "रां रामाय नम:"

शांती मंत्र: "ॐ रामचंद्राय नम:"

Web Title : राम नवमी २०२६: पूजा विधि, मुहूर्त और मंत्र

Web Summary : राम नवमी २०२६: विस्तृत पूजा विधि, शुभ मुहूर्त और शक्तिशाली मंत्रों के साथ मनाएं। भगवान राम के जन्म का सम्मान भक्ति और पारंपरिक प्रथाओं से करें।

Web Title : Ram Navami 2026: Puja Vidhi, Muhurat, and Mantras Explained

Web Summary : Celebrate Ram Navami 2026 with detailed puja vidhi, auspicious timings, and powerful mantras. Honor Lord Rama's birth with devotion and traditional practices for blessings.